Skip to main content

अमेरिकेची नवी वाट

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 02/10/2008 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी माझ्या माहितीतले जे लोक अमेरिकेला जात असत ते सगळेजण आधी न्यूयॉर्कला जाऊन तिथून पुढे शिकागो, बोस्टन, फ्लॉरिडा वगैरेकडे कुठे कुठे जात. मला अमेरिकेच्या भूगोलाची माहिती नसल्यामुळे त्याचा कांही संदर्भ लागत नसे. अमेरिकेला जायचे म्हणजे न्यूयॉर्कला जाऊन स्वातंत्र्यदेवीचे दर्शन घेऊनच पुढे जायचे अशी माझी भाबडी समजूत होती. न्यूयॉर्कला जाण्यासाठीसुद्धा दोन टप्प्यात प्रवास करावा लागे. आधी मुंबईहून लंडन, फ्रँकफूर्ट यासरख्या युरोपातल्या एका शहराला जाऊन, तिथे थोडी विश्रांती घेऊन पुढे जाणारे विमान पकडावे लागत असे.

अल्फाराटा

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 02/10/2008 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी कांही दिवसासाठी अमेरिकेत अल्फाराटा इथे आलो आहे. कोणी मिसळपावप्रेमी इथे जवळपास अहेत काय ?

मिपा कडून खेळाडूस मदत - प्रस्ताव

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 01/10/2008 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच ही बातमी वाचली. चार वेळा हिंदुस्तान श्री व दोन वेळा महाराष्ट्र श्री पटकवलेल्या सुहास खामगावकर या मराठमोळ्या पैलवानाला खुराकाला पैसे नाहीत. अशा बातम्या वाचल्या की वेदना होतात. जगात देशाचे नाव उज्वल करण्याची क्षमता असणारे असे खेळाडू जागतीक स्पर्धे पर्यंत सुद्धा पोचत नाहीत हे आपले दुर्दैव. आपल्या मुर्दाड व भ्रष्ट राजकारण्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण सुद्धा आपला खारीचा वाटा उचलावा असा विचार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या पैलवानाने नाव कमावले तर... किती समाधान मिळेल ना आपल्याला!

आपापले जग.

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 01/10/2008 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या कोठेतरी गर्भप्रतिबंधित गोळ्या आणि गरबाच्या पार्श्वभूमीवर हे लेखन करत आहे. काल्पनिक वाटले तर तो माझ्या लेखनाचा दोष समजावा. ज्याचे मन तरल आहे त्याने हे वाचण्याचे शक्यतो टाळावे. आता विषय प्रवेश. २५/३० वर्षापूर्वीचा प्रसंग. स्थळ १५००० वस्तीच्या गावातील मित्रांशी गप्पा. अनेक विषयानंतर खालील चर्चेचा प्रसंग. माझा मित्र, अरे आपल्या अमूक अमूक चे लग्न ठरले होते ते माहित आहे ना? मी : हो, माहित आहे. तो : अरे त्याचा काडीमोड झाला. मी : असे कसे? काहीकाळापूर्वीच त्याचे आमंत्रण पाहिले होते.

सलामत हरी राया!!!

लेखक स्वप्ना हसमनीस यांनी बुधवार, 01/10/2008 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
मलेशियासारख्या मुस्लिम राष्ट्रात "हरी राया" हा सण आपल्याकडील दिवाळीसारखा मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा केला जातो. ह्या सणापूर्वी एक महिना अगोदर "रमाधान"महिना सुरु होतो.महिनाभर येथील लोक सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी काहीही खात पीत नाहीत. त्यामुळे दिवसभर शांतता पण संध्याकाळपासून जागोजागी खाण्यापिण्याची तंबूवजा हॉटेल्स माणसांनी खचाखच भरुन वाहत असतात. रमाधानच्या काळात सर्वत्र 'प्रमोसी'(सेल) चालू असतात.लोक भेटवस्तू खरेदी करतात.सकाळ संध्याकाळ प्रार्थना केल्या जातात. कामानिमित्त शहरामध्ये वास्तव्य असलेले लोक,हरी रायाच्या

बुद्धिबळाच्या युद्धपटावर!

लेखक सचिन जाधव यांनी बुधवार, 01/10/2008 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्धिबळाच्या युद्धपटावर, एक प्याद निमुटपने लढत होत..... स्वबळावर स्वहिमतीवर, एक एक घर ते पुढ सरकत होत. समोर येना-या प्रत्येक सन्कटाला, ते धैर्याने समोर जात होत, स्वबळावर स्वहिमतीवर, एक एक घर ते पुढ सरकत होत. लढता लढता ...लढता लढता, पोहचल शेवटच्या घरट्यात, तेव्हा ते प्याद एक वझिर होत, स्वबळावर त्यान आता राजालाही, नमवल होत. पण्.........पण ???? खेळ सन्पला तेव्हा...... ते प्याद मात्र एक प्यादच होत, अण पुन्हा एकदा , लढण्यासाठी सज्ज होत.........पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज होत.

हे महाराजा

लेखक अभिजीत मोटे यांनी बुधवार, 01/10/2008 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळः स्वर्गलोक वेळ: सकाळची सावरकर (वि. दा. सावरकर) कसलातरी गुढ विचार करत बसले होते. तेवढ्यात कूठून तरी तुतार्‍याचे आवाज त्यांच्या कानी आले. समोरून महाराज (छ्त्रपति शिवराय) येत होते. दोघांनी एकमेकांना नमस्कार केले. एकमेकांची विचारपूस केली. चर्चा चालू होती पन राहून राहून सावरकर स्वतात हरवून जात होते. महाराजांना या गोष्टिची जानीव झाली. त्यांनी याबद्दल सावरकरांना विचारलं, "काय तात्या कसला विचार करताय मघासपासून". "काही नाही महाराज, विचार करत होतो मी आणि तुम्ही, दोघांनिही आपली पूरी हयात घालवली हिंदूस्थानला स्वतंत्र्य करायला. जनता मला तर विसरली पण तूम्हाला नाही विसरली. हे कसं काय?

आय पील

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 01/10/2008 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्र सुरु झाली. जिकडे बघतो तिकडे गरबा. अगदी खांद्याला खांदा लावुन. निरनिराळी मंड्ळे कुरघोडी करण्याकरिता वेगवेगळ्या शकली काढतात. स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, आणखी काय काय . शिगेला पोचलेला आनंदोत्सव. गरब्यात भाग घेणार्यांचे चेहेरे बघितल्यावर एक्स्साइट्मेंट म्हणतात ती नेमके काय हे कळ्ते. प्रेक्षकांचा पण तुटवडा नाही. काका मंड्ळी बघोजी राव होताना " गेले ते दिवस" चे उसासे सोडतात. परत एखादी सुबक ठेंगणी हेरुन खयालोंकी दुनिया मधे फिरुन येतात. मला मात्र गरब्यात कधीही सहभागी होता आले नाही. तसे खास काही ही कारण नाही. संपर्क वाढतो अशी माहिती मिळाल्यावर गेलो होतो एकदा. पण काही जमले नाही.