Skip to main content

काळ थांबला कधीचा...

लेखक राघव यांनी गुरुवार, 02/10/2008 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
या दोन्ही कविता मी बर्‍याच आधी लिहिलेल्या आहेत. माझ्या एका जिवलग मित्राच्या मनःस्थितीचे वर्णन पहिल्या कवितेत करण्याचा प्रयत्न मी केलेला. सोबतची दुसरी कविता कदाचित त्या मनःस्थितीतून बाहेरची पडण्याची एक वाट असावी.

पाककृती

लेखक अनिल हटेला यांनी गुरुवार, 02/10/2008 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स !! बरेच दिवस झाले विचार करत होतो की , आवडणारा खाद्य प्रकार तुम्हा सर्वा सोबत शेयर करावा !!! आणी आज आम्ही कॄती करत आहेत !!!!(आळशीपणाची हद्द म्हणा ,हव तर !!) चायना मध्ये आल्या पासुन तीन चार प्रांतातील चायनीज खाण्याचा योग आला !! साधारणपणे आपल्या ला न जमणारे हे प्रकार आहेत !! पण सिचुअन पद्धतीच फूड आपल्याला खास करून आवडते !! वर छायाचित्रात दिलेले आहे ते माझ सर्वात आवडत डीश !!! १) सुजीतो :: म्हणजे एक प्रकारची शेंग (नेमक नाव आपल्याला माहिती नाहीये .....) आधी अर्धवट शिजवून मग मस्त फ्राय केलेल

चला ऐकूया शास्त्रीय संगीत!!!

लेखक घाटावरचे भट यांनी गुरुवार, 02/10/2008 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, धाग्याच्या नावाने बिचकून जाऊ नका!!! कृपया एकवार वाचण्याचे कष्ट घ्या... तर मंडळी, आपलं शास्त्रीय संगीत बर्‍याच लोकांना वाटतं तसं दुर्बोध आणि क्लिष्ट मुळीच नाही. किंबहुना, ते अत्यंत मनोरंजक आहे. आंतरजालामुळे संगीताची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होउ लागली आहे. याचा माझ्या सारख्या शास्त्रीय संगीताच्या पंख्यांना मोठा फायदा झालेला आहे. आणि ईस्निप्स.कॉम सारख्या अनेक संस्थळांवर संगीत अपलोड करण्याची सुविधा आहे, ज्याचा आपण फायदा घेणार आहोत. या धाग्याचा उद्देश असा आहे, की आपल्याला आंतरजालावर शास्त्रीय संगीताचा एखादा उत्तम तुकडा सापडला, तर त्याचा दुवा कृपया द्यावा.

* महामानव गांधी*

लेखक अनिरुद्धशेटे यांनी गुरुवार, 02/10/2008 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
* महामानव गांधी* स्वतसाठी नसलेल स्वप्न महात्म्याने पाहिल, सामान्यांच्या स्वप्नात नसलेल स्वातत्र्य महात्म्याने आणल ! बाबा तुझ्या या देशात लोकशाहीची पाळ्मुळं घट्ट आहेत अजुन, मात्र, मेळघाटातल्या आदिवासींना स्वातंत्र्य कशाशी खातात हे , माहित नाही अजुन ! तुझ्यावर इतके प्रेम या लोकांचे तुझ्या जन्मदिवशी ठेवलाय यांनी ड्राय डे, बहुतेकांचा असतो याच दिवशी पहिला-वहिला 'ट्राय डे' बाबा सान्गु नकोस कुणाला तुला म्हणुन सांगतो , पण इतर दिवसांच्या पेक्षा ड्राय डे च्या दिवशी बाट्ल्यांचा खच जास्त असतो ! घेतील काही लोक जेव्हा असत्य व हिंसेचा वसा, तेव्हा दोनच तत्वे स
Taxonomy upgrade extras

गप्पागोष्टी

लेखक घासू यांनी गुरुवार, 02/10/2008 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्या शारजाह (यु.ए.ई.) येथे असतो. इकडे कुणा मिसळप्रेमी॑ची भेट होइल का?

लाल बहाद्दुर शास्त्री जयंती

लेखक आगाऊ कार्टा यांनी गुरुवार, 02/10/2008 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज २ ऑक्टोबर.... आज लाल बहाद्दुर शास्त्री यांची सुद्धा जयंती आहे. त्यानिमित्त सर्व मि.पा.सदस्यांतर्फे आपले माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांना श्रध्दांजलि व सादर प्रणाम. जय जवान !!! जय किसान !!!

म्रुगजल

लेखक सचिन जाधव यांनी गुरुवार, 02/10/2008 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
म्रुगजल मण हे माझे, जसे पाणी हे वाळ्वटातले, सान्भाळु तरी किती हे याला, हे भरकटतच चालले. नाही कोणी विचार करणारे, नाही कोणी वाट पाहणारे, तरी पण आशा आहे याला, कधीतरी येइल-कोणी साथ देनारे, माहित असुनही सर्व काही, वेडी आशा नाही लपलेली, कधीतरि एकदिवस येइल आठ्वण, म्हणून अजुनहि वाट पाहणारे. कधीतरि एकदिवस येइल ती, अण आठवेल तिला सर्वकाही, त्यावेळेस कदाचीत नसतीलही हे क्षण, ज्यासाठी तळमळत होते......"म्रुगजल माझे हे मण."

गांधी जयंति निमित्ताने (आम्हि कपाळ करंटे महात्माजींची क्षमा मागतो)

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 02/10/2008 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
मी हि भोंदू तुहि भोंदू आपण दोघे भोंदू जे जे नाहित भोंदू ते आहेत सारे गांडू बोले त्यैसा चाले तयाचि कापून टाकु पावूले सत्याचे जे उदघोष करिती तयांचे दाबून टाकु गळे गांधी जरीका पुन्हा जन्मला आम्हि मारून टाकु त्याला कार्य तुझेरे संपले केव्हाच पुन्हा कशाला आला..........? परतन्त्र होईल देश जेव्हा हा बोलवु तुला रे पुन्हा सत्य अहिंसा आहे येथे सध्या तरी रे गुन्हा.....!
Taxonomy upgrade extras

महात्मा गांधी जयंती

लेखक छोटुली यांनी गुरुवार, 02/10/2008 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज दोन ऑक्टोबर .महात्मा गांधी जयंती.त्यानिमित्त सर्व मि.पा.सदस्यांतर्फे राष्ट्रपिता मा.महात्मा गांधी यांना श्रध्दांजलि व सादर प्रणाम . रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ईश्वर अल्ला तेरे नाम सबको सन्मति दे भगवान ! वैष्णवजन तो तेणे कहिये जो पीडपराई जाने रे !