Skip to main content

मोबाईलची शाळा

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 06/04/2021 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
“अन्वयी अभ्यासाची लिंक आलीये शाळेतून लवकर जॉईन हो.मला मेसेज आलाय.” अन्वयीची आई तिला ओरडून सांगून थकली होती.रोज १० वाजता शाळेची लिंक यायची.सहावीतल्या अन्वयीला tab होता.त्यावार ती गेम खेळायची,यु ट्युबवर वेगवेगळे व्हिडीओ पाहण्यात गुंग असायची.पण शाळेची लिंक आली की,टिवल्या बावल्या करायची .आईने दहादा सांगितल्याशिवाय जॉईनच नाही व्ह्यायची.हजेरी लावण्यापूर्ती जॉईन व्हायची.वोल्युम झिरो करत. अन्वयीची आई-वडिल जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते.कोरोनात शाळांना सक्तीची सुट्टी जाहीर होती.त्यांच्या शाळेचे गाव अगदीच छोटे होते.वीजेची ,नेटवर्कची कमतरता होती.त्यामुळे ऑनलाईन शिक्षण देणे अवघड होते.दोन महिने असेच

पणजीच लुगडं (भाग-२)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 06/04/2021 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
https://misalpav.com/node/48608 रात्र झाली.जेवण आटोपली.विभाला झोपच येतच नव्हती ,पणजीच नाव काय,कशा होत्या त्या ?

उकडलेले अंडे!

लेखक लई भारी यांनी मंगळवार, 06/04/2021 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
हो, तुम्ही शीर्षक बरोबर वाचलेत. उकडलेल्या अंड्याच्या पाककृती(!) बद्दलच लिहितोय :-) आता असा प्रश्न पडणे साहजिक आहे की एवढ्या साध्या गोष्टीची कृती कशाला लिहायला पाहिजे! आणि गूगलबाबाला विचारले तर चिक्कार रेसिपी आहेत. तर, असो! अंड्याचे बरेच प्रकार खूप आवडतातच. पण बहुतांश पदार्थ बाहेर जसे जमतात तसे घरी जमत नाहीत. सर्वांची आवडती 'बुर्जी'; कितीही प्रकारे करून बघितली तरी यष्टी स्टॅन्ड बाहेर मिळणाऱ्या टपरी वरची चव नाहीच येत. तीच गोष्ट 'poached egg' नावाच्या विंग्रजी प्रकारची. मला प्रचंड आवडतो पण घरी जमलंच नाही. माझ्या मते 'super fresh eggs' हे सोडून बाकीचा सगळा जुमला मी केला तरी पण नाही जमले!

उकडलेले अंडे!

लेखक लई भारी यांनी मंगळवार, 06/04/2021 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
हो, तुम्ही शीर्षक बरोबर वाचलेत. उकडलेल्या अंड्याच्या पाककृती(!) बद्दलच लिहितोय :-) आता असा प्रश्न पडणे साहजिक आहे की एवढ्या साध्या गोष्टीची कृती कशाला लिहायला पाहिजे! आणि गूगलबाबाला विचारले तर चिक्कार रेसिपी आहेत. तर, असो! अंड्याचे बरेच प्रकार खूप आवडतातच. पण बहुतांश पदार्थ बाहेर जसे जमतात तसे घरी जमत नाहीत. सर्वांची आवडती 'बुर्जी'; कितीही प्रकारे करून बघितली तरी यष्टी स्टॅन्ड बाहेर मिळणाऱ्या टपरी वरची चव नाहीच येत. तीच गोष्ट 'poached egg' नावाच्या विंग्रजी प्रकारची. मला प्रचंड आवडतो पण घरी जमलंच नाही. माझ्या मते 'super fresh eggs' हे सोडून बाकीचा सगळा जुमला मी केला तरी पण नाही जमले!

सांगली कट्टे,

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 06/04/2021 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
"मित्र ", हा माझा विक पाॅइंट आणि त्यातही ते "मिपाकर" असतील तर, फारच उत्तम, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे... त्यामुळे कधीही नविन गावात जायचे असेल तर, कुणी मिपाकर त्या गावांत आहेत का? अशी हाकाटी पिटवतो. जगांत असे एकही ठिकाण नाही की, ज्याच्या आसपास मिपाकर रहात नाहीत. मुलगा 21 वर्षांचा झाला (2016-17) आणि त्याची एकूण शैक्षणिक प्रगती बघून, त्याला योग्य अशी मुलगी शोधायला सुरूवात केली. एप्रील 2020 मध्ये एका मुलीने आमच्या मुलाला पसंत केले. 9-10 महिने, त्या दोघांनी एकमेकांना जाणून घेतले आणि पुढील बोलणी करायला, मी आणि आमची सौ.

१. मिनी लॉकडाऊन : दिवस पहिला

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 06/04/2021 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
काल उद्धव ठाकरेसाहेबांनी करोनाच्या केसेस चा वाढीव आकडा पहता कडक निर्बंध आणि वीकेंडला संपुर्ण लॉकडाऊन ची घोषणा केली . #मिनीलॉकडाऊन . आज संध्याकाळपासुन आठ वाजल्यापासुन त्याची अंमलबजावणी सुरु झाली , त्या अर्थाने आज लो़कडाऊनचा पहिला दिवस. मागच्या वर्षीच्या मिपावरील लॉकडाउन स्पेशल लेखमालिकेत लेख लिहिता न आल्याची खंत मनात होतीच , ती दुर करण्याची संधी सरकारने दिली ह्यबद्दल मी सरकारचा आभारी आहे ;) ________________________________________ खरंतर लिहिण्यासारखं खुप आहे पण सगळंच अघळपघळ ... अगदी खरंच बोलायचं तर लॉकडाऊन आपल्याला काही झेपला नाही.

कुटचलनाची बाराखडी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 05/04/2021 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी सध्या मिपावर बाराखडीची चलती आहे. त्यामुळे म्हटले आपणही एक जिलबी टाकूया. तर "जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्या शिकवावे , शहाणे करून सोडावे सकाळ जन" या समर्थांच्या उक्ती प्रमाणे मी हा धागा लिहितोय. कोणाच्या फायद्या तोट्याची जबाबदारी माझ्यावर नाही.अर्थातच प्रत्येकाने लेख आपल्या जबाबदारीवर वाचावा किंवा अनुकरण करावा हे सांगणे नलगे. पुढील माहिती विकीवरून साभार --- तर १९८३ मध्ये अमेरिकन क्रिप्टोग्राफर डेव्हिड चाम यांनी इ-कॅश नावाच्या अज्ञात क्रिप्टोग्राफिक इलेक्ट्रॉनिक पैशाची कल्पना केली.

टाटा निक्सन एक्सएम पेट्रोल मॅन्युअल गाडीचा, पुरेशा वापरानंतरचा रिव्यू

लेखक कांदा लिंबू यांनी सोमवार, 05/04/2021 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे हा धागा मी काढला होता. तिथल्या सूचना, सल्ले व मार्गदर्शनाबद्धल सर्व व्यक्त-अव्यक्त मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. २० सप्टेंबर २०२० ला गाडी हातात आली. महिनाभर वापरल्यावर रिव्यू लिहीन असं ठरवलं होतं पण मग म्हटलं पाचेक हजार किमी वापरानंतर लिहावा (टंकाळा, दुसरं काय!). आता लिहितोय. उशीर झाल्याबद्धल क्षमस्व. स्वतःची नवीन चारचाकी घेण्याचा पहिलाच अनुभव होता. पोटात अनेक फुलपाखरे बागडत आहेत असं उगीच वाटत होतं.

पणजीचं लुगडं (भाग -१)

लेखक Bhakti यांनी रविवार, 04/04/2021 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
दीपाचं पहिलच बाळंतपण. अमेरिकेमध्ये लीगल असुनही जेन्डर रिव्हील न करण्याचं जोडप्यानं ठरवलं होतं. तेव्हा भारतात सगळ्यांची पेढा की बर्फी याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मऊ मऊ कापडात गुंडाळलेला इवलासा जीव टुकू टुकू आईबाबांना पाहत होता.. संदीपने कळवल.. ”बर्फी झाली हो..” रजनीकाकूंनी लगेच देवासमोर बर्फीचा पुडा ठेवला. अशोककाकांनी पेढा आणि बर्फी हे दोन्ही पुडे आणून ठेवले होते. ”मुलीच्या पहिल्या बाळाचा उत्साह काही वेगळाच अनुभव देतो”, अशोककाका म्हणाले. ”त्यात आज मार्गशीष अष्टमीही आहे, चांगला योग आला.