Skip to main content

आज काय घडले... फाल्गुन शु. १० सर ग्रियर्सन यांचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी शुक्रवार, 09/04/2021 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
giyarson शके १८६२ च्या फाल्गुन शु. १० रोजी भारतांतील भाषाशास्त्राच्या अभ्यासाचे जनक, पुरातत्त्ववेत्ते सर जॉर्ज आब्राहम ग्रियर्सन यांचे निधन झाले. वयाच्या तेविसाव्या वर्षी सिव्हिल सर्व्हट म्हणून हे नोकरीत रुजू झाले. तेव्हांपासून ग्रियर्सन आपला वेळ भारतातील भाषा आणि लिप्या यांच्या संशोधनांत घालवू लागले.

आज काय घडले फाल्गुन शु. ९ शिवरायांचे आग्न्यास प्रयाण !

लेखक Ashutosh badave यांनी शुक्रवार, 09/04/2021 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
shivaji maharaj शके १५८७ च्या फाल्गुन शु. ९ ला श्रीछत्रपति शिवाजीमहाराजांनी रायगडावरील सर्व निवडक मंडळींचा निरोप घेऊन पुत्र संभाजी राजे, कांहीं सोबती व.चार हजार स्वार यांच्यासह औरंगजेबाच्या भेटीसाठी उत्तरेस आग्याकडे प्रयाण केले. जयसिंहाच्या मध्यस्थीने शिवाजी राजे -औरंगजेब यांच्या भेटीचा योग घडून येणार होता.

हाऊ टू थिंक लाइक आईनस्टाइन(ऐसी अक्षरे....मेळवीन -२)

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 08/04/2021 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
einstine हाऊ टू थिंक लाइक आईनस्टाइन मूळ लेखक : डनिअल स्मिथ अनुवाद :मुक्ता देशपांडे आईनस्टाइन म्हणजेच जगाला पडलेलं कोडं आहे.

गोष्ट सांगा गणित शिकवा... 7

लेखक राजा वळसंगकर यांनी गुरुवार, 08/04/2021 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
तुमची सावली "गायब" होईल! (पुण्यात - 13 मे रोजी दु. 12:31 वा.) Fake news? खाली लिंक्स आणि सविस्तर माहिती दिली आहे. ************************** "ओ शी*" ... अचानक सगळे बंद पडल्यामुळे सायली आणि चिंट्या चांगलेच चिडले. क्वचितच वैतागणारा सॅमी देखील स्वतःला आवरू शकला नाही. डोळ्यावरचा 3D हेडसेट मधे फक्त काळोख दिसत होता... लाईट नाही गेले, मी ब्राउजर बंद केला... नेहाने हळूच सांगीतलं... रागीट नजरा आता नेहाकडे वळल्या. 3चा अलार्म वाजला, आपलं ठरलं आहे थांबायचं म्हणून... नेहाने सफाई दिली...

शेअरमार्केट ची बाराखडी... भाग ०.१ : आर्थिक नियोजन आणी गुंतवणुक कशी करावी...

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 08/04/2021 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
आधिचे भाग - शेअरमार्केट भाग ० : Basics - By गणेशा - https://misalpav.com/node/48553 शेअरमार्केट भाग ०.१: आर्थिक नियोजन आणी गुंतवणुक - By गणेशा (current धागा) शेअरमार्केट भाग १: Fundamental Analysis - By गणेशा - https://misalpav.com/node/48578 शेअरमार्केट भाग २.१: Technical Analysis -By गणेशा - https://misalpav.com/node/48607 -------------------- शेअरमार्केट भाग अ: मार्जिन - By बिटाकाका - https://misalpav.com/node/

गुंतवणूक --- का ? कधी? कशी ? कुठे ?

लेखक अमर विश्वास यांनी गुरुवार, 08/04/2021 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
म्युच्युअल फंड्स च्या धाग्यावरील प्रतिसाद / चर्चा बघून मला हा धागा लिहावासा वाटला... यात मी माझे विचार मांडणार आहे. मी लिहीन तेच बरोबर अशी भूमिका कधीच नव्हती / नसेल त्यामुळे तुमचे विचार वाचायला जरूर आवडेल. तसेच काही लोकांना हा धागा बाळबोध (बेसिक) वाटण्याची शक्यता आहे ... त्याच्यासाठी गणेशा चा धागा आहेच __________________________________________________________________________________________________________________ गुंतवणूक का करावी ? भविष्यातल्या खर्चाची तरतूद म्हणून गुंतवणूक करावी. ऋण काढून सण करू नयेत असे म्हणतात आता भविष्यातले मध्ये कधीचे ? एक - पाच - दहा - पंधरा वर्षे ...

पाचा ऊत्तराची कहाणी

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 08/04/2021 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
देवाघरची नाती संभाळावी खत पाणी घालुन वाढवावी तेव्हा कुठं प्रेमाच फळ आणी विसाव्या पर्यंतची साथ मिळते पाचा ऊत्तराची (आयुष्याची) कहाणी साठा ऊत्तरी सुफळ संपूर्ण होते जो पर्यंत होत नाही जाळ तो पर्यंत तुटत नाही नाळ कमळाची फुले सोडुन उचलत बसतात गाळ नाईलाजाने आशांची साथ आणी हातातला हात सोडावा लागतो कारण बुडत्याचा पाय खोलात आसतो पण आतला माणुस काही मरत नाही माणुसकीचा उमाळा काही सुटत नाही कधितरी कुठेतरी थांबावेच लागते स्वताःचे अस्तित्व जपावेच लागते नाही सोडली आशांची साथ तर मग तो ठरेल आत्मघात देवाचं काम देवावर सोपवावे माणसातल्या देवाने हरी हरी करीत बसावे पांडुरंग हरी वासुदेव हरी।
काव्यरस

म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग (भाग - १)

लेखक अमर विश्वास यांनी बुधवार, 07/04/2021 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
ही लेखमाला लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे गणेशा भाऊंची "शेअर मार्केटची बाराखडी" ही लेखमाला. या लेखमालेत शेअर्स मध्ये गुंतवणूक कशी करावी (विशेषतः Position Trading) हे उत्तम पणे सांगत आहेत ... अर्थात ही प्रक्रिया किचकट आहे. तसेच High Risk High Gain हे तत्व इथेही लागू होते. पण ज्यांना अशा पद्धतीने ट्रेडिंग शक्य नाही (अभ्यास नाही / वेळ नाही / रिस्क ची तयारी नाही ) त्यांच्या साठी दुसरा पर्याय काय ? माझ्या स्वतः च्या अनुभवावरून बऱ्याच गोष्टी शिकलो. सुरवातीला डे ट्रेडिंग / पोझिशन ट्रेडिंग केले. शेअर्स घेऊन लॉग टर्म इन्व्हेस्टमेंट (३+ वर्षे) ही केली. यात बराच फायदा आणि पुरेसा तोटाही पहिला.

गायी दूध देत नाहीत

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 07/04/2021 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
गायी दूध देत नाहीत एक शेतकरी लहान असताना त्याच्या मुलाला सांगायचा: - जेव्हा तू वयाच्या 12 व्या वर्षी पोचशील तेंव्हा मी तुला आयुष्याचे रहस्य सांगेन. एके दिवशी जेव्हा सर्वात मोठा मुलगा 12 वर्षांचा झाला, त्याने चिंताग्रस्तपणे आपल्या वडिलांना विचारले की जीवनाचे तुम्ही रहस्य सांगणार होतात ते काय आहे. वडील म्हणाले गाय दूध देत नाही. "तुम्ही हे काय बोलताय?" मुलाला अविश्वासाने विचारले. “बाळा, गाय दूध देत नाही, आपल्याला ते (दूध) काढावे लागते. आपल्याला पहाटे 4 वाजता उठणे आवश्यक आहे, शेणाने भरलेल्या गोठ्या मधून चालणे आवश्यक आहे, गायीचे पा

कबुलीजबाब

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 07/04/2021 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
रोज तो जुळवून अपुली एक कविता ठेवतो वृत्त-मात्रा-अर्थ-लय- -छंदात निशिदिनी रंगतो जे न दिसते रविस तेही मिटून डोळे पाहतो काव्य अन् शास्त्रामधे तो क्षण नि प्रतिक्षण डुंबतो कल्पनांचे भव्य इमले सुबकसे तो बांधतो (मी तयांची द्वारपाली आपखुशीने निभवितो) विविध प्रश्नांचा तुम्हाला अटळ छळ जो जाचतो मात त्याला देऊनी तो मिति-दिशा ओलांडतो शब्द धन वाटून अविरत थकून कधि तो थांबतो (मी ही त्या दुर्मिळ क्षणाची वाट गुपचूप पाहतो) आजवर कोणा न कथिले तेच आता सांगतो कल्पना उचलून त्याच्या मीच कविता प्रसवितो
काव्यरस