Skip to main content

अरे आपल्या बिरुटेसरांना वाचवा...! :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 26/10/2008 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
अरे आपल्या बिरुटेसरांना वाचवा..! आपल्या मिपाचे माननीय संपादक साहेब प्रा डॉ दिलिप बिरुटे सध्या उपक्रमावर खरडवहीच्या एका प्रकरणात अडकले आहेत व त्यांच्यावर आणि उपक्रमावर अजामीनपात्र गुन्हा दाखल झाला आहे आणि ऐन दिवाळीत बिरुटेसर गजाआड जातील की काय अशी चिंता उत्पन्न झाली आहे! :) आमचे मित्र व उपक्रमाचे मालक शशांक आणि आमची मैत्रिण व उपक्रमाची संपादिका प्रियाली ही मंडळींनादेखील या केसमध्ये अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे!

मराठीपणा

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 26/10/2008 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा. दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा. ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते. मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे.

मराठीपणा

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 26/10/2008 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा. दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा. ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते. मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे.

आपण देव दर्शनाला का जातो?

लेखक शशिधर केळकर यांनी रविवार, 26/10/2008 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपण देवाला का जातो? खरेच हा प्रश्न माझ्या मनात फार पूर्वीपासून आहे. लोक देवाला का जातात? देवाला म्हणजे देव दर्शनाला, मंदिरात, वगैरे वगैरे - कुठेही, सर्वत्र. चोर लोक चोरी करायला, आंधळे, भिकारी, बैरागी भीक मागायला, विक्रेते विक्रीला, पुजारी पूजेला, कामगार कामाला इ. लोक सोडले, तर बाकी शेकडा ९० लोक देवाला दर्शनाला, नवसाला, दानधर्माला, कर्मकांडाला, जपतपादि साठी, मन्त्रपाठाला, अभिषेकाला वगैरे ढोबळपणे जातात. अनेक जण लग्नमुंज, इतर मंगल कार्याच्या निमित्ताने देव दर्शन, यात्रादि करतात. विविध धार्मिक स्थळाना, काशी आदि यात्राना वार्षिक, नैमित्तिक सहली करणारे कित्येक असतात.

दिवाळी

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 25/10/2008 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
उटण्यांचा सुवास,बंबाचा धूर फराळाची ताटं,दारावरची तोरणं आधणाचं पाणी,फोडलेली चिरांटी फटाक्यांचे आवाज,मातीचे किल्ले किल्ल्यांवरचं पोपटी,कोवळं जंगल नवे कोरे शिवाजीमहाराज ! नवे जुने मावळे, त्यातच मोटारी आणि बोगद्यातून डोकावणार्‍या आगगाड्या सुद्धा... सारवलेलं अंगण,अंगणातलं तुळशीवृंदावन, समोर रेखलेली रंगीत रांगोळी,पणत्यांची आरास , दारात झुलणारे आकाशदिवे, आणि नव्या कोर्‍या परकर पोलक्यातली मी... पणत्यात तेवणार्‍या मंद वाती राहिल्यात सात
Taxonomy upgrade extras

आजाचं गुपीत

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 25/10/2008 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथमच तानुली आज आजा,आजीला सोडून सियरा मौन्टनवर बर्फ़ावरची मौजमजा करायला गेली होती.आजा,आजी तिच्याबरोबर येणार नाहीत म्हणून ती खूप उदास झाली होती. "तुम्हाला थंडीचा त्रास होत असेल तर डबल डबल कपडे का नाही घालत?" म्हणून मागे लागली होती.प्रेमळपणा हा तानुचा उपजत गूण आहे.तानुच्या गैरहजेरीत रात्री ती स्वपनात आली.
Taxonomy upgrade extras

कहाणी एका जिद्दीची.....

लेखक विकी शिरपूरकर यांनी शनिवार, 25/10/2008 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
खान्‍देशातील जळगाव जिल्‍ह्याच्‍या पूर्वेकडे वसलेले सुमारे 50 हजार लोकसंख्‍येचे तालुक्‍याचे गाव अमळनेर. अवघ्‍या महाराष्‍ट्राची मायमाऊली म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या मातृहृदयी साने गुरूजींची कर्मभूमी आणि वारकरी संप्रदायाची पताका डौलाने फडकावणा-या संत सखाराम महाराजांची अध्‍यात्‍मनगरी. स्‍वातंत्र्य आंदोलकांची आणि अध्‍यात्मिक वृत्तीच्‍या लोकांची दीर्घकालीन परंपरा जशी या शहरात रूजली तशीच या गोष्‍टींपासून शेकडो मैल दूर असलेली किंबहुना समाजाचा अविभाज्‍य भाग असूनही गावकुसाबाहेर राहिलेली आणखी एक संस्‍कृती येथील 'बोरी' नदीच्‍या किना-यावर रूजली आणि वाढलीही.

हिंदी चॅनेलच्या बिहारी - यूपी च्या पित्त्यांचा पराभव....

लेखक सागर यांनी शनिवार, 25/10/2008 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चॅनेलच्या बिहारी - यूपी च्या पित्त्यांचा पराभव.... आज तक चॅनेल नी राज ठाकरे यांच्या मराठी आणि स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याच्या लढाईला गुंडगिरीचे रुप दिले होते. त्यासाठी लोकांना अधीक भडकवण्यासाठी "मनसे"वर बंदी टाकावी यासाठी उत्तर भारतीयांना खासकरुन मत देण्याचे आवाहन केले होते. त्यांचा हा विषारी प्रयत्न मराठी बांधवांनी केवढा जोरात हाणुन पाडला हे खालील निकालावरुन स्पष्ट होईल... हाच निकाल येथे पाहता येईल....

द्विधा मनाची....

लेखक पारोळेकर यांनी शनिवार, 25/10/2008 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
एकाकी भटकतोय या अनोळखी दुनियेत सोबतीला नाही कुणी या एकेरी वाटेत... दिसत होतं लांबच लांब आकाश दिसत नव्हतं विसाव्याचं ठिकाण दिसत होतं एकच झाड त्याची होती आकाशाकडे मान माझ्यासारखीच द्विधा त्याची ही खंत होती मनात माझ्यासारखं असू नये कोणी हीच प्रार्थना करतो सद्गुरू चरणात रेटता रेटता... दिसलं एक विसाव्याचं ठिकाण जाऊन पाहतो तर काय? माझ्या आधीच तेथे कुणी विराजमान तेथून जावं की थांबावं हाच होता प्रश्न मनात कुणी मिळेल जीवाभावाचं या अनोळखी जगात....
Taxonomy upgrade extras