Skip to main content

केरळ चा पेरिप्प वडा

लेखक सायली पानसे यांनी रविवार, 09/11/2008 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
केरळ मधिल अतिशय चविष्ट वडा ..... महाराष्ट्रात बटाटा वडा तसा तिथे हा. साहित्य : तुरीची डाळ - १-१/२ वाटी आले - पाउण इंचा चा तुकडा हिरव्या मिरच्या- ३-४ ( तिखट आवडत असल्यास जास्त पण घेउ शकता.) कढिपत्ता- १५-१६ पाने (२-३ काठ्या) चिरुन घेणे कांदा- १ मध्यम आकाराचा..

सफर --मुरुड-जंजिरा किल्ला

लेखक वल्लरी यांनी रविवार, 09/11/2008 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
सफर --मुरुड-जंजिरा किल्ला ठिकाणः-मुरुड जिल्हा-रायगड महाराष्ट्र व्याप्ती:-सुमारे २२ एकर शेत्र किल्ल्याने व्यापले आहे वास्तुशास्त्रः-मुघल आणि पोर्तुगीज वास्तुशास्त्राचा प्रभाव .... आम्ही अलीबाग हुन मुरुड-जंजिरा ला गेलो होतो अलीबाग - मुरुड-जंजिरा अंतर-५२ कि.मि.आहे. काही फोटो .... बोटीतुन किल्ल्याकडे जाताना... किल्ल्याचे प्रवेश दार.. किल्ल्याची समोरुन

मिसळपाव काव्यकट्टा - काव्यस्पर्धा नोव्हेंबर २००८ - अभिप्राय

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 09/11/2008 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा काव्यकट्ट्याच्या नोव्हेंबर २००८ च्या काव्यस्पर्धेतील रचनांवर अभिप्राय येथे द्यावेत. अन्य कोणतेही लेखन येथे करू नये. धोंडोपंत
Taxonomy upgrade extras

मिसळपाव काव्यकट्टा - काव्यस्पर्धा नोव्हेंबर २००८

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 09/11/2008 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, मिपावरील आमच्या छंदशास्त्रीय लेखनाला जो अभूतपूर्व प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वप्रथम सर्व मिपावरील काव्यप्रेमींना धन्यवाद. भारावून टाकणारा हा प्रतिसाद आहे. असा प्रतिसाद कोणत्याही मराठी संकेतस्थळावर आम्ही आजपर्यंत पाहिलेला नाही. मिपाला उथळ वगैरे म्हणणार्‍यांनी हे सदर पहावे. या प्रतिसादावरून एक गोष्ट सिद्ध झाली की अनेक जण उत्कृष्ट काव्यलेखनाची क्षमता बाळगून आहेत. फक्त त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि वाव मिळाला पाहिजे. त्यादृष्टीने "मिसळपाव काव्यकट्टा" आजपासून सुरू होत आहे. मिसळपाव काव्यकट्टा हे मिसळपाववरील कवींसाठी काव्यसंमेलन आहे.
Taxonomy upgrade extras

जाणिजे यज्ञकर्म..!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 09/11/2008 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आपले एक मिपाकर मित्र प्रभाकर पेठकर यांचे आजपासून पुण्यात 'यज्ञकर्म' हे हॉटेल नव्यानेच सुरू झाले आहे.. आपल्या सर्व मिपा परिवारातर्फे मी पेठकरशेठना आणि त्यान्च्या 'यज्ञकर्म' ला मनापासून शुभेच्छा देतो. यज्ञकर्मची खूप भरभराट व्हावी हीच शुभेच्छा... एक मराठी माणूस या नात्याने मिपा या मराठी संकेतस्थळाला पेठकरांचा खूप अभिमान वाटतो..! पेठकरशेठ, आपल्या यज्ञकर्मकरता हे एक लहानसं शुभेच्छापत्र - :) तात्या.

मानसीक छळाची परीसीमा

लेखक ब्रिटिश यांनी रविवार, 09/11/2008 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
मानसीक छळ म्हणजे दूस-याच्या एखाद्या कृतीने खुप त्रास होऊन देखिल काहीही करू न शकणे (जाणकारांनी आपापल्या परीने व्याखेत बदल करावा) तूमचा कधी मानसीक छळ झाला आहे काय ? माझा होतो. कित्येक वेळा. उदा १) हिमेश रेशमीयासाहेबांची सलग पाच गाणी न थकता एकणे २) ड्राय डे ला बायकोने आक्खी चपटी बेसीनमधे ओतणे ३) श्रीमान तात्या अभ्यंकरांनी रोशनी पूर्ण न करणे ४) वळणदार मुलींनी काका म्हणणे ५)कामावरुन घरी गेल्यावर कंपल्सरी बालाजी सिरीयलस पहायला लागणे तूमचा कधी झाला असल्यास बोर्डावर येऊदे ना ! मानसीक छळातून सुटका नसलेला मिथुन काशिनाथ भोईर

भाईकाकांना शुभेच्छा...!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 09/11/2008 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय भाईकाका, काल ८ नोव्हेंबर होता, आपला वाढदिवस! परंतु कालचा संपूर्ण दिस खरंच गडबडीत गेला त्यामुळे मिपावर निवांतपणे यायला जमलंच नाही. म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे हे दोन शब्द आज जरा सवडीने लिहीत आहे... आपल्याला वाढदिवसाच्या बीलेटेड शुभेच्छा..! :) आम्हा सर्व मिपाकरांकडून वाढदिवसानिमित्त आपल्याला ही छोटीशी, प्रेमाची भेट.. गोड मानून घ्यावी!

कविता (देवद्वार छंद)

लेखक मनीषा यांनी रविवार, 09/11/2008 03:29 या दिवशी प्रकाशित केले.
सूर तुझे येथे गुंजतात कानी भारलेल्या रानी साद देती | स्वप्नांची इथेच भेट अशी घडे प्राजक्ताचे सडे माझ्यासाठी | नजरेत सारे गूज हे मनीचे श्वास कसे माझे गंधाळले | चांदणे शिंपीत ये तुझी चाहूल प्रितीचीच भूल या र्‍हुदयी | भेट तुझी माझी घडता ही सारी सृष्टी होई न्यारी धुंदाउनी | नवा नवा भासे निसर्ग हा असा जीव माझा पिसा सुखावला |