सूर तुझे येथे
गुंजतात कानी
भारलेल्या रानी
साद देती |
स्वप्नांची इथेच
भेट अशी घडे
प्राजक्ताचे सडे
माझ्यासाठी |
नजरेत सारे
गूज हे मनीचे
श्वास कसे माझे
गंधाळले |
चांदणे शिंपीत
ये तुझी चाहूल
प्रितीचीच भूल
या र्हुदयी |
भेट तुझी माझी
घडता ही सारी
सृष्टी होई न्यारी
धुंदाउनी |
नवा नवा भासे
निसर्ग हा असा
जीव माझा पिसा
सुखावला |
विशेष
वाचने
3278
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली
एकंदरच
मिपावरील
In reply to एकंदरच by धोंडोपंत
वा वा!
सुंदर रचना
सु॑दर
???
In reply to सु॑दर by जयेश माधव