Skip to main content

गुरू शिवाय विद्दा कसली?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 16/11/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
नृत्यकलेत योग्यते शारिरीक हावभाव करावे लागतात.त्या नृत्यातून नृत्यकरणार्‍याचं अविर्भावातलं सत्य विशद व्हावं लागतं.आणि त्याचं व्यक्तित्व प्रदर्शीत व्हावं लागतं.हे मी रोहिणीकडून ऐकलं. यशोधरा साखरदांडे आणि हिची मुलगी रोहिणी,जी आता रोहिणी गायतोंडे म्हणून ओळखली जाते ती नृत्यकलेत निपूण असून अलिकडे रंगमंचावर अभिनय करते हे मला जेव्हा कळलं तेव्हा मी अंधेरीतल्या एका नृत्यशाळेत तिचा अभिनय पहाण्यासाठी एका मित्रा बरोबर गेलो होतो.रोहणी त्यावेळी आपल्या विद्दार्थिनीबरोबर रियाज करण्यात दंग झाली होती. मी तिच्या आईवडीलांना चांगलाच ओळखतो. तिचे वडील माझ्या बरोबर टाटा इन्सस्टिट्युटमधे माझे सहकारी होते.

सौरव नावाचे वादळ...

लेखक विकी शिरपूरकर यांनी शनिवार, 15/11/2008 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
ध्‍दटपणा आणि आक्रमकता यांच्‍या सिमारेषेवरच तो आयुष्‍यभर घुटमळत राहिला... 'मला आवडेल तेच करेल आणि कुणासमोरही लाचारी पत्‍करणार नाही' हा त्‍याचा स्‍वभाव. नाही म्‍हणायला त्‍याच्‍या या स्‍वभावाचा त्‍याला फायदाही झाला. त्‍याच्‍या आक्रमकतेने भल्‍याभल्‍या संघांची पाचावर धारण बसली आणि तो सर्वांत यशस्‍वी कर्णधार ठरला. मात्र त्‍याचा हाच स्‍वभाव नंतरच्‍या काळात त्‍याला अडचणीचाही ठरला. मात्र त्‍यावरही मात करून आज तो आपली सर्वार्थाने गाजलेली कारकीर्द संपवित आहे.

मी परत एकदा

लेखक द्विज यांनी शनिवार, 15/11/2008 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनात नसेल मिळवले "आरक्षण" आम्ही कारण आमची स्वतःवर निष्ठा आहे असे उठ्सुठ बोम्बा मारु नका ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ? कर्मठ म्हणुन जीवभर आम्हालाच हीनवता चतुर्थीला बोलावुन कोणाला तुम्ही बनवता ? आम्हाला जातिवादी म्हणणार्या॑नो तुमच्यात स॑यम किती पक्का आहे ? असे डोळे फाडुन बघू नका ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ? कितीही तुम्ही पुढे जावो बोट मात्र आमच्यावरच आम्ही शान्त्ततेचे घोट पिले तरी घोडे आड वळणावरच हा अन्याय न्यायदेवतेच्या डोळ्यामध्ये चिपडासारखा पक्का आहे असे बोट दाखवुन हिनवू नका ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ? काळाच्या ओघात परिस्थितीसमोर नमते आम्ही घेतले घेतले त॑ घेतले सारे जीवावरच ब
Taxonomy upgrade extras

परदेशात नोकरी कराविशी वाटते..काय करावे..

लेखक राम दादा यांनी शनिवार, 15/11/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो..आपल्यातील बरेच मित्र परदेशात काम करतात्..त्याप्रमाणे मलाही परदेशात नोकरी करण्याची ईच्छा आहे.. मी आयटी मध्ये काम करतो..संगणक अभियंता..साधारण २ वर्षाचा अनुभव आहे...माझ्यासारखे बरेच मित्र आहेत .ज्यांना परदेशात नोकरी करवीशी वाटते.. त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल. बहुतेक अनुभवी मित्र आपल्या मिपामध्ये आहेत.. त्यांनी योग्य ती माहिती द्यावी. ( माहीती एबीसीडी पासुन सांगावी ) आपला राम दादा..

सिंग इज किंग

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 15/11/2008 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ :- पंतप्रधानांच्या बंगल्यातील मिटींग हॉल विषय :- हिंदु दहशतवाद पात्रे :- (हिरव्या कोचावर) अबु आझमी, शबाना आझमी (हिरव्या साडीमध्ये), जावेद अख्तर, अमर सिंह, मुल्लायम सिंह यादव, दिलिप कुमार. (भगव्या कोचावर) लालक्रुष्ण अडवाणी, शत्रुघ्न सिन्हा, नरेन्द्र मोदी, सुषमा स्वराज, उद्धव ठाकरे. (समोर इटलीहुन मागवलेल्या कोचावर मनमोहन सिंह, सोनीया गांधी, राहुल गांधी, विलास राव देशमुख, शरद पवार, आर. आर. पाटिल) शबाना दिदी :- (ईकडे तिकडे बघत ) हुश्श.... दिलीप कुमार :- उमममम क्या हुआ मोहतरमा ??

संस्मरणीय निसर्ग!

लेखक वर्षा यांनी शनिवार, 15/11/2008 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
परवा गप्पांच्या ओघात विषय पूर्वी, शाळा-कॉलेजात असताना पाहिलेल्या जाहिरातींकडे वळला. जाहीरातींची उजळणी करुन विषय मालिका...त्यांची शीर्षकगीतं..त्यातील कलाकार असा प्रवास करत करत चित्रपटांपर्यंत आला. चित्रपटांचंही दळण व्यवस्थित दळून झाल्यावर एका क्षणी विषय अचानक शैक्षणिक, शास्त्रीय कार्यक्रमांकडे वळला आणि मग थेट कंट्रीवाईड क्लासरुम पासून टर्निंग पॉईंटपर्यंत आठवणींना उजाळा देत देत विषय नॅशनल जिऑग्राफिक, डिस्कव्हरी पर्यंत येऊन पोचला. केबल नव्हता तेव्हा रविवारी लागणार्‍या National Geographic सिरीजवर समाधान मानलेलं असायचं.

अनोखी ग्राफिटी

लेखक नितिन नवले यांनी शनिवार, 15/11/2008 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी काहि दिवसांपुर्वी एक ग्राफिटीचे पुस्तक वाचले होते ,त्यातील एक माझ्या मनाला अनेक प्रश्न विचारुन गेली. ती ग्राफिटी अशी होती. "कोण म्हणतं व्यसन सुट्त नाहि मी आत्तापर्यंत शंभरवेळा सोडलयं ". घ्या आता.असे पण काहि महाभाग (माझ्या/आपल्या सारखे) हि असतात्.या ग्राफिटी विषयी मला आपले मत जाणुन घ्यायचे आहे .मी आपल्या मतांची वाट पाहतोय. शंभरवेळा व्यसन सोड्णारा नितु