राझ - द डोकेदुखी कंटीन्युज...
काल कुठुन अवदसा आठवली आणी तो राझ नावाचा शिनिमा बघितला असे झाले आहे !
हा राझ नक्की हॉरर आहे, मर्डर मिस्ट्री आहे का सस्पेन्स थ्रिलर आहे हे शेवट पर्यंत राझच राहाते. भट (घाटावरले न्हवेत) आणी सुरी द्वयी ला नक्की काय दाखवायचे आहे तेच कळत नाही. अतिशय बाष्फळ आणी मुर्ख प्रसंगांची मालिका म्हणजे राझ असे वर्णन करता येईल.
सुरुवात एकदम मुंग्या आणणारी (डोक्याला नाही तर हाता पायांना), कोणीतरी एक मरणासन्न माणुस एका गोर्या परदेशी माणसाला सांगत असतो की आता सगळे मरणार, 'तो' कोणालाही सोडणार नाही.
मिसळपाव
मूळ चित्रः
