Skip to main content

कट्टे कसे असावेत .. ? एक दृष्टीकोन

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 23/05/2021 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिपावर सुमारे ९ वर्षे आहे .या दरम्यान काही कट्टे झाले त्यात मी सामील होतो. मी मुळातच व्यक्तिपूजक वा मूर्तिपूजक नसल्याने मी मिपावर तसे खरडवही ,खरडफळा असे वापरून माझा दरबार तयार करण्याचा प्रयत्न केला नाही. सबब कट्टा असल्यावर " आहे कसा आननी ? " अशी मला काही उत्सुकता कुणाबद्दल नसे. तसेच माझ्या प्रोफाईल मध्ये माझे नावासकट आवडी व नावडी सुद्धा स्पष्टपणे लिहिले होते .माझ्या लेखनातून माझे व्यक्तित्व लोकांना पुसटपणे कळले असेल इतकाच तो काय स्वार्थ मी साधलेला आहे. मिपावर प्रथमपुरुषी एकवचनी काही लिहिलेले लोकांना फारसे आवडत नाही असा माझा अभ्यास आहे ! " मी बोटीवर होतो तेंव्हा !

शेर अफगाण- कथेनंतर, संदर्भ आणि नोंदी

लेखक विश्वनिर्माता यांनी शनिवार, 22/05/2021 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
अली कुलीच्या मृत्युनंतर तीन वर्षांनी, १६११ साली, मेहरुन्निसाचा जहाँगिरशी विवाह झाला. द ट्वेंटीथ वाईफ या कादंबरीनुसार, जहाँगिर मेहरुन्निसाला उपस्त्री होण्याबाबत आग्रह धरुन होता, पण मेहरुन्निसाने लग्न करण्याचा आग्रह केला. मेहरुन्निसा ही जहाँगिरची विसावी आणि शेवटची पत्नी ठरली. मेहरुन्निसाचे लग्नानंतर नामकरण “नुर महाल”, म्हणजे, महालातला प्रकाश म्हणून केले गेले. पण इतिहासात ती आठवली जाते ते नुर जहाँ या नावानेच- जगताचा प्रकाश.

शेर अफगाण- भाग २

लेखक विश्वनिर्माता यांनी शनिवार, 22/05/2021 21:25 या दिवशी प्रकाशित केले.

चार

उदयपूरच्या राणासोबत मुघल सत्ता पुढे अनेक वर्षे लढली. या युद्धात, बर्‍याच वर्षांनंतर मुघल साम्राज्य पराजयी ठरले. त्यावेळेस पादशहा अकबर मृत होऊन आणि जहाँगिर सत्तेवर येऊन अनेक वर्षे लोटली होती. पराजयाची नैतिक जबाबदारी घेत खान-ई-खाना अब्दुर्रहीम खान सेनापती पदावरुन निवृत्त झाले. निवृत्त जीवनात त्यांनी पुष्कळ लिखाण केले. हिंदू महाकाव्य, विशेषतः रामायण हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी “रहिम” नावाखाली भरपूर साहित्यरचना केली. ब्रिजभाषेत सामन्यजनांना सहजगत्या समजतील असे दोहे त्यांनी रचले. संस्कृतमध्ये सुद्धा त्यांनी काही ग्रंथ रचले.

शेर अफगाण- भाग १

लेखक विश्वनिर्माता यांनी शनिवार, 22/05/2021 21:25 या दिवशी प्रकाशित केले.

एक: अली कुली (ईसवी सन १६०७) I

गवताच्या सळसळीतून आणि घोड्यांच्या टापांनी चुरडल्या जाणार्‍या पाचोळ्याच्या आवाजामधून सुद्धा अली कुलीला वाघाच्या गुरकावण्याचा आवाज आला. त्याने हाताची मूठ दाखवून सोबतच्या गावकर्‍यांना सावध होण्याचा ईशारा केला. काही पावलांनंतर हरणाच्या धडावर पाय रोवलेला प्राणी अली कुलीला दिसला. रक्ताळलेले दात दाखवत वाघाने आपल्या शिकारीपुढे बचावात्मक पवित्रा घेतला. नंतर, अली कुलीने विचार केला. एकूण सहा तलवार आणि भाला घेतलेली माणसे, एवढ्या ताकदीशी त्या वाघाने का झुंज द्यावी ? एका हरणासाठी ?

कोरोना आणि चीन - निकोलस वेड यांचा लेख

लेखक केदार भिडे यांनी शुक्रवार, 21/05/2021 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
कोरोना विषाणू चीन मधून मुद्दाम पसरवला गेला का यावर चर्चा सुरु आहे. मुद्दाम नाही पण अपघाताने तरी तो प्रयोगशाळेतून आला असावा याकडे निर्देश करणारा निकोलस वेड यांनी लिहिलेला मोठा लेख बुलेटिन नावाच्या १९४५ पासून अस्तित्वात असलेल्या मासिकात प्रसिद्ध झाला. शेखर गुप्तांनीही या लेखाची दखल घेतली आहे. ------------------------- निकोलस वेड यांचा बुलेटिन मधील लेख ------------------------- ३० मिनिटे किमान लागतील वाचायला. शक्य होईल त्यांनी जरूर वाचावा.

चहा घेणार?

लेखक आगाऊ म्हादया...... यांनी शुक्रवार, 21/05/2021 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज जागतिक चहा दिनानिमित्त हे स्फुरले. गोड मानून घ्या. आवडले/न आवडले तरी कळवा. जुना विषय काढण्यासाठी, विचारले मी चहा घेणार? तोच विषय टाळण्यासाठी, विचारते ती चहा घेणार? नको वाटले छप्पर आणि नको वाटले काही काही, खरे छान वाटले जेव्हा म्हणालास तू, चहा घेणार? फिके पडावे अत्तर ऐसा गंध हे पेय धारण करते, उकळीन ह्याला आले घालूनी, तू थोडा चहा घेणार? कारण नसता भेटीसाठी, कशास उगाचच भेटायाचे , तरी कुठूनसा येईन मी बघ, विचार फक्त चहा घेणार? चर्चांसाठी, वादासाठी किंवा आणखी कशाहीसाठी, निमित्तमात्र एक बुलावा, ऐक ना रे चहा घेणार?

कावळ्याची फिर्याद

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 21/05/2021 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
सद्दपरीस्थीतीत एकमेकाची भेट तर होऊ शकत नाही म्हणून अधुन मधून एकमेकाची मोबाईल, टेलिफोन विचारपुस करणे हा अलिखित नियमच झालाय. आजच गावाकडं मावशीला फोन लावला, सर्वसाधारण इकडची तीकडची विचारपुस झाल्यावर विषय करोनाच्या महामारी कडे वळाला. बोलता बोलता मावशी म्हणाली आज आपल्या गावात २१ दशक्रिया विधी आहेत, आमक्या तमक्याचा नंबर आकरावा आहे, दुपारी अडीच ची वेळ मीळाली. हल्ली विधी करण्यासाठी माणसं पण मीळत नाहीत. विषयाला गंभीर वळण लागतय पाहून विषय बदलला, म्हटंल काळजी घ्या वगैरे वगैरे बोलून फोन ठेवला. दुपारचा दिड वाजत होता, सौभाग्यवती म्हणाल्या स्वयंपाक झालाय जेवून घ्या.

# तुम्ही(च) म्हणालात

लेखक सुरिया यांनी शुक्रवार, 21/05/2021 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा मित्रों...... तुम्ही म्हणालात, लॉकडाऊन मुळीसुध्दा आवडत नाही. व्हायरस फिरतोय सगळीकडे, घरी निवांत बसवत नाही. ऐकून इकडे माझ्या समोर काळे फंगस दिसू लागले प्रवचणार होतोच नॅशनली पण व्हीसीवर भागवून दिले. लॉकडाऊन म्हणजे शहाणपणा, माझ्या वस्तादीत तुझी कुस्ती लॉकडाऊन म्हणजे सिरमची लस, अर्धी महाग अर्धी सस्ती लॉकडाऊन म्हणजे तत्वज्ञ मी, थोडा गुरु थोडा टागोर, लॉकडाऊन म्हणजे अठरा तासाची लावत बसतो रोज लगोर. पण तुमच्यासारखं असं कुणी माझ्यावरती रुसतं का? इतकी माया करुनही नशीब ममतावरच हसतं का? तेव्हापासून रागावून मी एकही करार केला नाही वाटलं होतं इथेच बन

भ्रम

लेखक सरीवर सरी यांनी शुक्रवार, 21/05/2021 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
विस्मरणाच्या जाळीत गुंतलेल्या जीवनात भ्रम झुळूक होतात... कधी निसट्तात कधी मुळ उपटतात भ्रम पावले चोरतात.... मनीचे गुंजन गातात दु:खाला चिमटीत पकडतात भ्रम रूप दाखवतात.... काळ्या ढगांत उन्हाचे अस्तित्व भ्रम सर्वांग जाळतात... आठवणींना वर्तमानात गडद रंगवतात भ्रम खोल दरीत राहतात.... मनाच्या,कल्पनेच्या,अस्तित्वच्या....असंख्य जागी...