Skip to main content

तेजस्विनी

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 07/06/2021 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
"सर तेजू" सब ठीक है बा? "हो. तुम्हाला वेळ आहे ना?" कुछ तो कांड जरुर है, थांब एका ठिकाणी बसुन घेतो. "दादा आला होता. २५ हजाराचा कॅमेरा देउन गेला. मी पारंपारिक पद्धतीने पाया पडले. खुपच इमोशनल झाला.अगदी कनफेशनल मोड मध्ये. कारण नसताना रायवलरीत वर्षे फुकट गेली, वगैरे वगैरे. एवढा मोठा बदल? काय जादू केलीस? "त्याला आई ने ठरवलेल्या मुलीशी लग्न करायचे नव्हते आणि आईच्या विरोधात जायची हिंमत नव्हती. कधी नव्हे तो माझ्याशी बोलला. मी समोरून नकार येइल अशी व्यवस्था केली. खलनायकी?

आंबा

लेखक मालविका यांनी सोमवार, 07/06/2021 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
आंबा जन्माने आणि कर्माने कोकणातच वाढल्याने आंबा हा अगदी जिव्हाळ्याचा विषय. चिपळूण जवळच्या गावात स्वतःची हापूस आंब्याची बाग असलेल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आल्याने फक्त आणि फक्त हापूस आंबाच आवडणे हे माझे जन्मसिद्ध कर्तव्य मी आजतागायत पार पाडत आले आहे. घरी तसे इतरही आंबे असतातच. पण एकदा जी हापूस ची गोडी लागली ती काही अजून सुटायला मागत नाही. मुंबई ला कामाला असताना देखील भर मे महिन्याच्या कोकण रेल्वे च्या चेप गर्दीत देखील आंब्याचे बॉक्स घेऊन ठाणे स्टेशन ला उतरलेली आहे.

इंद्रधनू....

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी सोमवार, 07/06/2021 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रधनू... निरोप घेताना म्हणालो मी, माझी आठवण ठेव.. नशिबापुढे हतबल आपण, जोड्या ठरवतो देव.... क्षणात सारं बदललं तरी, विसरू कशी तुला..? तिचे साश्रुपूर्ण नयन, विचारत होते मला.... निशब्द शांततेत घुमला, उदास तिचा उसासा.. पण हात हाती घेऊन दिला, तिनंच मला दिलासा.... केली जरी प्रीती, पण सोडली नाही नीती.. अपराधासम खंत कशाला, सोड मनातील भीती.... शब्द असे पडता कानी, धरिले तिचे पाय.. परमहंस नाही गं मी, पण तू आहेस शारदा माय.... शेवटच्या त्या भेटीमध्ये, मनं झाली साफ.. विशाल हृदयाच्या तिनं, केलं मला माफ.... आयुष्यात आता पुढे जाईन, बाळगणार नाही तमा.. खूप समाधान देऊन गेली, तिची अनमोल क्षमा.... भांबावल
काव्यरस

हंस दर्शन

लेखक जुइ यांनी सोमवार, 07/06/2021 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
हिवाळ्याच्या सुरुवातीपासून फेसबुकच्या स्थानिक फोटोग्राफी समुदायांवर हंसांचे फोटो बरेचदा दिसू लागले. आम्ही राहतो त्या मिनेसोटातल्या इतर ठिकाणी व ट्वीन सिटिजमधेही काही ठिकाणी हंस जवळून पाहता येतात असे कळले. ते फोटोज पाहून आपणही हंस पाहायला जावे असे प्रकर्षाने वाटू लागले. अखेर २७ फेब्रुवारीला उत्तम हवामान अन इतर गोष्टी जुळून आल्या अन आम्ही Vadanis Heights येथील Sucker Lake ला जायला निघालो. घरुन जालावर शोधून Sucker Lake Pavilion 2 चा पत्ता ठरवला होता. परंतु फोनच्या जीपीएस प्रणालीत नेमका Sucker Lakeच्या दक्षिणेकडल्या पार्कींग लॉटचा पत्ता टाकला गेला.
Taxonomy upgrade extras