हिवाळ्याच्या सुरुवातीपासून फेसबुकच्या स्थानिक फोटोग्राफी समुदायांवर हंसांचे फोटो बरेचदा दिसू लागले. आम्ही राहतो त्या मिनेसोटातल्या इतर ठिकाणी व ट्वीन सिटिजमधेही काही ठिकाणी हंस जवळून पाहता येतात असे कळले.
ते फोटोज पाहून आपणही हंस पाहायला जावे असे प्रकर्षाने वाटू लागले. अखेर २७ फेब्रुवारीला उत्तम हवामान अन इतर गोष्टी जुळून आल्या अन आम्ही Vadanis Heights येथील Sucker Lake ला जायला निघालो. घरुन जालावर शोधून Sucker Lake Pavilion 2 चा पत्ता ठरवला होता. परंतु फोनच्या जीपीएस प्रणालीत नेमका Sucker Lakeच्या दक्षिणेकडल्या पार्कींग लॉटचा पत्ता टाकला गेला. तेथील ट्रेलवर २० मिनिटे पायपीट केल्यावर गोठलेल्या तळ्यात हंसच काय इतरही पक्षांचे दर्शन होत नसल्याने आमची चलबिचल होऊ लागली.
हंस निघून गेले की काय असाही विचार मनात येऊ लागला. अखेर जॉगिंग करणार्या एका भल्या माणसाकडे चौकशी केली. तो म्हणाला मी स्वतः अजुन पाहिले नाहीये. परंतु इतर लोक तिथून पुढे उत्तरेकडे सरळ चालत जाऊन झाडीतल्या पायवाटेने उजवीकडे जाऊन तिथल्या ओढ्याजवळ हंस बघायला जात असतात. त्याच्याकडून ही मोलाची माहिती मिळताच आमच्यात पुन्हा उत्साह संचारला. आमची पावले ट्रेलवर वेगाने पडू लागली.
झाडीतल्या पायवाटेने पुढे गेल्यावर लांबवर एका पायावर उभा असलेल्या धानस्थ हंसाचे दर्शन झाले. शेजारी बरीच बदके होती.
पायवाटेने आणखी पुढे गेल्यावर लोकांची वाढणारी वर्दळ व त्यांच्या चेहर्यांवरचा उत्साह जाणवू लागला.
अखेर आम्हीही त्या ओढ्याजवळ पोचलो अन हंसांच्या समुहाचे पहिले दर्शन झाले.
पर्यटकांच्या वर्दळीचा हंसांवर कुठलाही परिणाम होताना दिसत नव्हता. ते स्थितप्रज्ञासारखे इकडून तिकडे फिरत होते किंवा त्यापैकी काही ओढ्यापलिकडे बर्फाच्छादित जमिनीवर उभे होते.
काही हंस तर ओढ्याच्या किनार्यावर येऊन पर्यटकांना एकदम जवळून दर्शन देत होते.
अचानक एका हंसाने आवाज काढला. तो Trumpet आवाज सारखाच होता. ते पाहून आमच्या कन्येने चौकशी केली की त्या हंसाने Trumpet कुठे लपवले आहे. ते हंस Trumpeter Swans प्रकारचे होते. मिनेसोटातले Trumpeter Swans फारसे स्थलांतर करायच्या फंदात पडत नाहीत.
लहानपणापासून हंसांचे वांङमयीन वर्णन बरेचदा वाचले होते. पण मनातल्या प्रतिमेहूनही त्यांचे प्रत्यक्ष दर्शन अधिक उत्कट असल्याची जाणीव यावेळी झाली.
तिथे १०-१२ मिनिटे घालवल्यावर आमची पावले परत फिरली. हंसांचे विलोभनीय रूप मनात साठवून आम्ही तृप्त भावनेने घरी परतलो ते दर हिवाळ्यात हंसाचे दर्शन घ्यायचे मनोरथ ठरवूनच.
योगायोगाने परवा फेसबुकवर कुणीतर हंसांच्या जोडप्याचा त्यांच्या पिलांसह फोटो टाकला. ते तळं आमच्या घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर होते. वीकांताच्या मुहूर्तावर आम्ही तिथे सकाळीच जाऊन धडकलो. त्या तळ्यात भरपूर जलपर्णी व वॉटर लिलीची रोपे दिसत होती. त्यामुळे सहजपणे हंस दिसत नव्हते. दुर्बीण वगैरे घेऊन फिरणार्या काही जणांकडे चौकशी केली असता ते बदक तळ्याच्या दुसर्या कोपर्यात आहेत असे कळले.
आम्ही आमचा मोर्चा तळ्याभोवतीच्या वाटेने तिकडे वळवला. एका ठिकाणी मासेमारीसाठी उभारलेला डेक होता. त्या शेजारून जाणार्या आजी आजोबांकडे चौकशी केली असता त्यांनी हाताने इशारा करून सांगितले की ते पहा हंसांचे कुटुंब आपल्या दिशेनेच येत आहे. ते पाहून आमचा उत्साह अनेक पटींनी वाढला. आम्ही डेकवरून त्या कुटुंबाचे मनसोक्त दर्शन घेतले. जोडप्याला ७ पिले होती. त्यापैकी सहा एका पालकाजवळ अन सातवे दुसर्याजवळ राहत होते किंवा एकटेच फिरत होते.
जलपर्णींमुळे फोटो स्पष्ट निघू शकले नाहीत.
एकाच वर्षांत दोन ऋतूंमध्ये हंसांचे दर्शन झाल्याने आम्हाला आत्यंतिक समाधान मिळाले.

एकाच वर्षांत दोन ऋतूंमध्ये हंसांचे दर्शन झाल्याने आम्हाला आत्यंतिक समाधान मिळाले. Taxonomy upgrade extras
वाचने
17770
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर.
Trumpeter Swans म्हणत असतील .
In reply to सुंदर. by कंजूस
सुरेख!
देखणा पक्षी ....फोटो अतिशय आवडले
ओह
In reply to देखणा पक्षी ....फोटो अतिशय आवडले by ज्ञानोबाचे पैजार
नीरक्षीरविवेके हंस आलस्यम्
In reply to देखणा पक्षी ....फोटो अतिशय आवडले by ज्ञानोबाचे पैजार
वा श्रीगुरुजी हा श्लोक माहित नव्हता...
In reply to नीरक्षीरविवेके हंस आलस्यम् by श्रीगुरुजी
व्याघ्रः सेवति काननं च गहनं
In reply to वा श्रीगुरुजी हा श्लोक माहित नव्हता... by ज्ञानोबाचे पैजार
सरस्वती ध्यान मंत्र
In reply to व्याघ्रः सेवति काननं च गहनं by श्रीगुरुजी
हेलया राजहंसेन यत्कृतं
In reply to सरस्वती ध्यान मंत्र by ज्ञानोबाचे पैजार
काकस्य गात्रं यदि काञ्चनस्य
In reply to हेलया राजहंसेन यत्कृतं by श्रीगुरुजी
माता शत्रुः पिता वैरी येन
In reply to काकस्य गात्रं यदि काञ्चनस्य by प्रचेतस
एकेन राजहंसेन या शोभा सरसो
In reply to माता शत्रुः पिता वैरी येन by ज्ञानोबाचे पैजार
नैर्मल्यं वपुषः तवास्ति वसतिः
In reply to एकेन राजहंसेन या शोभा सरसो by प्रचेतस
कर्तुं यच्च प्रभवति
In reply to नैर्मल्यं वपुषः तवास्ति वसतिः by श्रीगुरुजी
काकस्य गात्रं यदि काञ्चनस्य
In reply to कर्तुं यच्च प्रभवति by प्रचेतस
अरेरे, चुकून परत टाकला.
In reply to काकस्य गात्रं यदि काञ्चनस्य by श्रीगुरुजी
वा ! सुभाषितमाला सुंदर आहे.
In reply to अरेरे, चुकून परत टाकला. by श्रीगुरुजी
बक: श्वेत: हंस : श्वेत:
In reply to वा ! सुभाषितमाला सुंदर आहे. by सुबोध खरे
भाग्यवान आहात. सुंदर
खासचं
मस्त
झकास.
वा वा, किती सुंदर !
सुंदर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We must never forget or diminish the sacrifices of those who gave everything for this nation. :- Jim Walshभारी आहेत हे हंस
सुंदर!
सुंदर वर्णन
हा एकच हंस +१
In reply to सुंदर वर्णन by धर्मराजमुटके
अजून एक -
फारच सुन्दर.. सर्व फोटोज खूप
मनःपूर्वक धन्यवाद
मिनेसोटा
माझेही दोन पैसे....
धागा परत उघडला... १४ वर्ष
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - I know that I am intelligent, because I know that I know nothing. :- Socratesसुंदर वर्णन आणि फोटोज