Skip to main content

मन

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी गुरुवार, 19/03/2009 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
मन..... मन आभाळ आभाळ... मन पाऊस पाऊस.. मन आभास आभास... मन सुवास सुवास... मन चांदवा चांदवा.... नभी चांदण्याचा थवा मन पाखरु पाखरु.... मन पारवा पारवा.... मन वेल्हाळ वेल्हाळ... मन कल्लोळ कल्लोळ मन तुफ़ान उधाण... मन पान सळ्सळ..... मन अथांग सागर... मन निळे निळे पाणी... मन आठ्वांचे मोती... मन विरहाची गाणी..... मन हवंस हवंस.... मन नकोसं नकोसं.... मन चांदणी पुनव... विना चंद्राची आवस...... मन कधी ऐलतीर... मन कधी पैलतीर...... मन होउन नावाडी.... तुला भेटण्या अधीर.... मन काहुर-प्रतिक्षा... मन कासाविस आशा.... वाट पाहून पाहून.....

साहित्य अकादमी आणि चेतन भगत-बिगत वगैरे

लेखक अ-मोल यांनी गुरुवार, 19/03/2009 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळीच टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक "विनोदी" लेख वाचनात आला. इंग्रजीमध्ये बुकर बिकर अशी तथाकथित प्रतिष्ठेची पारितोषिके मिळवणारे लेखक म्हणे साहित्य अकादमीकडून डावलले जातात, असा हास्यास्पद आरोप त्यात करण्यात आला आहे. यंदा बुकर मिळवणारृया अडिगा यांचाही त्यात उल्लेख आहे. यापुर्वी बुकर मिळालेल्या भारतीय लेखकांचे काही वाचलेले नाही, मात्र अडिगा यांच्या व्हाईट टायगरला बुकर मिळाल्यावर उत्सुकतेने कादंबरी वाचली... आणि प्रचंड निराशाच पदरी आली. बुकर सारखे "प्रतिष्ठित" पारितोषिक मिळण्याइतकी गुणवत्ता या कादंबरीत खरंच आहे का, असा प्रश्न पडला.

शेवगाच्या शेंगा घालून वांगी आणि कोलंबी भाजी वीथ सुरमय फ्राय

लेखक चित्रादेव यांनी गुरुवार, 19/03/2009 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
स्टेप १: कांदा + सुखी लाल मिरची+ चिंच टाका चांगले ढवळा पाच एक मिनीटे step-1 स्टेप २: कोलंबी टाकून लाल तिखट +गरम मसाला + हळद टाका आता. step-2 स्टेप ३:आले लसूण पेस्ट आणि काजू टाका step-4 स्टेप ४:भाजलेली खसखस टाका

मैत्रि

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी गुरुवार, 19/03/2009 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री ध्यानी मनी नसताना.... आयुश्यात एका क्षणी.. मैत्री प्रवेशते.... हिरव्या श्रावणात हातावर रंगलेल्या ... मेंदी सारखी.... आयुश्यभर आठवत रहाते.... मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं..... मैत्री म्हणजे... कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं ..... घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं.... हळव्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं...... मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं..... प्रेम ! परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोश्ट !...... मित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'...... मैत्रीतुनच फ़ुलतात नाती....

"नेणीव" आवडला

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 18/03/2009 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
नेणीव भावला प्रती, नीरज हाय, काय म्हणतोस कसा आहेस गेली जवळ जवळ १ वर्षे आपली भेट नाही त्यापुर्वी दररोज भेटणारे आपण आपली कॉलेजेस बदलल्याने गेल्या वर्षात भेटलेलो नाही .आपली मैत्री जरी विविध पायावर उभारलेली असली तरी त्याचा पाया म्हणजे दोघाना मनापासुन आवडणारा संदीप खरे आहे हे तु लगेच मान्य करशील ,सांगायची गोष्ट अशी की की कालच अगदी पहिल्या रांगेत बसुन नेणीवेची अक्षरे बघायचा योग आला म्हणजे मी चान्स मारला .आयला त्या संदीप खरेना लेख दील्यानंतर व त्यावर त्यांची प्रतीक्रीया आल्यानंतर मी हवेतच गेलो होतो म्हणले आता पुढचा कार्यक्रम पह

कोण तूं रे कोण तूं ?

लेखक सुभाष यांनी बुधवार, 18/03/2009 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
कोण तूं रे कोण तूं कालिकेचे खड्ग़ तूं ? की इंदिरेचे पद्म तूं ? जानकीचे अश्रु तूं ? की उकळता लाव्हाच तूं ? खांडवांतिल आग तूं ? की तांडवांतिल त्वेष तूं ? वाल्मिकीचा श्लोक तूं ? की मंत्र गायत्रीच तूं ? भगिरथाचा पुत्र तूं ? की रघुकुलाचे छत्र तूं ? मोहिनीची युक्ति तूं ? की नंदिनीची शक्ति तूं ? अर्जुनाचा नेम तूं ? की गोकुळीचे प्रेम तूं ? कौटिलाची आण तूं ? की राघवाचा बाण तूं ? वैदिकाचा घोष तूं ? की नीतिचा उद् घोष तूं ? शारदेचा शब्द तूं ? की हिमगिरी नि:शब्द तूं ? की सतीचे वाण तूं ? वा मृत्युला आव्हान तूं ? शंकराचा नेत्र तूं ?

<अस्वस्थ मन!>

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 18/03/2009 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: प्रेरणा यांची "मन" ही कविता.. काय करु आज विडंबनाची हुक्की आली.. ह. घ्या. कधी सकाळी उगाच पोट दुखुन येतं.. टाकीतलं पाणी नेमकं तेव्हाच आटुन जातं.. पाण्याची जाण, फक्त, कोरडा नळ देतो! तेव्हा फक्त टिश्यु पेपर मदत करु पाहतो.. थरारलेल्या क्षणांमागे मन जाऊन लपतं.. ते क्षण सरले की मग खुद्कन हसतं! काल काय खाल्ले मन पुन्हा उकलू पाहतं.. पुन्हा असे खायचे नाही, वेडं, शपथ घेउन जातं! भरलेल्या ताटावरती पुन्हा फिरून येतं.. थरारलेले क्षण पुन्हा विसरुन जातं..
Taxonomy upgrade extras

<तुझ्या नशेविना>

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 18/03/2009 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : शिवापा यांची "तुझ्या दु:खाविना" ही कविता अजुन किती वेळ जाईल? तुझी नशा कुठपर्यंत राहिल? रात्र संपलीय पण हँगओव्हर छळतोय नशेत झिंगल्यागत मी अजुन चालतोय कुठलाच विचार येत नाहि तुझ्या नशेविना अवचित फुटलेला ग्लास काळजाचे ठोके चुकवतो टेबलावरचा प्रत्येक प्याला तुझाच भासतो प्रत्येक रात्री वाट पहात राहतो बाटलीची झोपही येत नाहि तुझ्या नशेविना जाग आल्यावर लिंबु सोड्यासाठी घसा आसुसतो तुझी नशा उतरल्यावर एकदम बावरतो कधितरी थांबेलच पिणं, झिंगणं हे सर्व हँगओव्हरचे हेहि संपेल पर्व बेवड्यांच्या रांगेत पुढे सरकतांना बार बंद व्हायची वेळ आली हे कळताना पिणे सोडणे तेव्हढेसे कठिण रहाणार नाहि अवेळी प्यायची
Taxonomy upgrade extras

वय

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 18/03/2009 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
खास माझ्या लेकींसाठी लिहिलेली कविता. वय तुझे फुलण्याचे, वार्‍यासंगे बोलण्याचे इवल्याशा पंखांवर आसमंत पेलण्याचे आपल्याच सुरांमध्ये गात आपलीच गाणी आपल्याच रचनेच्या सौंदर्याला भाळण्याचे कधी खुळ्या वसंताचे, कधी दाहक ग्रीष्माचे आग पिऊन सूर्याची, चंद्रबिंब माळण्याचे वय तुझे भुलण्याचे, अधांतरी चालण्याचे मनाच्या धुंदीत नव्या तालावर डोलण्याचे तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली, तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे तुझी स्वप्ने जपताना ज्यांचे वय ओसरले, त्यांनी भाग्य दिले तुला हिरेमोती तोलण्याचे
Taxonomy upgrade extras

भारतातील हिन्दु लोकसन्ख्या

लेखक अबोलि यांनी बुधवार, 18/03/2009 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकराना नमस्कार, आजच हि मेल मला मिळाली. आपल्या प्रतिक्रिया आपेक्शित.... (लवकरच भारतात कायमचे जाण्याच्या तयारित असलेलि) अबोलि मिपाच्या धोरणानुसार सदर मजकूर अप्रकाशित करत आहे याची नोंद घ्यावी. -- (संपादक) अदिती