मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोण तूं रे कोण तूं ?

सुभाष · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कोण तूं रे कोण तूं कालिकेचे खड्ग़ तूं ? की इंदिरेचे पद्म तूं ? जानकीचे अश्रु तूं ? की उकळता लाव्हाच तूं ? खांडवांतिल आग तूं ? की तांडवांतिल त्वेष तूं ? वाल्मिकीचा श्लोक तूं ? की मंत्र गायत्रीच तूं ? भगिरथाचा पुत्र तूं ? की रघुकुलाचे छत्र तूं ? मोहिनीची युक्ति तूं ? की नंदिनीची शक्ति तूं ? अर्जुनाचा नेम तूं ? की गोकुळीचे प्रेम तूं ? कौटिलाची आण तूं ? की राघवाचा बाण तूं ? वैदिकाचा घोष तूं ? की नीतिचा उद् घोष तूं ? शारदेचा शब्द तूं ? की हिमगिरी नि:शब्द तूं ? की सतीचे वाण तूं ? वा मृत्युला आव्हान तूं ? शंकराचा नेत्र तूं ? की भैरवाचे अस्त्र तूं ? की ध्वजाचा रंग तूं ? वा बुद्धिचा श्रीरंग तूं ? कर्मयोगी ज्ञान तूं ? की ज्ञानियांचे ध्यान तूं ? चंडिकेचा क्रोध तूं ? की गौतमाचा बोध तूं ? तापसीचा वेष तूं ? की अग्निचा आवेश तूं ? मयसभेतिल शिल्प तूं ? नवसृष्टिचा संकल्प तूं ? द्रौपदीची हांक तूं ? प्रलंकराचा धाक तूं ? गीतेतला संदेश तूं अन् क्रांतिचा आदेश तूं ! संस्कृतीचा मान तूं अन् आमुचा अभिमान तूं ! कोण तूं रे कोण तूं.......कोण तूं रे कोण तूं 'महाराज' या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ग्रंथातून साभार .

वाचने 2439 वाचनखूण प्रतिक्रिया 1