Skip to main content

<बाकी ते फुगणेच खरे>

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 23/03/2009 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: विशाल कुलकर्णी यांची "बाकी ते रुसणेच खरे" कविता. ह. घ्या. तुझे ते खाणे भरमसाठ आठविता गं जीव घाबरे घास मावेना तोंडात चरण्या दिवस ना पुरे तु मावेना कवेत आता बघ आरशात एकदा सखे बांधा तुझा आता बघवेना खाण्याचे भान तुला नुरे वजनाचे भान काही तुला चालता भुकंपाचे हादरे पुन्हा डोकावणे स्वयंपाकघरात बकासुराची बहिण का गं तु गडे मणभर भात ताटात वरणाचे वाहते झरे उपाशासारखे जेवण ओरबाडणे तुझे बाकी ते फुगणेच खरे आपला (विडंबक)मराठमोळा

कृष्णमय--

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 23/03/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
गोरी राधा हरी सावळा अव्दैताचा रम्य सोहळा सगुण होउनी सखा श्रीहरी सहज छेडतो मुग्ध बासरी राधा तोचि तोच बासरी मनात तोचि तोच अधरी स्वरातूंन तो तोच सुरांतून हरी खेळतो कणाकणातून गोप्-गोपिका तोच र्निमितो वेड लावुनी रास खेळतो होउन यमुना धुंद वाहतो हरी सावळा हरी रहतो त्रिगुणात्मक तो तोच गुणातीत विश्वात्मक तो तोच कणातीत तोच लिहीतसे माझे हे गीत श्रीहरी चरणी नित्य समर्पित
Taxonomy upgrade extras

वयाप्रमाणे बदलत जाणारी मतं

लेखक भडकमकर मास्तर यांनी सोमवार, 23/03/2009 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
बारा वर्षांपूर्वी कॊलेजमधून बाहेर पडलो होतो त्यावेळी काही विशिष्ट बाबतीत माझी ( आता असं वाटतं की) टोकाची मतं होती. त्याबद्दल मी शक्य तेवढा वाद घालत असे.हल्ली असं लक्षात यायला लागलंय की मी आता तितका हट्टी उरलो नाहीये. जगाला वाटेल ते जगाने करावं, आपण कोण सांगणारे? असं हल्ली वाटतं... १. लग्नसमारंभातली उधळपट्टी : मुलगे आणि मुली आपल्या आई-बापांचे पैसे लग्नाच्या चैनीत हक्काने का उधळतात, हा मला पडलेला प्रश्न असे..वरवर आनंदी दिसलो तरी मी तेव्हा कोणतेही लग्नसमारंभ मनापासून अजिबात एन्जॉय करू शकत नसे.... असल्या उधळपट्टीच्या लग्नात उपस्थित राहणं नको असंही वाटत असे.

माझे महान प्रयोग - १

लेखक दशानन यांनी सोमवार, 23/03/2009 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
मागील आठवडा असाच झोपून घालवला, खुप कंटाळा येतो नाही असं बेड वर पडून राहणे, पण ह्या रविवारची सकाळ जरा वेगळीच होती मस्त पैकी अंगात तरतरी जाणवत होती व शक्ती आली आहे असे वाटत होते, त्यामुळे विचार केला चला आज जरा बाहेर पडू, थोडा वेळ बागेत फिरलो, हिरवळीचा आनंद घेतला. रविवार होता त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद होता, , युवक-युवती मस्त पैकी सकाळाच्या कोवळ्या उन्हात गप्पा मारत होते, दोनचार आजोबा टाईप व्यक्तीमहत्वे त्यांच्या कडे चोरून चोरुन पाहत गप्पा मारत होते...

येरगुंडे गुरुजी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 23/03/2009 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
हं तु उभा राहा रे, नवीन आलाहेस ना? नाव काय तुझं? अं..गुर्जी माझं नाव विशाल कुलकर्णी आहे! कानफटात आवाज काढीन ! बापाचं नाव घ्यायला लाज वाटते का? पुर्ण नाव सांग. आणि गुरुजी म्हणावं राजा, गुर्जी नाही, समजलं ? हो गुरुजी. माझं नाव विशाल विजय कुलकर्णी. आधी पुण्याला होतो, वडिलांची बदली झाली म्हणुन इथे कुर्डुवाडीला आलो. आज पहिलाच दिवस आहे शाळेत माझा. हं, ठिक आहे. पाटी बघु तुझी. गुरुजींनी माझी पाटी घेतली, माझ्याच पेन्सीलने त्यावर एक ओळ लिहीली....ते मोत्यासारखे अक्षर मी पाहातच राहीलो. हे घे, आता या ओळी सुवाच्य अक्षरात फळ्यावर लिही आणि नंतर सगळे मिळुन तास काढा.

बाकी ते रुसणेच खरे

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 23/03/2009 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे ते लाजणे गालात आठविता गं रात्र सरे शब्द ओलावणे ओठात स्मरण्यां दिवस ना पुरे तु नसशी कवेत आता बघ अशांत मन झुरे बांध वेदनांचा तुटेना शुष्क डोळ्यांत स्वप्न तरे मन विसरु पाही तुला मज सुन्न एकांत सावरे पुन्हा डोकावणे स्वप्नात जखमांचे ते भान ना उरे अन थांबलेले डोळ्यात आसवांचे वाहते झरे लटके ओशाळणे तुझे बाकी ते रुसणेच खरे विशाल

भूल

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 23/03/2009 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
खुळावले नयन, झाले धुंद सख्या हळुवार तुझी चाहूल संपले अवचित सारे भास मनाला पडली कसली भूल स्तब्ध जाहला, अवखळ वारा वाजता तुझे नि:शब्द पाऊल पाचोळाही अन नाद देतसे बघ उगा तुझ्या येण्याची हूल विसरले श्वास, तुझाच ध्यास तु असा कसा रे उंबर फूल पांघरलेली गात्रांवर ओली खुळावल्या दंवबिंदुंची झूल विशाल

गिरिश

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 23/03/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी नेहमी प्रमाणे ऑफिसला निघालो. सोसायटिच्या समोरच्या मैदानात काही मुले क्रिकेट खेळत होते, एक दहा-बारा वर्षांचा मुलगा बॉलिंग करत होता, त्याचा कडे पाहुन माझे पाउल अचानक थांबले, तो पळत आला आणि त्याने डाव्या हाताने जोरात बॉल टाकला आणि त्याने बॅट्समन ला बोल्ड केले. त्याला पाहुन माझ्या डोळया समोर गिरिश उभा राहिला. गिर्‍या माझा बालमित्र माझा शेजारी. असाच गिरिश ला आठवत मी पुढे जाऊ लागलो आणि डोळ्यात समोर उभा राहिलं तो दिवस. मी असाच घरात लोळत पडलो होतो. पहिल्या पावसाची पहिली सर बाहेर पडत होती. शांत पणे गॅलरी जवळच्या सोफ्यावरबसुन बाहेर मस्त पाउस बघत बसलो होतो.

सागराचे मनोगत

लेखक जागु यांनी सोमवार, 23/03/2009 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
घेउनिया माझ्या शिंपल्यातील मोती खुलविता सौंदर्य तुम्ही शरीरावरती मग मला काहो कुरूप करीता ? माझ्या भोवती कचरा पसरवूनी ! नेतो मी तुम्हा पैलतिरांवरी झेलून तुमचा भार खांद्यावरी मला का तुम्ही अडकवीता ? घालुन बांध माझ्या भोवताली ! माझ्यातील जीव मारूनी तुमचे तुम्ही पोट भागवती माझ्या साठी काय हो देता ? घाण आणि प्रदुषणा वाचूनी ! माझ्यातून तुम्ही तेल शोषूनी उद्योग तुम्ही भले उभारती अतिरेकी मज स्पर्शुन जाती तुम्ही कुठे करीता माझी रखवाली ? वाळू चे माझ्या ढिग उपसती लुटता माझे अवयव तुम्ही सोशितो तुमचे सगळे छळ नारळी पुनवेच्या एका श्रीफळावरती.
Taxonomy upgrade extras

...उदयात शोध काही!

लेखक राघव यांनी सोमवार, 23/03/2009 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
चार मायेचे उत्साहाचे शब्द निराश मनाला शांत करण्यास उपयोगी पडतातच. उभारीची ताकद तर पंखात असतेच. जाणिव फक्त परत व्हावी लागते. :) अजुनी उदास का रे बोलावयास काही? की घातलेस पुन्हा ओठांस बांध काही? नेहमीच सूर्य दिसतो अस्ताचलास तुजला.. चैतन्य जागवाया, उदयात शोध काही! पेटावयास वणवा क्षणमात्रही पुरेसा.. फुलवावयास माती सरतात जन्म काही! घे कुंचला मनाचा रेखावयास जगणे रंगांत डुंबणारे आहे अजून काही! ध्येयास गाठण्याचा घे छंद अंतरी तू! भात्यात निश्चयाच्या, आहेत बाण काही! प्रेमात ईश्वराचे अस्तित्व जागताहे.. स्मरणात राघवाच्या उधळून टाक काही!! शुभम्