Skip to main content

वक्तृत्वाचे कथन..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 25/03/2009 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रमोद काकांच्या कडून प्रेरणा घेऊन.. नमस्कार मंडळी, सगळे जण बालपणीच्या आठवणी सांगताहेत. जुने दिवस सांगताहेत. मग आम्हीही होतोच की लहान.. आम्ही ही बालपण अनुभवलेलं आहेच. भलेही ते व्हेळ्यातल्या दिवसांइतकं थ्रिलिंग नसेल किंवा प्रमोद काकांच्या गीतापठणा इतकं सुरेल आणि खणखणीत नसेल.. पण म्हणून काय आम्ही आमच्या बालपणाच्या आठवणी सांगूच नये की काय्..(पु.लंच्या असामी असामी तल्या "आत्मचरित्र लिहूच नये की काय" च्या चालीत) असो.. !!! तर मंडळी मी एकदा लहान होते.. म्हणजे लहान होते तेव्हा मी नेहमी शाळा-शाळा खेळताना शिक्षिका असायचे आणि बाकी मित्र मंडळ विद्यार्थी. म्हणजे तसा तो अलिखित्(मीच केलेला) नियमच होता.

एन डी पाटिल - महाराष्ट्रातील एक लोकनेते - मुलाखत

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 25/03/2009 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या घरच्या डिशटिव्हीच्या कनेक्शनचे काहीतरी लफडे झाले आहे. वृत्त वाहिन्यांमधे फक्त झी२४तास आणि आयबीएन-लोकमत या दोनच वाहिन्या उपलब्ध आहेत. 'समथिंग इज बेटर दॅन अज्जिबात नथिंग' या न्यायाने सध्या आयबीएन-लोकमतच बघत असतो. नाविलाज आहे. पण परवा अचानक एक चांगला कार्यक्रम बघायला मिळाला. 'ग्रेट भेट' नावाचा एक कार्यक्रम असतो. त्यात आयबीएन-लोकमतचे सर्वेसर्वा निखिल वागळे हे प्रसिद्ध आणि महत्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घेतात. परवाच्या कार्यक्रमात अतिशय जुने आणि वरिष्ठ राजकारणी डॉ. एन. डी. पाटिल यांची मुलाखत घेतली गेली.

अशक्य केवळ

लेखक जयवी यांनी बुधवार, 25/03/2009 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
तुझाच वावर मनात केवळ निभाव आता अशक्य केवळ नको अता ही उगाच जवळिक पुन्हा मनाचे दुभंग केवळ तुझ्यामुळे ही फितूर गात्रे अता गुलामी तुझीच केवळ तुझी जराशी झुळूक यावी कसे जगावे उन्हात केवळ नको नव्याने तुझी उधारी हिशेब नव्हते हिशेब केवळ जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

(तु नसताना.... !)

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 25/03/2009 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा आमचे परम मैतर चंद्रशेखर महामुनी ह्यांची तु नसताना.... ! हा लेंगा घालु न वाटतो.. लुज भासतो..नाडी.. तु नसताना.... विमनस्क घरभर हिंड्तो... खुळा हासतो.. नाडी.. तु नसताना... हरपला पोटाचा सूर.. धडधडे उर.. उदरी काहुर.... डोळ्यात दाटला पूर.. रंग बेनूर... कायमचुर्णा.. तु नसताना.... [१] हा गंधीत वाहे वारा.. त्यास आवरा.. कुणी सावरा... शोधितो स्प्रे बावरा... होई कचरा.. डिओ.. तु नसताना... [२] नाकात कोंडला श्वास.. दीर्घ निश्वास.. स्तब्ध अवकाश... चालला धुर अस्तास... ओठी आभास... सिगारेटी.. तु नसताना... [३] सशक्त ओल्या अंगानी..
Taxonomy upgrade extras

आता नाही

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 25/03/2009 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
आसवांचा जुना आड आता नाही वेदनांचे तसे लाड आता नाही.. मांडला मी असा स्वप्न बाजार पुन्हा वास्तवाच्या भुता 'झाड' आता नाही.. वेदनांची खरी जाहली मज सोबत संकटांना नव्या "हाssssड", आता नाही.. कल्पनांचा मना लाभला आधार नि... जाणिवांची तशी चाड आता नाही.. झेलले घाव सारे सदा सुमनांचे अन नव्याने भ्रमर धाड ....., आता नाही विशाल

मनाच्या कुपितले-पाऊस

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 25/03/2009 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपितले या सदरातला हा सलग तेरावा लेख पाऊस दाटलेला माझ्या घरावरीही हा काल हे गाणे पुन्हा ऐकले. ऐकून बरे वाटले बाकी मी मराठी गाण्यांचा डाय हार्ड फॅन आहे हे तुम्ही जाणताच, त्यामुळे असे अर्थवाही, माझ्यासारखी पाल्हाळ न लावता थोडक्यात अर्थ सांगणारे गाणे आवडणारच ना , बाकी मी काल झालेल्या पहिल्या पावसात देखील मनसोक्त भिजलो आता टाइप करताना देखील १० -१५ दा शिंकतोय. हा आता तुम्हाला हा प्रश्न पडला असणार म्हणा की तू पावसात भिजलास त्याचा आम्हाला काय फायदा. तुझ्या अंगात मस्ती होती म्हणून भिजलास आता भोग फळ कर्माची.