Skip to main content

पुणे युनिर्व्हसिटी - अजब कारभार -सत्यघटना

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 14/04/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
(पुणे युनिर्व्हसिटीच्या अजब कारभाराची खालील घटना माझ्या सोबत घडलेली सत्यघटना. वाचा.) माझ्या एका नातेवाईकाने पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी पुणे युनिर्व्हसिटी गेल्या जुन ०८ मध्ये सोडली. नातेवाईक नाशिक सोडुन दुसर्‍या गावी कॉलेजला निघुन गेला. जातांना त्याने पुणे युनिर्व्हसिटीतून मायग्रेशन सर्टीफिकीटासाठी अर्ज करायला सांगीतला. नियमाप्रमाणे मी मायग्रेशन साठी अर्ज नाशिक विभागीय कार्यालयातुन रु. २०/- ला विकत घेतला. तो एक्सर्टनला (बहीस्थ) होता म्हणुन त्याला टी.सी. साठी सुद्धा अर्ज करावा लागेल असे विभागीय कार्यालयातुन कळाल्याने तो अर्ज रु. २०/- ला घेतला. (रेगुलर विद्यार्थ्यांचा टी.सी.

(पौर्णिमा)

लेखक राघव यांनी मंगळवार, 14/04/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजू तै ची भारी रोमॅण्टीक कविता पौर्णिमा वाचून आम्हाला आणखी एक (एकतर्फी) रोमान्स आठवला. तोच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न! :X चू. भू. द्या.

सांगा वसंत कुणी हा पाहिला

लेखक विंजिनेर यांनी मंगळवार, 14/04/2009 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
वसंत ऋतू हा कुणालाही वेड लावणारा असतो. कोरिया आणि जपानात साकूरा अर्थात चेरी ब्लॉसम जेव्हा फुलतो तेव्हा लोक वसंताच्या आगमनाला सज्ज होतात. ही रंगाची मुक्त उधळण साधारण दर ८-१० दिवसांच्या अंतराने बदलत जाते.

वाटा वेगळ्या

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 14/04/2009 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
गर्द निळाईने रंगले आभाळ शांत तळ्याकाठी दिशा विसावल्या हलकेच जरा छेडता वा-याने पाण्यात तरंग होऊन सांडल्या सोन्याची झळाळी माखलेली सांज फुलवित आली प्राजक्तपाकळ्या घुमे घंटानाद राउळाच्या दारी दूर डोंगरात झांजाही वाजल्या काजळे क्षितिज, अंधाराच्या संगे गूढ, अनामिक सावल्या जागल्या एका अवघड वळणावरून झाल्या तुझ्या माझ्या वाटाही वेगळ्या तुझ्या वाटेवर आतुर फुलांनी मुलायम गंधपाकळ्या पेरल्या माझ्या वाटेवर उदास काळोख, काट्यांचे कुंपण, भयाच्या सावल्या तुझी वाट साद सुखाची घालते, उजळीत लाख चांदण्यांच्या कळ्या माझी वाट घुटमळते एकटी, जशा पायी मणामणाच्या साखळ्या
Taxonomy upgrade extras

<उजाडले तरी .....>

लेखक पहाटवारा यांनी मंगळवार, 14/04/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा ऊदयजींची गझल : उजाडले तरी .....> मला अभिप्रेत नसलेल्या काहि कल्पना या विडंबनात द्रुश्य होत असल्या-कारणाने (ज्या मला आधी बिल्कुल लक्षात आल्या नाहित), मी हे संपादीत करतो आहे. धागा अप्रकाशीत कसा करावा हे न समज्ल्याने, सध्या संपादित केले आहे.

टोपण नाव

लेखक दवबिन्दु यांनी मंगळवार, 14/04/2009 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
माझ नाव माधव पन जुन्या काळि पालन्यात २-३ नाव ठेवायची पध्दत होती. नाव पन कशि तर जड जड आनि मोठ्ठाली. माझ नाव आत्यान ठेवल. बिन्दुमाधव. पन सगळे लोक मला माधव च म्हनतात. मी मिपावर आलो तेव्हा पाह्यल तर सर्वे लोकानी छानछान नाव घ्येतलेली होती. मग मी माज नाव बिन्दु ठेवनार होतो म्हंजे मी कोन ते कोनाला कळ्लच नस्त. पन बिन्दु नाव आहे एका नटीच. सगळे मला पोरगीच समजले असते. म्हणुन मी बिन्दुला दव जोडला. आनी माझ नाव झाल इथं दवबिन्दु. आपन लोक जर मिपावर टोपण नावाने असाल तर ते टोपण नाव कस काय सुचल, आनि तेच नाव का घ्यावस वाटल? डिटेलमधी लोवा.

... उर्फ सुगरणीचा सल्ला - ६

लेखक मेघना भुस्कुटे यांनी मंगळवार, 14/04/2009 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
आधीची लिंकः http://www.misalpav.com/node/6314 दिवसाचे दोन सरळसोट तुकडे झालेले. हापिस आणि घर. हापिसातल्या वेळाला एक अलिप्त कोरा-करकरीत वास. नव्या छत्रीवर पहिल्यांदा पाऊस पडला की जसा येतो, तसल्या करकरीत वॉटरप्रूफ पोताचा. अजून फारश्या मैत्र्याही नाही झालेल्या. नुसतंच गोड हसून साजरं करणं. उत्साहात जिम जॉइन केल्यामुळे सगळ्या दिवसालाच कॅलरीजचा धाक. मशीनमधली कितवीतरी कॉफी घेतानाही 'साखरेचा क्यूब टाकू की नको' असा धाक आणि मोहाच्या सीमारेषेवरचा प्रश्न दर वेळी. सामोशाच्या काउंटरवरून अंमळ चिडचिड करतच स्वतःला फ्रुट बोलच्या नीरस-नॉन ग्लॅमरस पर्यायाकडे वळवणं.

मी मराठी!

लेखक उमेश कोठीकर यांनी मंगळवार, 14/04/2009 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी तू मर्द गडी नसांतून मराठी वाहे नको उपहास साहू प्रश्न अस्तित्वाचा आहे! कोणी म्हणे "घाटी साले" हाण त्यांना खेटराने महाराष्ट्री मराठीच कापते का भितीने? उगीचच इंग्रजाळे गरज काय सवतीची लाज वाटते का तुला थोर माय मराठीची? सेरेमनी थ्रेड,बर्थडे सणदेखील इंग्लीश झाले! दूध असता आईला भुकटीला भरते आले! अतिथी हे देव! पण मान राखा संस्कृतीचा एकजीव व्हा ना येथे प्याला दूधसाखरेचा! शिवछत्रपती कृपा मराठी "मानाचे" झाले मर्दा टिकव अस्मिता तू देव "१०५" बोले! महाराष्ट्र देश माझा राज्य हे मराठी आहे म्हण ताठ गर्जून तू.. होय "मी मराठी आहे...!!"