भारतीय टायटॅनिक - एस. एस. रामदास
१७ जुलै १९४७ या दिवशी एस. एस. रामदास ही बोट रेवसजवळच्या काशाच्या खडकाजवळ उलटली. या दुर्घटनेबाबत अनेक लोकांना म्हणावी तेव्हढी माहिती नाही. त्याबद्दल थोडंसं -
एस. एस. रामदास ही बोट सिंदीया स्टीमशिप कंपनीच्या मालकीची होती. ही कंपनी मुंबई पासून गोव्यापर्यंत कोकणाच्या वेगवेगळ्या बंदरांपर्यंत प्रवासी वाहतूक करत असे. दुसरं महायुद्ध संपल्यावर ब्रिटीश - भारतीय नौदलाकडून घेतलेल्या ८ - १० अजस्त्र बोटी या सिंदीया स्टीमशीप कंपनीच्या मालकीच्या होत्या. यापैकीच एक म्हणजे एस. एस. रामदास. १९३६ साली बांधलेली ४०६ टन वजनाची ही बोट तीन मजली - तीन डेक असलेली - होती.
मिसळपाव