Skip to main content

एक व्य नि..!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 22/04/2009 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो, आत्ताच ऑनलाईन आलो. नेहमीप्रमाणेच मिपाबद्दल काहीना काही सूचना करणारे, कंप्लेन्टी करंणारे, एकमेकांबद्दल तक्रारी करणारे दोन-पाच व्य नि आले होते. परंतु त्यातील एक व्य नि मला खूप सुखावणारा होता, आनंद देणारा होता. त्या व्य नि तील जो मजकूर होता त्याचे श्रेय अर्थातच मिपाचे आणि मिपाकरांचे! :) आपल्याही सर्वांना त्या व्य नि तील मजकूर निश्चित आनंद देऊन जाईल या हेतूने तो व्य नि मी येथे देत आहे. व्य नि पाठवणार्‍या व्यक्तिचे नाव उघड करणे अर्थातच उचित होणार नाही.

फाशिचि शिक्षा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 22/04/2009 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
फाशिचि शिक्षा देण्याच्या निकाल पत्रावर सहि करण्या साठि निराळा पेन असतो.. निकाल पत्रावर वर सहि झाल्या नंतर न्यायाधिश साहेब त्याचे निब मोडतात. व तो पेन वापरातुन बाद करतात..हे ऎकलेले व काहि सिनेमात पाहिलेले खर आहे का? मि.पा कायदे तज्ञ सभासद यावर काहि सांगु शकतिल का?

निरोप घेताना..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 22/04/2009 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
निरोप घेताना... नमस्कार मंडळी. निरोप!! निरोप देणं आणि निरोप घेणं या जशा दोन वेगवेगळ्या कृती आहेत त्याच प्रमाणे त्यांचे अर्थही संदर्भानुसार बदलतात. "जा, जरा समोरच्या काकूला निरोप दे, दुपारी बाजारात जाऊया म्हणून." असं आई म्हणते तेव्हा समोरच्या काकूला आईनं सांगितलेलं सांगणं.. याला आपण निरोप देणं असं म्हणू शकतो. निरोप घेणं यामध्ये सुद्धा बरेच अर्थ निघू शकतात. जसं, " मी बाहेर जाते आहे, आजोबांचा फोन आला तर निरोप घेऊन ठेव." यामध्ये आजोबा जे सांगतील ते लक्षात ठेव असा अर्थ असतो.पण बर्‍याचदा"निरोप घेणं" याचा अर्थ "टाटा, बाय बाय" असाच घेतला जातो. मुलगी सासरी जाताना आई-बाबांचा निरोप घेते.

जांभुळ

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 22/04/2009 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
अंगणात माझ्या उभे जांभळाचे झाड एक त्याचे माझे नाते असे जणू बाप आणि लेक त्याच्या मायेची सावली घरावर माझ्या असे त्याच्या वा-याची झुळुक अंगावरी मोरपीसे त्याच्या फांदीवर किती नाना पाखरांची वस्ती राघु मैना चिऊ काऊ गुण्यागोविंदाने रहाती फांदीवरी चोच घासी काळा कावळा तो-यात चुळबुळ चिमण्यांची गोड त्यांचा चिवचिवाट झर झर खारुताई खालीवरी जात राही तिची लगबग बघता खुदूखुदू हासु येई झाड जेव्हा जांभुळते मन माझे उल्हासते निळी टप्पोर जाभुळे फांदीफांदी बहरते गोड गोड जांभळांचा टप्प टप्प सडा पडे सान थोर वेचिताती णिळ्या मोतियांचे सडे परी, पाउस येण्याआधी त्याच्या फांद्या छाटताती

पुण्याहून शिवथरघळीला जाण्याचा सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग कोणता?

लेखक सालोमालो यांनी बुधवार, 22/04/2009 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, उद्या मतदान झाल्यावर कुठेतरी सुट्टीचा सदूपयोग करायला जावे अशी इच्छा आहे. शक्यतो समर्थांचं ठिकाण असावं असा मानस आहे. मी शिवथरघळ आणि चाफळला जाइन असं म्हणतोय. ही दोन्ही स्थळ एका दिवसात त्रास न होता होउ शकतील का? शिवथरघळीला जाण्याचा सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग कोणता? शिवथरघळीहून चाफळला जाण्याचा सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग कोणता? सालो

मतदान करायचे तरी कोणाला?

लेखक वेताळ यांनी बुधवार, 22/04/2009 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्र ह्याचा लोकसभेला मतदान करताना ते फक्त राष्ट्रीयपक्षाना करावे हा लेख वाचला. त्यावर आलेल्या आतापर्यतच्या सर्व प्रतिक्रिया देखिल वाचल्या.मतदान करताना फक्त राष्ट्रीय पक्षाना करायचे ठरवले तर एक प्रश्न पडतो आजपर्यत त्याना मतदान केले त्यातुन काय निष्पन्न झाले. तर काहीच नाही.

उपाय सुचवा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 22/04/2009 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आग्रहाखातार मिपावासी झालेल्या आमच्या मित्राला आपण आता चांगलेच ओळखायला लागला आहात. काल आमचे हे मित्रवर्य पुन्हा एकदा त्यांचे दुर्मुखलेले थोबाड घेउन आमच्याकडे हजर झाले. आम्ही :- काय रे नरसाळ्या असा मसणऊद्यागत चेहरा करायला काय झाले ? मित्र :- वेडे वाकडे उडले राव मिपा वाले :( आम्ही :- का ? कसे काय ? मित्र :- एक तेजोभंगावर लेख काय लिहायला घेतला सगळ्यांनी पार टिकास्त्र सोडुन सोडुन तेजोभंग करुन टाकला माझा. बास आता ठरले... ह्या मिपाकर कंपुबाजांना त्राहि भगवन करुन सोडायचे ! उपाय सांग चल...

न्याय दे !

लेखक जागु यांनी बुधवार, 22/04/2009 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
न्याय दे, देवा न्याय दे, स्वर्गाचं उघडून तू दार ये ! गरीब मरतो उपाशी पोटी, धनिक राबतो प्रतिष्ठेसाठी ! तुझी प्रतिष्टा कायम राहू दे, गरीबाच्या पोटाचाही मान राहू दे ! न्याय दे ,देवा न्याय दे, कणा कणात जन्मून तू धाव घे ! अत्याचार मुरलाय जागोजागी, प्रामाणिक मुखवटा चेहर्‍यावरती ! तू आहेस प्रामाणिक दाखवून दे, सज्जनपणाला आता वाव दे ! न्याय दे, देवा न्याय दे, देव्हार्‍याचे माप ओलांडून ये ! लुटारुंच्या घरात सोन्याचा देव, लुटलेला मांडतो नवसाचा खेळ ! नवसाच्या खेळाला न्याय दे, न्यायदेवतेच्या डोळ्यांना
Taxonomy upgrade extras