Skip to main content

फाशिचि शिक्षा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 22/04/2009 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
फाशिचि शिक्षा देण्याच्या निकाल पत्रावर सहि करण्या साठि निराळा पेन असतो.. निकाल पत्रावर वर सहि झाल्या नंतर न्यायाधिश साहेब त्याचे निब मोडतात. व तो पेन वापरातुन बाद करतात..हे ऎकलेले व काहि सिनेमात पाहिलेले खर आहे का? मि.पा कायदे तज्ञ सभासद यावर काहि सांगु शकतिल का?

वाचने 4405
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

आजकाल अतीप्रगती देशात फाशीची शिक्षा दिली की ज्या लॅपटॉपवर ती तो शिक्षेचा मसुदा तयार केला जातो तो लॅपटॉपही फोडतात असे ऐकले आहे. धर्मनिरपेक्ष देशात ज्या न्यायाधिशाने ही शिक्षा ठोठावली त्यालाही काहीतरी शिक्षा देण्यात यावी यासाठी परमपुज्य जालंदर महाराज लवकरच आंदोलन करणार आहेत. तसेच धर्मनिरपेक्ष देशात संसदेवर हल्ला करण्याला फाशीतून माफी देणार आहेत असेही ऐकले आहे. खादाडमाऊ

असे ऐकले आहे कि ज्या पेनाने एकाला फाशी ची शि़क्षा दिली जाते ते पुन्हा वापरत नाहीत. काहिशी अन्धश्रध्दा म्हणा हवे तर... पण ते पेन पुन्हा वापरले जाउ नये कोणाला फाशी ची शिक्षा देण्यासाठी म्हणुन निब तोडतात असे मागे एका वकिल मैत्रिणी ने सांगितले होते.

पेन मोडणे वगैरे ही एक अन्धष्रद्धा आहे... मी त्याचा निषेध करते.

एकदा पेन मोडल्यावर पुन्हा गुन्हेगार निर्माण होता कामा नयेत पण तसे होत नाही. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

आजकाल अतीप्रगती देशात फाशीची शिक्षा दिली की ज्या लॅपटॉपवर ती तो शिक्षेचा मसुदा तयार केला जातो तो लॅपटॉपही फोडतात असे ऐकले आहे.
=)) =))

म्हणजे हे अतिप्रगतवाले पण अंधश्रद्धाळू आहेत तर.लॅपटॉप फोडताय कसला ,फॉरमॅट करून मला द्या पाहिजे तर.हल्ली शाईचे पेन इतिहास जमा झाले आहे.त्या ऊंटवाल्या कॅम्लीनच्या शाईचा खोका पण हल्ली दिसत नाही.न्यायाधिश बॉलपेन फेकुन देत असावेत काम झाल्यावर. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

डेल चा लॅपटॉप असेल तर मलाही चालेल. फक्त तो पाण्याखाली धरुन स्वच्छ धुवुन घेतला कि झालं. =))

निकाल पत्रावर वर सहि झाल्या नंतर न्यायाधिश साहेब त्याचे निब मोडतात. व तो पेन वापरातुन बाद करतात याची शहनिशा करण्यासाठी येणार्‍या नवीन सरकारने ( मायावती सरकार?) अफझल आणि कसाबला ताबडतोब फाशी द्यावी अशी आम्ही मागणी करत आहोत. ----------------------------------------------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

In reply to by अमोल केळकर

याची शहनिशा करण्यासाठी येणार्‍या नवीन सरकारने ( मायावती सरकार?) अफझल आणि कसाबला ताबडतोब फाशी द्यावी अशी आम्ही मागणी करत आहोत.
=)) =)) =)) हे जरी हास्यास्पस्द नसले तरी आपले सेन्स ऑफ ह्युमर आणि परिस्थीची जाण आवडली ... केळकरसाहेबांचा प्रतिसाद आवडला ... ------ (जज)छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

केळकरसाहेबांचा प्रतिसाद आवडला ... मलाही. इथे लोकं चर्चा करतात फाशीची शिक्षा हवी का नको आणि आपण जातोय पुन्हा अश्मयुगात, पेनाची नीब तोडतात का!! चालू द्या ... अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

ज्या लॅपटॉपवर ती तो शिक्षेचा मसुदा तयार केला जातो तो लॅपटॉपही फोडतात असे ऐकले आहे. =)) न्यायाधिश साहेब त्याचे निब मोडतात. व तो पेन वापरातुन बाद करतात. पुन्हा फाशीची शिक्षा द्यायची वेळ येऊ नये म्हणुन तसे करतात, असे ऐकुन आहे. -सँडी काय'द्याच बोला?

मी तर म्हणतो, त्यापेक्षा त्या न्यायाधीशालाच "फाशी" देउन टाकावी, म्हणजे हा प्रॉब्लेमच राहणार नाहि. ;) अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

बरोबर आहे त्यामुळे पेन आणि लॅपटॉप या दोन्ही गोष्टी वाचतील. शिवाय त्या न्यायाधिशावर पुन्हा फाशीची शिक्षा देण्याची वेळ येणार नाही :D आम्ही येथे पडीक असतो!

In reply to by रम्या

शिवाय त्या न्यायाधिशावर पुन्हा फाशीची शिक्षा देण्याची वेळ येणार नाही अगायायाया... =)) =)) _____________________________ कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?

अरे रे ! येव्हडा त्रास आणी मालमत्तेचे नुकसान होत असेल तर न्यायालयेच बंद का करुन टाकत नाहीत ? तसेही आजकाल न्यायालयाच्या निर्णयांना किंमत कोण देते ? द्रष्टा ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

बरेचदा जो मिळतो तो निकाल असतो, न्याय असेलच याची शाश्वती कुठे आहे? क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

कोर्टात न्याय मिळत नाहि..कोर्टात जो मिळतो त्याला न्याय म्हणतात

In reply to by अविनाशकुलकर्णी

हे जबरीच! सह्ही! -सँडी काय'द्याच बोला?