Skip to main content

गाठोडं

लेखक जागु यांनी गुरुवार, 07/05/2009 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टिंना ठेवावे जतन करुन आठवणींच्या गाठोड्यात गाठ बांधून ! जतन करावी एखादी ओळ गाण्याची रिकाम्यावेळी अर्थासकट गुणगुणायची ! स्मरणात ठेवाव एखाद सुख छोटसं, दु:खावर फिरवण्यासाठी मोरपिस हलकसं ! जपुन ठेवावी एखादी शाब्बासकी, खिन्न मनाची पाठ थोपटण्यासाठी ! लक्षात ठेवावं एखादं स्वप्न आगळ, उत्कर्षाच्या मार्गावर हलकेच शिपंडावं ! आठवणीत ठेवावी एखादी कथा, योग्य वळण लावण्यासाठी स्व: गाथा ! स्मरणात ठेवावी एखादी मैत्री, साठेलेलं सुख-दु:ख वाटप करण्यासाठी !
Taxonomy upgrade extras

माझ्या जमीनीच गाणं

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 07/05/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी. लई दिवसापास्न मी तुम्हास्नी माझ्या शेतावर घेवुन जायच म्हनत होतो. तो योग आज आला बघा. चला तर मग माझ्या शेतावर. माझ्या जमीनीच गाणं हि जमीन माझी काळी काळीभोर हि जमीन माझी लई दिलदार || ध्रु || हिच्यामंदी करीतो मी जोंधळा लावीतो कधिमधी हरभरा पेरावं मुठभर तर धान्य देई पोतभर || १ || हि जमीन माझी ... कोंबडी शेळी बकरं मेंढरं तसच पाळीतो मी रानपाखरं गोठ्यामंदी असती गाईगुरं वासरं || २ || हि जमीन माझी ... हि विहीर माझी लईलई भारी सतरा झरं तिच्यामंदी पानी भरी अहो मोटर चाले तास चार || ३ || हि जमीन माझी ...
Taxonomy upgrade extras

कामगार सभा

लेखक अमृतांजन यांनी गुरुवार, 07/05/2009 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी पं. हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेली गाणी ऐकत होतो...आणि नॉस्टॅल्जिक झालो. लहानपणी (५-६ वर्षाचा असेन) कामगार सभा हा रेडीओवर (व्हॉल्व्हचा) सकाळी ११.०० वाजता लागणारा होणारा कार्यक्रम मी उन्हाळ्याच्या सुटीत/इतर सुटीच्या दिवशी नेहमी ऐकत असे. "ऐरणीच्या देवा तुला..." वगैरे गाणी तोंडपाठे असत. त्यावरील अनेक गाणी कानावर पडल्यावर आजही त्या रम्य दिवसांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. मला कित्येक वर्षात माझे एक अत्यंत आवडते गाणे मात्र कुठेही मिळाले नाही- "माहेराला जा.." अशा आशयाचे ते गाणे होते. आणि दुसरी ओळ "झिम्मा खेळु" वगैरे अशी आहे. कोणाला आठवते आहे ते गाणे?

...तोच आहे.

लेखक अंकुश चव्हाण यांनी गुरुवार, 07/05/2009 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
...तोच आहे. बासरीत सूर ओतले ज्याने, नंदनवन गोकुळी फुलवीले ज्याने, तुजवरी छाया कृपेची धरणारा मुरारी श्री कृष्ण "सखा" तोच आहे ! कालियाचे मर्दन केले ज्याने, कन्साचे ताड्न केले ज्याने , तुज वादळात सावरणारा गिरिधारी श्री कृष्ण "सखा" तोच आहे ! तुलसिदलात स्वत:ला तोलले ज्याने, द्रौपदिचे लज्जारक्षण केले ज्याने , तुज दु:खाच्या भवसागरातुन तारणारा हरी श्री कृष्ण "सखा" तोच आहे ! कौरावांविरुद्ध पांचजन्य फुंकला ज्याने, अर्जुनास गीता सांगितली ज्याने, तुज आत्मबळ देणारा सुदर्शनधारी श्री कृष्ण "सखा" तोच आहे ! ही कविताही जर माझ्याकडून पुनर्प्रकाशित झाली असेल तर क्रुपया मला तसे सांगा.

उदासबोध

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 07/05/2009 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रशेखर महामुनींच्या या धाग्यावर जेव्हा प्रतिसाद आले त्यावेळी ही चर्चा अशी वळण घेईल असे त्यांना वाटले नव्हते. ते म्हणतात
आस्तिक - नास्तिक हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला एखादि गोष्ट जर नसेल पटत तर किमान समोरच्या व्यक्तिच्या भावनांचा आदर करावा असे मला मनापासुन वाटते.
सहमत आहे. या विषयी नरहर कुरुंदकरांचे विचार पटतात. ' माझा देवावर विश्वास नाही. माझा धर्मावर विश्वास नाही.

ती माझी कविता

लेखक गोगट्यांचा समीर यांनी गुरुवार, 07/05/2009 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
ती , अल्लड ,अवखळ ,चंचल सरिता ती, अद्भुत, अनोखी नव परिकथा , ती , सुन्दर,सोज्वळ,गौर रूपगर्विता, ती ,आसमन्ती, अकस्मात झलके विद्युल्लता ती माझी कविता, तीच माझी कविता ॥
Taxonomy upgrade extras

(एकदा plane मधे एक अप्सरा आणि तिची आई जवळ येऊन बसली)

लेखक संदीप चित्रे यांनी गुरुवार, 07/05/2009 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: 'स्वप्लिल मन' यांची ही सुगंधित सफर बघून काही (नको त्या) आठवणी जाग्या झाल्या !! ----------------------------------------------------------------------- एकदा plane मधे एक अप्सरा आणि तिची आई जवळ येऊन बसली journey मग ती विस्मरणीय होऊन गेली ! आईला तिच्या बरोबर पाहून मला वाईट वाटले दुर्भाग्यावर माझ्या मला नवल नाही वाटले ओढणी तिची माझ्या खा॑द्यावर पडत होती आणि तिची आई मात्र बाजूला करत होती विमान जसे उडे तसे वाटे व्हावा स्पर्श तिचा आईकडे बघून माझ्या अंगावर काटा यायचा माझी चांगली window seat तिला मी देऊ केली thank you म्हणून स्वीकारत आई मधे
Taxonomy upgrade extras

स्तोत्र-मंत्रपठण

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 06/05/2009 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच एका धाग्यावर स्वाइन फ्लूची चर्चा चालू असताना एका मिपाकर बंधूंनी स्वाइन फ्लू सारख्या रोगावर उपयुक्त (हमखास असे बहुधा म्हटले नव्हते) असा एक मंत्र सांगितला होता. मी लगेचच तो मंत्रोपचार नक्की कसा वापरायचा या विषयी चौकशी केली. त्याचे 'समाधानकारक @) ' उत्तरही मिळाले. त्यानिमित्ताने एका जुन्या शंकेचा किडा डोक्यात पुन्हा वळवळू लागला. त्या किड्याला मारण्यासाठी हा काथ्याकूट. बहुतेक स्तोत्राचे किंवा मंत्रांचे दोन भाग असतात. पहिल्या भागात मुख्य स्तोत्र आणि दुसर्‍या भागात त्याची फलश्रुती असते. उदा.

मनातंल -आतलं.. एक विचार प्रवर्तक लेख.

लेखक प्राजु यांनी बुधवार, 06/05/2009 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
आपण मराठी संस्कृतीत वाढतोय याचा अभिमान जरूर बाळगूया, पण आपल्या मराठी पणा विषयी ओव्हर पझेसिव्ह नको होऊया. कारण याचा फायदा फक्त राजकारण्यांना होतो. राजकारण खेळण्यासाठी त्यांना नवे मुद्दे हवे असतात. उद्या मराठी विरूद्ध बिगर मराठी हा वाद मिटला तर काही नाही उरलं तर विलेपार्ले(पूर्व) आणि विलेपार्ले(पश्चिम)हाही वाद निर्माण करायला ही माणसे मागेपुढे पाहणार नाहीत.. अख्ख्या जगात दहशत वाद्यांनी थैमान घातलंय, जगाला आपल्या रक्तातला शिवाजी हवाय! सारं जग 'ग्लोबल वॉर्मिंग" मुळे हैराण झालंय, जगाला आपल्या कोकणची हिरवीगार वनश्री हवी आहे!