एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली

स्वप्निल मन's picture
स्वप्निल मन in जे न देखे रवी...
6 May 2009 - 7:56 pm

एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली
journey मग ती अविस्मरणीय होऊन गेली

कोणी नाही बरोबर तिच्या पाहून मला बरे वाटले
भाग्यावर माझ्या मलाच नवल वाटले

ओढणी तिची माझ्या खा॑द्यावर पडत होती
जशी काही अ॑गावरुन मोरपीस॑ फिरत होती

गाडी जशी हले तसा स्पर्श तिचा व्हायचा
अ॑गावर माझ्या रोमा॑च उठवून जायचा

खाली होताच window seat तिला मी देऊ केली
thank you म्हणून स्वीकारत जिवणी तिची रू॑द झाली

केस तिचे माझ्या चेहर्‍याशी खेळत होते
हृदयात माझ्या आभाळ भरुन येत होते

सुवास तिच्या गजर्‍याचा म॑द येत होता
हळूहळू मला तो धु॑द करत होता

कसा गेला वेळ नाही कळले काही
न॑तर आले लक्षात नाव सुद्धा विचारले नाही

ऊतरताना हळूच माझ्याकडे पाहून ती हसली
अन् बरोबर तिच्या माझे काळीज घेऊन गेली

अजूनही तो चेहरा कायम समोर दिसतो
प्रत्येक सु॑दर मुलीत तिचाच भास होतो

असेल नशिबात तर नक्की पुन्हा भेटेल
भेटल्याभेटल्या पहिले propose तिला करून टाकेल

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

6 May 2009 - 8:04 pm | अवलिया

च्यायला ! नशीबवान आहात ! :)

आम्ही जेव्हा जेव्हा ट्रेनने प्रवास केला तेव्हा मिशाळ बाप्पे अन केसाळ छोकरेच आसपास असतात. :)

बाकी, कधी कधी लोकलमधे जागा असते तेव्हा वाटते कुणी येवुन बसावे शेजारी तर कसले काय?
कुणीतरी 'ए भाय ! हट ना! बैठने दे ! खीसक थोडा !!" असा आवाज देवुन कुणीतरी तृतीयपंथीच येवुन बसतो....

साला मुंब्रा, ठाणा, कुर्ला स्टेशन आले आणि बाजुची जागा खाली असली तर टेन्शनच असते. असो.

बाकी, तुमची अनुस्वार देण्याची पद्धत पाहुन आमच्या एका मित्राची आठवण आली.
हल्ली तो ठाण्याला असावा अशी शंका आहे.
तुम्हाला भेटला तर आठवण काढत होतो सांगा :)

--अवलिया

अवलिया's picture

6 May 2009 - 8:06 pm | अवलिया

अरे हो ! कविता छान आहे हे सांगायचेच राहिले ! विसर पडतो वयोमानानुसार हल्ली :)

--अवलिया

प्राजु's picture

6 May 2009 - 8:13 pm | प्राजु

कविता छान आहे.
तुमचा प्रवास असाच नेहमी सुगंधीत होवो. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मराठमोळा's picture

6 May 2009 - 8:31 pm | मराठमोळा

कविता छानच आहे. आवडली.

मलासुद्धा पुण्यावरुन मुंबईला जाताना शिवनेरी बसमधे एक बंगाली अप्सरा भेटली होती. सकाळी लवकरचा प्रवास होता, कदाचित झोप पुर्ण न झाल्याने ती नकळत माझ्या खांद्यावर डोके ठेवुन तास दिड तास मस्त झोपली. तिला जाग आल्यावर थोडी चर्चा झाली, त्यात ती पुण्यातच एनसीआरए मधे काम करते असे समजले, शिक्षणही चांगले होते. तिचे पाणीदार आणी काजळ घातलेले मोठे डोळे अजुनही चांगलेच लक्षात आहेत. मनात म्हंटल आता या क्षणी लग्नाची मागणी घालावी आणी हो म्हणाली तर मुंबैत उतरल्य उतरल्या लगेच उरकुन घ्यावं. अतिशय सुंदर रुप आणी बोलण्यावरुन मोकळ्या स्वभावाची आणी हुशार वाटली. पुन्हा भेटण्याचा योग मात्र आला नाही. :(

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

अवलिया's picture

6 May 2009 - 8:34 pm | अवलिया

बरे झाले नाही विचारलेस ! नकारच मिळाला असता !! :)
अरे दिड तास झोपु दिलेस ? :O
खांदा हलवुन जागे करुन गप्पा मारता येत नव्हत्या का ? :X
काय राव तुम्ही पण निस्ते खांदे देता ? छ्या !!! :D

--अवलिया

मराठमोळा's picture

6 May 2009 - 8:40 pm | मराठमोळा

>>बरे झाले नाही विचारलेस ! नकारच मिळाला असता !!
काय नाना. सगळ्यांसमोर इज्जत उतरविलीत..

>>खांदा हलवुन जागे करुन गप्पा मारता येत नव्हत्या का?
झोपेत खुपच सुंदर दिसत होती हो. कस काय उठवु? :) (खरं तर हिम्मतच नाही झाली.)

आणी हो नाव विचारायचं मी पण विसरलो बरं का..

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

अवलिया's picture

6 May 2009 - 8:44 pm | अवलिया

>>>>काय नाना. सगळ्यांसमोर इज्जत उतरविलीत..
अरे सगळे आपलेच आहेत, कुणी हसले तर सांग मला .... :)

>>>झोपेत खुपच सुंदर दिसत होती हो. कस काय उठवु? (खरं तर हिम्मतच नाही झाली.)
घ्या ! अजुन एक चुक !! :)
जर तुम्ही चुकुन विचारले असते अन ती हो म्हटली असती... बापरे !!
विचार पण नाही करु शकत ...
शेट ! तुम्ही काय तिच्या झोपलेल्या चेह-याकडेच पहात बसले असते का? शिव शिव ! :)

>>>आणी हो नाव विचारायचं मी पण विसरलो बरं का..
चालायचेच.... चुका ह्या होतच असतात. :)
परत न करणे महत्वाचे !!!

--अवलिया