Skip to main content

वर्णन

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 10/05/2009 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
वर्णन (चालः तमाशातले सवाल जबाब) अटकर बांधा गोरा गोरा खांदा ss पदर उडतोय वार्‍यावर चवळीची तू शेंग शेलाटी लवलव लवलव करती गss ग ग ग गss (माझ्या रामा तू रं ss) गोरा रंग तुझा दुधेरी ss केस काळे मखमाली हासणं तूझं मंजूळ मोठं जणू गुलाब फुलले गाली ग ग ग गss दात तुझे मोती असती ss नाक असे अणुकूचीदार भुवयी ठळक तिरकामठी नजरेचे मारती शर ग ग ग गss पाहणं तुझ चोरून चोरून ss राग तुझा लटका ग लाजलीस हे सांगाया फुका मारसी मुरका ग ग ग गss लगबग लगबग तुझं चालणं ss काम करतीया घाईत जिंकुन घेई मनास माझ्या होशी गळ्यातली ताईत ग ग ग गss
Taxonomy upgrade extras

मातृदिन

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 10/05/2009 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
"अगं, आई! कमलमूखी तू सुंदर असता रूप विधात्याचे कसे वेगळे?" ह्याचं उत्तर जाणण्यासाठी, आईला "आई"च का म्हणतात हे जाणण्यासाठी, ज्यांची आई हयात आहे त्या सौभाग्यांसाठी, ज्यांची आई हयात नाही त्या माझ्यासारख्या अभाग्यांसाठी, "बाळा! तुला लागलं कारे?" हा आईचा प्रश्न जाणण्यासाठी आईची व्यथा जाणण्यासाठी, आईचे डोळे नेहमीच ओले का असतात हे समजण्यासाठी, चिमुकली तनुली आईला काय सांगते हे समजण्यासाठी, प्रत्येक व्यक्तिच्या पोटावरची खूण कां आहे? ते जाणण्यासाठी, "आई..!

अमेरिकन मंदी- उद्धव कांबळे ह्यांचे लेख

लेखक अजय भागवत यांनी रविवार, 10/05/2009 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकन मंदी ह्याविषयावर श्री. उद्धव कांबळे ह्यांचे दोन लेख लोकसत्तेत प्रकाशित झाले आहेत. हे दोन्ही लेख अभ्यासपूर्ण असून संग्रहणीय आहेत- सध्या मिपावर श्री. क्लिंटन हे जागतीकीकरणावर उत्तम लेख देत आहेत. त्याला पुरक असाच हा विषय असल्यामुळे हे संदर्भ येथे द्यावेसे वाटले.

(जुलाब)

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 10/05/2009 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा स्वप्नयोगी यांचा गुलाब जुलाबाच्या वेळी पोटावरली लव जोरात थरथरली ते पाहुन माझी छाती मुळव्याधाच्या आठवणींनी हबकली

गुलाब

लेखक स्वप्नयोगी यांनी शनिवार, 09/05/2009 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबाच्या पाकळीवरचं दंव हलकेचं थरथरलं ते पाहुन माझं मन तुझ्या आठवणींनी बहरलं

बुचाची फुले..

लेखक पर्नल नेने मराठे यांनी शनिवार, 09/05/2009 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
बुचाची फुले कोणाला महित असल्यास महिती द्या व फोटो टाका. 8> हि फुले मी चिन्चवडला पहिलि होति. दुबइत पण गरुद ब्रिज जवल १ झाड पहिले. पण उतरता नहि आले :SS .

मी......

लेखक उमेश__ यांनी शनिवार, 09/05/2009 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
होत्या तशाच आहे,जखमा मला दिलेल्या दुसराच घाव आता शोधीत चाललो मी दावीत पाठ गेले,सारेच ते बिचारे तलवार हीच माझी रोखीत चाललो मी देईन सूर आता , माझ्याच यातनाना हे शोकगीत माझे गाईत चाललो मी कैदेतल्या सुखाची , का आस मी धरावी दु:खाताही सुखाला शोधीत चाललो मी ज्याच्यासावे निघाली, माझी सुमार स्वप्ने आभास तो सुखाचा शोधीत चाललो मी आहे फितूर स्वप्ने , माझ्या मनातली ही वेड्या मनास माझ्या फसवीत चाललो मी व्हावे अबोल आता , सार्‍याच आसवांनी श्वासात हुन्दक्याना दाबीत चाललो मी
Taxonomy upgrade extras