Skip to main content

सांगता.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 18/05/2009 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
सांगता..... लागला माझा लळा या आसवांना फार आहे जाहला नाही बरा जो , हा असा आजार आहे ! हिंडतो मी घेत कोणाच्या ठशांचा माग हा गुंफुनी हातात "त्या"चा हात ही गुलझार आहे ! बोलणे अन् वागणे जणू अमृताची धार आहे ओततो पेल्यात माझ्या वीष हा शेजार आहे ! मैफिलीने गीत माझे अन् मला वाखाणले लांब सदर्‍याआड आता .....फाटकी विजार आहे ! शेवटी रडलीस तू अन् स्वच्छ मी झालो पुन्हा जा सुखाने नांद सखये , बोलली.....मझार आहे !
Taxonomy upgrade extras

मार्केट +1300

लेखक दशानन यांनी सोमवार, 18/05/2009 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
हुर्रे !!!!!! मार्केट +१३०५ = डायरेक्ट १३४७९ वर ! निफ्ट्टी +५०० =४२०३ मजाच मजा !

बाबल्या मोचेमाडकर आणि आरती प्रभू

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 18/05/2009 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच वर्षानी मी माझ्या आजोळी म्हणजे कोकणात आजगांवला जायला निघालो होतो. आजगांवला वेंगुर्ल्याच्या मार्गाने जाताना वाटेत शिरोडं लागतं.गोव्यात पण ह्याच नावाचं एक गांव आहे.ह्या शिरोड्या गावात वि.स.खांडेकर-प्रसिद्ध सिद्धहस्त लेखक, ज्ञानपीठ अवार्डचे मानकरी-राहत असायचे.वाटेत त्यांच घर लागतं.ह्या भागात येणारे टूरिस्ट वि.सं.च घर बघायला येतात. लांबून त्यांच्या घराला नमस्कार पण करतात.

वडील

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 18/05/2009 05:57 या दिवशी प्रकाशित केले.
महिनाभर सुटी काढून आलो होतो भारतात पंचाहत्तरी विसरून उत्साहाने राहिलात एकच शल्य मनात परत येतांना वाढले फक्त तुमच्या सान्निध्यात मी किती क्षण काढले? वय विसरून विमानतळास पोचवायला निघालात "आलास, भेटलास, हेच पुरेसं" म्हणालात एव्ह्ढंसं कुठे नाव झालं सार्‍या सिनीयर सिटिझन्सना कळवलंत तुमच्या साठी मात्र वेळ नव्हता "दगदग होते हो त्याची" म्हणत सांभाळलंत दरवर्षी घरी येताना खूप सुखवेन म्हणतो मात्र परत जाताना काळाची भीती आणतो काय करतोय जगावेगळं? कसलं ध्येय? कसलं नाव? सोडून द्यावं सगळं, सगळं आता घ्यावी घरी धाव
Taxonomy upgrade extras

मदर्स डे..!!

लेखक प्राजु यांनी सोमवार, 18/05/2009 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
२६ नोव्हेंबर २००३ हा दिवस खर्‍या अर्थाने म्हणजे अगदी शब्दशः माझ्यासाठी मदर्स डे होता. नववा महिना लागून २-३ दिवसच झालेले .. थोडे कॉप्लिकेशन्स होऊनसुद्धा, महिनाभर आधी झालेलं माझं पिलू .. मला मिळालं. सी-सेक्शनसाठी दिलेली भूल उतरल्यावर जेव्हा मला जाग आली, तेव्हा फक्त मान वळवून पाहिलं तर शेजारच्या पलंगावर माझी आई बसली होती आणि तिच्या बाजूला, माझ्या आजीच्या नऊवारी साडीच्या मऊसूत कपड्यात गुंडाळून माझं येडू झोपलं होतं.. डोक्यालाही टोपड्यासारखा कपडा बांधला होता त्याच्या, त्यामुळे त्या कपड्याच्या कडेवरून मला फक्त त्याचं सरळसोट नाकच दिसत होतं..

तें ... पाकिस्तानात

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 18/05/2009 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच मी नेहमीप्रमाणे पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन' ची जालआवृत्ती चाळत होतो. नेहमी काहीनाकाही छान मिळते वाचायला. आज तर आश्चर्याची परमावधी झाली. पटकन एका कोपर्‍यातल्या बातमीकडे नजर गेली. अक्षरशः उडालो... बातमी होती... "Silence! The court is in session - Veteran stage and TV artist Rahat Kazmi directs the play of India's legendary writer Vijay Tendulkar. " http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/news/ente… तेंच्या "शांतता!

चालुकेश्या

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 18/05/2009 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा शरदिनी यांची गुढ कविता कारुण्याशा... चालुकेश्या... एक तारुण्यजालावरचा काव्यभीषण शब्दसेट मस्तकल्पनेच्या स्वयंभूधुंद अनर्थ काढा डुर्र डुर्र डुर्र डुर्र फक्ततात्याचा शब्दवैचित्र्याने दिपलेला सुन्नप्रतिसाद अन नवकवितेतून धनंजयाकडे वळणारा ग्रहणप्रवाह धड धड धक धक प्रतिसादांच्या दलदलीतला डबलबॅरल वाचकवॄंद स्व-हाताने बडवून घेतलेला अवलिया खुळखुळा खुळा रे खुळा, खुळा रे खुळा... एका काव्यपिंपळावरून पुनश्व हरि ओम केशवसुमारांची अचानक कडाडबूम चालुकेश्या ठो ठो ठो... अन मग सारंच शांत.. पुढच्या विडंबनापर्यंत...

एका आय सी यू तली आठवण

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 18/05/2009 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
कळिकाळाच्या हिंदोळ्यावर मीपण जळले रुसले तुटले अद्वैताच्या पुण्याईशी ललाटरेषा जुंपून घेते पुन्हा विखारी तल्लख अडसर अर्थव्यथेचे फ़ासे फ़सले प्राणपाखरू उडता उडता काय राहिले, कोणी न उरले १७ मे २००९, पुणे ________________________________________ एका गरीब रुग्णाच्या कुटुंबाला मोठ्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक ताकद नसल्याने कठीण परिस्थितीतून जावे लागले, तो प्रसंग पाहिल्यानंतर त्या आठवणीत लिहिलेली ही कविता आहे..... यापेक्षा अधिक स्पष्टीकरण देणे मला अशक्य आहे.... ...
Taxonomy upgrade extras

निरिक्षणाशा ...

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी रविवार, 17/05/2009 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा शरदिनीताईंची माफी मागून, माझी निरीक्षणाशा... एका निरीक्षणाचा कचराग्रस्त डेटासेट अभ्यासकाच्या पारख्या नजरेची कात्री कर्र कर्र कर्र उरलेल्या डेटाचे गायलेले भारूड अन डेटाचा म्यापकडे चुकतमाकत होणारा प्रवास लब डब लब डब नयनांच्या भोकांसमोर दिसणारे हिरवे बिंदू रक्तवारूणीच्या अंमलाखालचे विसंवादी बोल खुळा रे खुळा, खुळा रे खुळा... एका ऑब्झर्व्हेशनमधून निघणारा पेपर त्यावर होणारा अभिनंदनाच्या इमेल्सचा वर्षाव धो धो धो... अन मग सगळंच तुलनेने शांत ... पुढच्या जी.एम.आर.टी.

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे १५० नेते.. ७३ वर अत्यंत गंभीर स्वरुपाचे गुन्हे

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 17/05/2009 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाईम्स च्या या वृत्तानुसार: "....गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सुमारे १५० नेते लोकसभेवर निवडून गेले असल्याचे ताज्या लोकसभा निवडणूक निकालांनी दाखवले आहे.