Skip to main content

स्वप्नं

लेखक Gayatri Gadre यांनी सोमवार, 19/07/2021 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी अजून दोन फेरीवाले येऊन गेलेत, स्वप्नं विकायला. आठवड्यातले चौथे फेरीवाले. या सगळ्या फेरीवाल्यांना माझा पत्ता कोण देतंय याचा शोध घेतला पाहिजे. आजकाल प्रमाणाबाहेर वाढलेत. स्वप्नं तशी बरी होती, ताजी नव्हती. पण आजकाल ताजं स्वप्नं मिळतंय कुठे म्हणा. सगळी शिळीच, नवेपणाचा लेप चढवलेली, नवीन रंग किंवा सुगंधाचा फवारा मारलेली. आणि क्वचित कधी ताजं स्वप्नं आलंच बघण्यात तर लगेच मनात शंका दाटून येतात, ते विकणारा फसवत नाही कशावरून? एकंदर काय, स्वप्नांचा व्यवहार दिवसेंदिवस कठीणच होत चाललाय. डोळ्यात तेल घालून चिकित्सा करावी लागते. नाहीतर पदरचा वेळ खर्च केल्यावर लक्षात येतं फसवणूक झाली म्हणून.

डोक्याला शॉट [षष्ठी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 17/07/2021 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

डोक्याला शॉट [षष्ठी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 17/07/2021 02:48 या दिवशी प्रकाशित केले.
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

नकोसा पांढरा हत्ती (कथा परिचय : ५)

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 16/07/2021 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी कथा परिचयमालेतील या आधीचे लेख : १. कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! २. एका आईचा सूडाग्नी ३. कुणास सांगू ? ४. ‘भेट’ तिची त्याची .................. विदेशी कथा परिचयमालेच्या पाचव्या भागात सर्व वाचकांचे स्वागत ! या भागासाठी जे अमेरिकी लेखक निवडले आहेत ते जागतिक कीर्तीचे आहेत.

प्रिय मैत्रीण

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 16/07/2021 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मैत्रीण, थोड्या उशिराच पत्र लिहितेय. पण याआधी तू पण बिझी असशील. कोणी ना कोणी तुला भेटायला येत असेल,सारखे फोन चालू असतील. कदाचित एका क्षणी तुला हे नकोस झालं असेल. मला कल्पना आहे. मीही त्यातून गेलेय. म्हणूनच या गदारोळात तुला हाक नाही मारली. सावकाश नि मोकळेपणाने तुझ्याशी बोलायला आवडेल मला. वरती मायना लिहताना पटकन मैत्रीण म्हटलं तुला. खरं सांगू का?, पहिल्यांदा जेव्हा आपली भेट झाली तेव्हा अगदी बरोबरीच्या मैत्रिणीसारखीच वाटलीस मला. वयाचं अंतर चांगलंच आहे आपल्यात. पण पहिल्याच भेटीत तू मला नावाने हाक मारायला सांगितलिस. तेव्हाच जवळची वाटलीस.

टिपूर चांदणे

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 15/07/2021 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
अज्ञाताच्या ऐलतिरावर ज्ञाताचे ओझे खांद्यावर वाहुनी थकण्या आधी थोडे पैलतिरा घालीन उखाणे नश्वरतेचे लेवुनी लेणे चिरंतनाचे गाता गाणे शून्यत्वाच्या अथांगातुनी झरेल अविरत कैवल्याचे टिपूर चांदणे
काव्यरस

डॉ. गणेश देवींच्या हस्ते ४ पुस्तकांचे प्रकाशन

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/07/2021 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे ‘आदिम तालनं संगीत’ या माझ्या अहिराणी कवितासंग्रहाची व्दितीय आवृत्ती एकवीस वर्षांनंतर चेन्नईच्या नोशन प्रकाशनाकडून नुकतीच प्रकाशित झाली आहे. 1980 ते 2000 पर्यंतच्या पहिल्या आवृत्तीतील 153 (पहिली आवृत्ती डॉ. गणेश देवी यांनी बडोद्याच्या ‘भाषा केंद्रा’तून प्रकाशित केली होती.) आणि 2001 ते 2020 पर्यंतच्या 82 अशा एकूण 40 वर्षांतील 235 कविता या संग्रहात समाविष्ट आहेत. या संग्रहाची मराठी व इंग्रजी भाषांतरंही प्रकाशित झाली असून मराठी भाषांतर स्वत: कवीने तर इंग्रजी भाषांतर प्रा. राजीव कुलकर्णी यांनी केलं आहे. दुसर्‍या आवृत्तीला (डॉ.

असेहि एक विलगीकरण

लेखक shashu यांनी मंगळवार, 13/07/2021 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
अलिबाग या मुख्य शहरापासून आमचे गाव साधारण 20 किलोमीटर आहे. तसेच मांडवा जेट्टी पासून तीन-चार किलोमीटर अंतरावर एका कोपर्‍यात सासवणे गाव वसलेले आहे. आमच्या गावाला आणि आजूबाजूच्या गावांना सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या अशा समुद्रकिनारी पूर्वी स्थानिकांच्या वाडी, बाग घर होती याठिकाणी आता श्रीमंत लोकांनी जागा विकत घेऊन स्वतःचे बंगले बांधले आहेत व सुट्टीच्या दिवशी त्यांचे तिकडे येणे-जाणे होते तसेच अधूनमधून पार्ट्या होत असतात. या श्रीमंत लोकांमध्ये क्रिकेटर, फिल्मी दुनियेशी संबंधित लोक, तसेच मोठे उद्योगपती सामील आहेत.

अनुवादित पुस्तकं

लेखक पाटिल यांनी रविवार, 11/07/2021 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
वाचनाच्या मर्यादेत, मला आवडलेल्या आणि आठवतायत तशा क्रमाने काही अनुवादित पुस्तकांची यादी करतो आहे. हा उद्योग करण्याचा हेतू असा की फार पूर्वी माझ्याबाबतीत प्रॉब्लेम असा झाला होता की मराठीतलं जे जे वाचायला पाहिजे होतं, ते आता वाचून झालेलं आहे, असं वाटण्याचा एक काळ आला होता.. आणि मग त्यातून 'अजून किती काळ तेच तेच वाचून मन रिझवून घ्यायचं', असा वैतागही..‌ पण मग डायरेक्ट इंग्रजी क्लासिक्सकडं जायचं तर त्यात एक प्रकारची 'दचक' होती की ती पल्लेदार भाषा आपल्याला झेपतेय की नाही वगैरे..