स्वातंत्र्यदिन
मिसळपावच्या सर्व सदस्यांना व वाचकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा.
लहानपणापासून स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण आपण साजरे होताना पाहत असतो. शाळांमध्ये जेवढ्या उत्साहात हे सण साजरे होतात, तेवढे कॉलेज, विद्यापीठ किंवा ऑफ़िसांमधून साजरे होताना दिसत नाही. मी कॉलेजात गेलो होतो तेव्हा आठवतंय - मी, माझा वर्गमित्र आणि आणखी १५-२० विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कॉलेजातले काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून साधारणपणे ५०-६० लोकंच वेळेवर उपस्थित असत. काही शिक्षक उशीरा का होईना? पण निदान हजेरी तरी लावून जात. पुणे विद्यापीठात एम्.एस्.सी.
मिसळपाव