Skip to main content

तीन इच्छा

लेखक भागो यांनी सोमवार, 06/09/2021 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी दहावी पास झाल्यावर माझ्या बाबांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा फार वाढल्या. आपला मुलगा कमीत कमी इंजिनिअर होणारच होणार आणि लगेच पहिले विमान पकडून अमेरिकेला जाणार अशी दिवास्वप्ने त्यांना पडू लागली. ती स्वप्ने खरी झाली आहेत अश्या थाटांत कॉलर ताठ करून ते कॉलनीत फिरू लागले. तरी बरं मला फक्त एकोणसाठ टक्के गुण मिळाले होते. गणितात माझी अवस्था वादळांत सापडून वाताहात झालेल्या जहाजावरील खलाशासारखी होती. एखाद्या फळकुटाला पकडून, वादळ आणि लाटांनी अस्त व्यस्त मार खाऊन अर्धमेला झालेला खलाशी शेवटी देवाच्या दयेने किनाऱ्याला पोहोचतो तसा मी गणिताच्या पस्तीस गुणांच्या काठाला येऊन थडकलो होतो.

कागदी गणेशमुर्ती आणि प्रदुषण

लेखक चौथा कोनाडा यांनी सोमवार, 06/09/2021 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश उत्सव म्हटलं की प्लॅस्टरऑफ पॅरिसच्या मुर्ती आणि पाणीप्रदुषणाची चर्चा सुरु होतेच. पर्यावरणवादी प्रदूषणाच्या नावाने बोंब सुरु करतात आणि त्याला तेव्हढेच जोरदार समर्थन उत्सववादी सुरु करतात. मागील कोरोनावर्ष सोडले हा शिमगा दरवर्षी सुरु असतो. काही स्वयंसेवी संघटनांनी मुर्तीदान चळवळ राबवली आणि पाण्याच्या प्रदुषणाचा काही प्रमाणात अटकाव केला. काही लोकांनी शाडूमातीच्या मूर्ती वापर करून पर्यावरणाला आधारच दिला.

प्रमादाच्या पथावर

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 05/09/2021 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
वर्तमानाला फक्त प्रयासांच्या परिभाषा अवगत असतात. प्रयत्नांच्या वाटेवर पडलेल्या पावलांच्या पदरवास तो प्रतिसाद देतो. असं असलं तरी सगळ्यांनाच त्याला साद घालणे जमते असे नाही. काळाचे हात धरून चालणे जमले, तरी जुळवून घेणे जमेलच याची शाश्वती नसते. कळत-नकळत काहीतरी घडतं-बिघडतं अन् मांडलेला खेळ मोडतो. उन्हाच्या झळांनी माळाचं हिरवंपण हरवून जावं अन् बहरलेलं झाड डोळ्यादेखत वठून जावं, तसं सगळं शुष्क होत जातं. दिसामासांनी काया करपून जाताना विसकटत जातात डवरलेल्या झाडाचे सगळे संभार. एकेक करून पानं डहाळीवरून निरोप घेतात अन् भरकटत राहतात दिशाहीन. वारा नेईल तिकडे. मागे उरतात श्रीमंती हरवलेल्या डहाळ्या.

शांतीचा रस्ता –मेहेराबाद

लेखक Bhakti यांनी रविवार, 05/09/2021 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
मेहेराबादला आज पहिल्यांदा गेल्यावर अगदी असं वाटलं की “तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलाशी” किंवा ही वेळेची/काळाची परिपक्वता म्हणावी लागेल.सहसा आपण वयाची परिपक्वता म्हणतो ,पण मला वेळेची परिपक्वता हा शब्द जरा योग्य वाटतो.नाहीतर एव्हढी वर्ष मी का नाही गेले तिथे?असो.... मेहेरबाबा जन्म (२५ फेब्रुवारी १८९४; - ३१ जानेवारी १९६९) हे अध्यात्मिक अवतार होते. बाबांनी आजन्म वंचितांची सेवा केली.बाबांच्या साधनेतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे १९२५ पासून देहत्यागापर्यंत त्यांनी बाळगलेले मौन ! शांततेत धर्माची मुळे आहे आणि तिच्याशी शांततेने संवाद साधता येऊ शकतो अशी बाबांची धारणा होती.

इम्पिरिकल डेटा

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 04/09/2021 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
आले कुटीस मेटा सारे ओबीसी नेता हा इम्पिरिकल डेटा कुणी देता का हो डेटा आरक्षणाचा रेटा वकिलांना जा भेटा इलेक्शन ती येता बांधू कुणाचा फेटा 75 वर्षात भरल्या तुंबड्या जनतेस मात्र कुबड्या बाता त्या बड्या बड्या कोर्टात पडल्या उघड्या पाहिजे जरी आरक्षण सीमेवर करा त्या रक्षण सैन्यात जो दणादण त्या कुटुंबास आरक्षण येता नवीन ती पिढी नका लावू ही शिडी व्यसने दारू काडीबिडी आयुष्य नाही सापशिडी धमनीत लाल रक्त सर्वांच्याच आहे फक्त आला आता हा वक्त फेकून कुबड्या व्हा मुक्त ! फेकून कुबड्या व्हा मुक्त !!
काव्यरस

स्मरण चांदणे४

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शुक्रवार, 03/09/2021 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरण चांदणे  ४ गाव कधी  वसले याची  निश्चित माहिती नाही. कुठुनतरी स्थलांतरीत झालेल्या ब्राम्हण कुटुंबांनी इथे स्थायिक झाली असावीत.आमच्या पुर्वजांना देशमुखी कुणी  दिली ,केव्हा मिळाली माहिती नाही. माझ्या आठवणीत  आडगावशिवाय इतर काही गावात पण शेती होती.

सुटका

लेखक भागो यांनी शुक्रवार, 03/09/2021 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
थाड थाड आवाज करून आचके देत अखेर गाडी बंद पडली. डॉक्टरांना अंदेशा आलाच होता. गाडी म्हणावा तसा वेग पकडत नव्हती. डॉक्टरांनी घड्याळावर नजर टाकली. रात्रीचे साडेआठ झाले होते. त्यांनी रस्त्यावर पुढे मागे नजर टाकली. चिटपाखरू पण दिसत नव्हते. हा चिटपाखरू नव्हे पण मधुनच काजव्यांचे थवे लुकलुकताना दिसत होते. मान्सून सुरु होऊन दोन तीन आठवडे झाले असावेत. रस्त्याच्या बाजूला चिखलात बेडूक डराव डराव आवाज करत होते. रातकिडे किर्र करत होते. बस एवढीच कायती हालचाल. ह्या आडरस्त्यावर माणूस भेटायची शक्यता नव्हती, कोण येणार रात्री अपरात्री ह्या रस्त्यावर?

जनरेशन गॅॅप

लेखक भागो यांनी गुरुवार, 02/09/2021 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
पांडुरंग स्वतःवरच भनकला होता. शेजारचा श्रीरंग तो किती हुशार होता. ते काय म्हणतात न हां स्मार्ट! सगळेजण त्याची स्तुति करतात. पोरीबाळींशी बोलताना तर विचारायला नको. असा लाळघोटेपणा करतो. पण कामात मात्र चुकार. साधी बेरीज वजाबाकी करण्यात हजार चुका. वाण्याकडे सामान आणायला गेला तर वाणी त्याला हमेशा चुकीची मोड देणार! त्याचा मालक दहादा त्याच्याकडून हिशेब करून घेणार, मालक बिचारा म्हातारा झालेला, पहिल्या तारखेला येणाऱ्या पेन्शनवर सगळा महिना काढायाचा . त्याला पै न पैची काळजी असणारच. आता ह्या वयात रंग्याला काढून दुसऱ्या कुणाला ठेवायचे म्हणजे जीवाला केव्हढा घोर.

जगण्याचे कित्येक मजला अर्थही कळाले

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 01/09/2021 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
धन्य भाग देवा ऐसे प्रेम ही मिळाले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले वार्‍यावर उडणारा, मी केर, धूळ, माती येता तू सांगाती दगडांचे झाले मोती. परीस तो जाणू कैसा ,सांग काय केले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले. गहिवरले मन माझे ,ओळखले नाही तुजला र्‍हदयात काटा रुतला , माफी दे प्रेमा मजला तालाच्या सोबतीला, बासरीचे सूर आले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.
काव्यरस

पारवे पाळले होते

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 01/09/2021 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे गावात भोई मास्तरांनी पारवे पाळलेले होते. (त्यांचं आडनाव भोईच होतं.) पारव्यांसाठी त्यांनी मोठं लाकडी खोकं तयार करून घेतलं होतं. खोक्याला लोंखडी जाळी बसवलेली होती. सकाळी त्या खोक्याचं दार उघडलं की पारव्यांचा थवा बाहेर उडायचा. गल्लीत, झाडांवर, भितींवर, घरांवर सगळीकडे ते उडत- चरत विहार करायचे. आणि संध्याकाळी बरोबर त्याच खोक्यात येऊन बसत. खोक्यात ती गुटूरगूम...गुटूरगुम करायची. भुई मास्तरांचा मुलगा- सुरेश त्यांना ‘आऽ आऽ’ करून बोलवायचा. दाणे टाकायचा. पारवे त्याला ओळखायचे. त्याच्या अंगावर बसायचे. त्याच्या आजूबाजूला न घाबरता बागडायचे. हे दृश्य पाहून माझं मन हरखून जायचं.