मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इम्पिरिकल डेटा

बाजीगर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आले कुटीस मेटा सारे ओबीसी नेता हा इम्पिरिकल डेटा कुणी देता का हो डेटा आरक्षणाचा रेटा वकिलांना जा भेटा इलेक्शन ती येता बांधू कुणाचा फेटा 75 वर्षात भरल्या तुंबड्या जनतेस मात्र कुबड्या बाता त्या बड्या बड्या कोर्टात पडल्या उघड्या पाहिजे जरी आरक्षण सीमेवर करा त्या रक्षण सैन्यात जो दणादण त्या कुटुंबास आरक्षण येता नवीन ती पिढी नका लावू ही शिडी व्यसने दारू काडीबिडी आयुष्य नाही सापशिडी धमनीत लाल रक्त सर्वांच्याच आहे फक्त आला आता हा वक्त फेकून कुबड्या व्हा मुक्त ! फेकून कुबड्या व्हा मुक्त !!

वाचने 2208 वाचनखूण प्रतिक्रिया 4

पण असे काही होत नसते, बळी तो कान पिळी हे सत्य आहे. विनासायास मिळत असलेला आरक्षणाचा लोण्याचा गोळा कोणता बोका सोडेल? पैजारबुवा,