मेहेराबादला आज पहिल्यांदा गेल्यावर अगदी असं वाटलं की “तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलाशी” किंवा ही वेळेची/काळाची परिपक्वता म्हणावी लागेल.सहसा आपण वयाची परिपक्वता म्हणतो ,पण मला वेळेची परिपक्वता हा शब्द जरा योग्य वाटतो.नाहीतर एव्हढी वर्ष मी का नाही गेले तिथे?असो....
मेहेरबाबा जन्म (२५ फेब्रुवारी १८९४; - ३१ जानेवारी १९६९) हे अध्यात्मिक अवतार होते. बाबांनी आजन्म वंचितांची सेवा केली.बाबांच्या साधनेतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे १९२५ पासून देहत्यागापर्यंत त्यांनी बाळगलेले मौन ! शांततेत धर्माची मुळे आहे आणि तिच्याशी शांततेने संवाद साधता येऊ शकतो अशी बाबांची धारणा होती. विशिष्ट हातवारे किंवा मुळाक्षरांचा फलक वापरून ते संवाद साधत.अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे काम अनेक क्षेत्रात असून विविध कार्यक्रम राबविले जातात.वर्षातून तीन दिवशी येथे उत्सव असतो आणि जगभरातून त्यांचे अनुयायी येथे येतात.
प्रथम दर्शनी आपल्याला दिसतो मेहेर पिलीग्रीम रित्रिट उंच दगडी वास्तू!पुढे गेल्यावर आहे मेहेर बाबांची समाधी स्थळ.भक्कम अशी दगडी छोटीशी वास्तू जिच्या वरती घुमत असून त्यावर वेगवेगळ्या धर्मांच्या चिन्हाचे छोटे बुरुज आहेत.जी सध्या बंद आहे.बाहेरून दर्शन घेता येते.बाबांच्या आजूबाजूलाच त्यांच्या मंडळींची(विविध शिष्यगण )यांच्याही संगमरवरी दगडातील समाधी आहेत .नन्तर पुढे बाबांची रसोई,टीन शेड उजवीकडे आहे. तिथे आम्हांला योगायोगाने trusty भेटले.जे वयाने खूप वृद्ध होते आणि व्हीलचेअरवर होते.नुकत्याच त्यांच्या केअर टेकरने त्यांना औषधे दिली होती.माझ्या लहान मुलीला पाहताच त्यांनी आम्हाला थांबवले आणि मेहेर बाबांचा छोटा फोटो भेट म्हणून तिला दिला.
सगळीकडे हिरवाई आणि शांतता !हा तुकडा जणू बाहेरच्या गर्दीत हवेत तरंगतो आहे असे वाटलं.फेरफटका मारताना अनेक विदेशी अनुयायी दिसले.सध्या श्रावणात हा परिसर अतिशय मनमोहक झालाय .माझ्या डोळ्यांचे खरच पारणं फिटले.असच भटकत राहिलो तर पुढे संस्थेचीच रोपवाटिका पाहिली.विविध औषधी ,फुलांची रोपं तिथे बनवून या मोठ्या जागेत लावली जाते.सागाची मोठमोठाली झाडे बहराने फुलून गेली होती. नांगरलेल शेत,पाण्याने भरलेल्या विहिरी आणि निस्सीम शांतता !अमूर्त!मध्येच एका मोरपंखी , लांब चोच असणाऱ्या इवल्या पक्षाने दर्शन दिले !
जातांना मुख्य रोडला लागवाल्यावर मेहेरागड आहे जिथे बाबा राहायचे,त्यांची धुनी आहे.पण तो बंद होता.आता नेहमी जमेल तसं इथे डोकावणार आहेच तेव्हा पुढल्यावेळी तिथे गेल्यावर याबद्दल लिहीन.
१.मेहेराबाद आराखडा
२.मेहेरबाबा समाधी
३.
४.
५.
६.
खाली दिलेलं संकेतस्थलावर मेहेराबादला कसे पोहचायचे ,राहण्याची सोय काय,संस्थेचे काम काय ,कसे चालते आणि शांतीदूत मेहेरबाबा यांचे कार्य आणि समाधीस्थळ बांधणी याविषयी संपूर्ण माहिती आहे.
1
वाचने
11311
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर जागा.
आणि हो तुम्ही केलेल्या
In reply to सुंदर जागा. by कंजूस
खादाडी काय झाली
फलोहार :)
In reply to खादाडी काय झाली by गॉडजिला
दाक्षिणात्य भाषेत माहिती?
हा भाग मलिक अंबरकडे होता.
In reply to दाक्षिणात्य भाषेत माहिती? by तुषार काळभोर
हो नाही ,मलापण तसेच वाटले .
In reply to दाक्षिणात्य भाषेत माहिती? by तुषार काळभोर
विविध भारतीय भाषांमध्ये फलक
In reply to दाक्षिणात्य भाषेत माहिती? by तुषार काळभोर
विविध भारतीय भाषांमध्ये फलक
In reply to विविध भारतीय भाषांमध्ये फलक by चौथा कोनाडा
ज्या महाराष्ट्रात ते आहे ..
In reply to विविध भारतीय भाषांमध्ये फलक by सुक्या
डैरेक अन्याव
In reply to ज्या महाराष्ट्रात ते आहे .. by चौथा कोनाडा
खरं आहे हे.
In reply to डैरेक अन्याव by सुरिया
बघा अन्याव कोण करतंय ते तर ओळखा
In reply to खरं आहे हे. by सुक्या
या तीन गोष्टींमुळे अन्याव :
In reply to डैरेक अन्याव by सुरिया
अंत बिंत काही होणार नाही.
In reply to या तीन गोष्टींमुळे अन्याव : by चौथा कोनाडा
धन्यवाद.
धन्यवाद ,
In reply to धन्यवाद. by प्रचेतस
आटोपशीर सुटसुटीत स्थान ओळख !
धन्यवाद!
In reply to आटोपशीर सुटसुटीत स्थान ओळख ! by चौथा कोनाडा
सुंदर ठिकाण
खुप खुप धन्यवाद !
In reply to सुंदर ठिकाण by गोरगावलेकर
अरे वा!! अरणगावाचे नाव