गमन !!
णमस्कार्स लोक्स ,,,
येस .. "गमन" म्हणजे मिपावर डावीकडे मार्गदर्शक रकाण्यातला लॉग आउटचं बटण नव्हे... गमण .. म्हणजे "गमनं" च ! आज मिसळपाव होमपेज वरचा फोटू आणि तात्यानं केलेलं वर्णन पाहिलं आणि एक किस्सा आठवला . बारावी नंतर काही सरकारी कागदपत्रांच्या कामासाठी मला गणेशपेठ मधे जावं लागे. अर्थात त्या काळी ऑटो फिटो चे खर्च परवडत नसायचे .. बस ने जाण्या ऐवजी एखाद वडापाव चापता येईल म्हणुन बसने ही जाणे टाळायचोच ! कॉर्पोरेशन ला उतरलं की पदयात्रा. वाटेत पुण्याचा "फोरास रोड" लागत असे. त्या वयात ह्या गोष्टींच भलतंच आकर्षण असे. पण तिकडे जाणे कधी स्वप्नातही आणले नव्हतं. एक कुतुहलवजा आकर्षण मात्र असायचं ..
मिसळपाव