Skip to main content

(पोटभर जेवणासोबत एक चमचमीत दिवस: काही सुचतंय?)

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/06/2010 05:56 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय मिपाकरहो, या पूर्वी मी काही उपयोगी धागे काढले म्हणून कौतूक केले त्यामूळे जाहीर आनंदून मी हा धागा काढत आहे. तसे माझ्यासमोर इतरही पर्याय होते! मिपाकर नक्की मदतीला धावून येतील अशी आशा मला नाही आहे असे नाही. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी देवळातून बाहेर येणार आहे आणि मला माझ्या जीभेला एक चटकदार, टेसदार, चमचमीत, खमंग खावू घालायचं आहे. नेहमी पेक्षा थोडंसं वेगळं असं काही खाल्लं तर हा दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील. मला तिला जाम खूष करायचं आहे.

गर्लफ्रेन्ड सोबत एक रोमँटिक दिवस: काही सुचतंय?

लेखक सोम्यागोम्या यांनी गुरुवार, 17/06/2010 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय मिपाकरहो, या पूर्वी मी काही जणांवर बिनकामी धागे काढले म्हणून टीका केली त्यांची जाहीर माफी मागून मी हा धागा काढत आहे. काय करणार माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता! मिपाकर नक्की मदतीला धावून येतील अशी आशा मला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी भारतात येणार आहे आणि मला माझ्या गर्लफ्रेन्डला एक सरप्राईजिंग, रोमँटिक डेटवर घेऊन जायचं आहे. नेहमी पेक्षा थोडंसं वेगळं असं काही झालं तर हा दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील. मला तिला जाम खूष करायचं आहे. :X इतर गोष्टींची थोडी फार माहिती सांगितली म्हणजे पर्याय सुचवायला मदत होईल असे वाटते.

पावसाळी विशेषांक प्रकाशन !

लेखक प्रमोद देव यांनी गुरुवार, 17/06/2010 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आज १७ जून. आपल्या हाती आमचा हा पावसाळी विशेषांक ऋतू हिरवा देतांना मला विशेष आनंद होत आहे. सद्द्या पावसाने चांगलाच जोर धरलाय आणि अशा कुंद-फुंद वातावरणात कॉफी अथवा मसालेदार चहाचे(आपापल्या आवडीप्रमाणे) घुटके घेता घेता आमचा हा अंक वाचतांना आपला आनंद द्विगुणित होईल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. ह्या अंकात आम्ही महाजालावरील काही नामवंतांबरोबरच नवोदितांचाही समावेश केलेला आहे....तेव्हा आता करा सुरुवात वाचायला....आणि हो...अंक आवडला/नावडला तरी कृपया तुमची प्रतिक्रिया टंकायला विसरू नका बरं का. कळावे आपला स्नेहांकित प्रमोद देव

दहावीचा निकाल ऑनलाईन येथे पहा

लेखक सागर यांनी बुधवार, 16/06/2010 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या दहावीचा निकाल आहे १७-जून-२०१० खालील अधिकृत संकेतस्थळावर सकाळी ११ वाजल्यापासून निकाल उपलब्ध होतील http://mahresult.nic.in/ वरील अधिकृत संकेतस्थळाव्यतिरिक्त http://www.rediff.com/ या संस्थळावरही उपलब्ध होणार आहे अशी बातमी आहे. पण अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहिलेला उत्तम. दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा :) - सागर

हॅकर

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 16/06/2010 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
एथिकल हॅकींग म्हणजे काय? हॅकींग म्हणजे पानावर प्रवेश निषीद्ध असलेल्या ठिकाणी वावर करणे ह्याला हॅकींग म्हणतात एवढे समजते. संगणक शास्त्रातील ज्ञानाचा उपयोग करुन पासवर्ड शोधुन काढणे हे पण हॅकींग मधे मोडत असावे. पण हे एथिकल हॅकींग म्हणजे काय?

मुसळ धार पाऊस

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 16/06/2010 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुसळ धार पाऊस असतो व आपण झाडाच्या वा बस स्टॅण्डच्या आडोश्याला उभे असतो..पावसाने निम्मे तर भिजवलेले च असते.. आज झाला तसाच पाउस सुरु असतो..रस्त्यावर तुरळक वहातूक...गाड्या हेड लाईट फ़ुल ऑन करुन मंद गतिने धावत असतात.. वेगाने येण्या~या जलधारा अंगावर झेलत वसुंधरा त्रुप्त होत असते..बोचरे वहाणारे वारे झाडांशी लगट करित झाडे लयात हलत असतात.... वातावरणात एक सुखद गारवा पसरु लागतो.... रस्त्या वरुन एखादा तरुण व त्याला मागुन घट्ट बिलगलेली तरुणी पावसाची मजा लुटत होंडा मोटर सायकल वरुन जाताना दिसते.. सारे जण अंग आखडुन उभे असतात.

विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - द सांबा किंग्ज

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 16/06/2010 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
काय मग लोक्स..... काय भारी माहौल बनतोय की नाही मिपावर फुटबॉलचा? डॉन, प्रभो, मेघवेडा... धमाल उडवतायत! आकडेवारी काय, टीम्सच्या फॉर्मची चर्चा काय, मोठमोठ्या स्टार खेळाडूंची ओळख काय.... ओहोहोहो.... बहार आलिये ! बाहेर पाऊस, हातात - गरमागरम चहा / कॉफी... वाफाळणारी भजी (किंवा थंडगार बीअर आणि दाणे), आमचा गणपा म्हणतो त्याप्रमाणे "आपलं आवड्त्या व्यक्तीचा सहवास" आणि समोर चाललेला रंगतदार सामना (आणि कानांत १३७४९ डास एकदम गुणगुणावेत असा तो वुवुझेलांचा आवाज).... अशी चैन करत नसाल तर खरंच एक सोहळा मिस करताय बरं का. काय टाकलाय भौ जर्मनीनी ऑस्ट्रेलियाला... आयव्हरी कोस्ट काय खेळलं बघित्तलंत?
विशेष

दारु

लेखक श्रीराजे यांनी बुधवार, 16/06/2010 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
मित्राहो...! दारु बद्दल कमी लिहणं म्हणजे दारुचा तसेच पिणार्‍याचा अपमान केल्यासारख आहे. आतच एका मित्राने दारु या विषयावर mp3 file पाठवली.

..बावळट ध्यान..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 16/06/2010 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
बावळट ध्यान.. ==================== ढगांच्या छत्रीमागुन डोळा मारुन गेली वीज.. सोसाट्याचे वारे देखील.. सांगुन गेले लेका भीज.. तिच्याकडेच पाहात होतो.. मी मुर्ख बावळट अजुन.. झाडानेही हिंन्ट दिली दोनचार पाने टाकुन... मिठीत घे गधड्या तिला पाऊस धो धो होता सांगत.. मी पेटलेलो आतुन बाहेरुन.. होत नव्हती माझी हिंमत.. सार्या पंचमहाभुतांनी कपाळावर मारला हात.. ह्याच्याने काही होणार नाही.. ध्यान अगदी आहे पुळचाट.. उपाय शेवटचा म्हणुन वीज कडाडली भयानक.. मीच तेव्हा तिच्या मिठीत घाबरुन शिरलो अचानक.. वारा मनसोक्त हसु लागला.. ढगांमागुन वीजही.. झाडानेही घुसळवले अंग.. अन हसु लागली ती ही..
काव्यरस

पेपराचं फेफरं

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 16/06/2010 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या गोष्टीचं अतिरेकी वेड किंवा छंद उफाळला की 'आलं का फेफरं?' असा प्रश्न ग्रामीण भागात विचारला जातो. आमच्या पेपराचं फेफरं असंच नाक मुरडण्यासारखं. पेपर म्हणजे परिक्षेच्या उत्तरांचा अथवा प्रबंधाचा नसून आमच्यालेखी 'समाजमान' आणि 'भान' या संबंधाचाच आहे. कालच्या वर्तमानाचा भूतकाळ आज वर्णन करणारे ते एक 'पत्र' जरी असले तरी त्याला पाने मात्र अधिकच असतात. तसं पाहिलं तर पोस्टाचे पत्र आता कालबाह्य झाल्यातच जमा आहे. 'आपली चालू वर्षाची सदस्य वर्गणी त्वरित जमा करा अन्यथा पुढील अंक पाठविला जाणार नाही' अशा आशयाची 'पत्रे' फलाण्या बिस्ताण्या अंकाच्या संपादकाकडून वर्षभर येत राहतात.