मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दहावीचा निकाल ऑनलाईन येथे पहा

सागर · · जनातलं, मनातलं
उद्या दहावीचा निकाल आहे १७-जून-२०१० खालील अधिकृत संकेतस्थळावर सकाळी ११ वाजल्यापासून निकाल उपलब्ध होतील http://mahresult.nic.in/ वरील अधिकृत संकेतस्थळाव्यतिरिक्त http://www.rediff.com/ या संस्थळावरही उपलब्ध होणार आहे अशी बातमी आहे. पण अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहिलेला उत्तम. दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा :) - सागर

वाचने 11218 वाचनखूण प्रतिक्रिया 17

अविनाशकुलकर्णी 17/06/2010 - 00:00
तळे , नद्या ,या ठिकाणची गस्त वाढवा..झुरळ ..ऊदिर मारण्याची आउशधे लपवा..पाल्यास एकटा बाहेर सोडु नका..कमकुवत पाल्ये अपयशाने खचुन चुकीचा मार्ग धरतात..सा~यांना शुभेछ्या

टारझन 17/06/2010 - 00:33
माझा निकाल दिसत नाहीये :( निकालात निघाला बहुतेक :(((( -- टारझन निकाल निकाल .. सब कुछ निकाल

शानबा५१२ 17/06/2010 - 00:39
निकल बघण्याआगोदर येथे जावे 'जोर का झटका,धीरे से लगे' ची प्रचिती होइल.

In reply to by शानबा५१२

योगी९०० 17/06/2010 - 02:25
चांगली लिंक आहे.. कोल्हापुरची तुळजाभवानी नसून कोल्हापुरची अंबाबाई असे हवे होते. खादाडमाऊ (आई, जगदंबे, सगळ्यांना त्यांचा अपेक्षेप्रमाणे मार्क मिळू देत गं बाई)

पाषाणभेद 17/06/2010 - 11:24
माझा भाचा परीक्षा उत्तीर्ण झाला. ८५.६४% गुण मिळाले. तुम्ही दिलेल्या सायटींवरून निकाल बघीतला. समद्या ठिकाणी सारखेच गुण आसल्याचे पाहून डोळे पाणावले. काय टेक्नालाजी हाये भाऊ. जराशीक गोंधळ नाय. आमच्या येळी पेप्रात नंबर यायचा. आन पास का नापास एवढंचं. बास. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

योगी९०० 17/06/2010 - 14:11
सागर आणि मिलिंद , तुमचे आभार..येथे लिंक्स दिल्याबद्दल. माझी भाची ७५ % आणि दुसरा भाचा ८० % गुण मिळवून उत्तिर्ण झाली. त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन.. पण एक गोष्ट जाणवली. हे प्रतिशत best of five subjects च्या नुसार काढले गेले आहेत. ते काही तितकेसे पटले नाही. आमच्या वेळी हा प्रकार असतात तर मला ९०% पेक्षा जास्त मिळाले असते. (मराठीमुळे माझे प्रतिशत कमी होऊन ८५.८५ % वर आले.... जरी मराठी माध्यमातून शिकलो तरी..) खादाडमाऊ

In reply to by टारझन

योगी९०० 18/06/2010 - 02:06
नाही हो.. इतकी माझी लायकी नाही...!!! पण कधी कधी मला स्वतःचे कौतूक करायला आवडते...त्यामुळे आत्मविश्वास वाढतो..(असे माझे स्वतःचे मत आहे..IT मध्ये काम केल्याचा परीणाम दुसरे काय..?) खादाडमाऊ

अवलिया 17/06/2010 - 14:13
जे मिपासदस्य पास झाले त्यांचे अभिनंदन. जे फेल झाले त्यांनी निराश होवु नये --अवलिया

In reply to by अवलिया

II विकास II 17/06/2010 - 14:16
जे मिपासदस्य पास झाले त्यांचे अभिनंदन. जे फेल झाले त्यांनी निराश होवु नये अगदी छान लिहीलेत, नाना. बाकी तो शुध्दलेखनाचा लेख दिसत नाही तुझा.

अर्धवट 17/06/2010 - 14:14
तुमच्या मुलाला/तुम्हाला किती टक्के मार्क पडले असे विचारणारी जमात म्हणजे कोंबड्यांच्या झुंजीत कोंबडे रक्तबंबाळ झाल्यावर टाळ्या पिटणारयांपैकी आहे असे माझे स्पष्ट मत आहे. ;) (मत वैयक्तीक बरकां.. कारण आम्हाला कधी चारचौघात सांगावे असे मार्कच पडले नाहीत.) असो पण आता पडलेच आहेत मार्क तर अभिनंदन.

मीनल 17/06/2010 - 18:08
माझ्या नणंदेच्या मुलाला ओव्हऑल ९६%. टॉप फाय आणि स्पोर्ट्स मिळून ९९.०९ %. भारतात हेच मार्क कॉलेजच्या प्रवेशासाठी ग्राह्य ठरतील असे कळले. मीनल. http://myurmee.blogspot.com/

वेताळ 17/06/2010 - 18:20
१०० % मार्क घेवुन उत्तीर्ण झाले आहेत काही लोक ह्या परिक्षेत... २००८ ला माझ्या ओळखीचे दोन विद्यार्थी ९५% मार्क घेवुन उत्तीर्ण झाले होते,पण त्याना १२ वीत सत्तरी देखिल गाठता आली नाही. वेताळ

In reply to by वेताळ

विनायक पाचलग 17/06/2010 - 18:36
यात खेळाच्या २५ गुणांचा वाटा आहे हो वेताळ दादा ... एका ठिकाणी एकाला १०० % पडले आणि त्याला खेळाचे गुण २५ च्या ऐवजी १९ च दिले गेले . कारण नाहीतर मार्क ६५६/६५० असे काहिसे होतात... नाद खुळा असो सर्वाना शुभेच्छा !!!!!!!!!! ( एका परिक्षेमुळे असेच २५ गुण हुकलेला ) विनायक पाचलग वाँट टु टॉक

II विकास II 17/06/2010 - 18:34
आवडले दुवे. ज्यांचे सगळ्यांचे निकाल पाहीले ते सगळे उत्तीर्ण झाले. मनपुर्वक ध्नय्वाद.