Skip to main content

गाणे हवे आहे: नंद नंदन बिलमाई... mp3

लेखक संजय अभ्यंकर यांनी बुधवार, 23/06/2010 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
नंद नंदन बिलमाई... कजरारे घिरि माई माई रे... असे काहिसे शब्द आहेत. हे गाणे mp3 रुपात हवे आहे. हे भक्तीगीत मीराबाईचे भजन आहे. एके काळी रेडीयोवर मंगलप्रभात मध्ये वाजत असे. बहुदा लताजी किंवा सुधा मल्होत्रा ने गाईले आहे. बरेच गुगलूनही सापडत नाही. कोणी मिपाकर देऊ शकेल काय?

मासे - सरंगा (कालवण, फ्राय)

लेखक जागु यांनी बुधवार, 23/06/2010 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
सरंगे आणि, ह्या तळलेल्या तुकड्या. सरंग्याचा रस्सा (कालवण) सरंग्याच्या तुकड्या ५-६ लसूण ठेचुन ४-५ पाकळ्या हिंग, हळद २ चमचे मसाला चिंचेचा कोळ मिठ चवीनुसार तेल वाटण : पाव वाटी ओल खोबर, ५-६ लसुण पाकळ्या, अर्धा इंच आले, १ ते २ मिरच्या, थोडी कोथिंबीर. कृती : तेलावर लसुण फोडणीला टाकावा. हिंग, हळद, मसाला, वाटण, तुकड्या, चिंचेचा कोळ, मिठ घालून उकळी येउ द्यावी.

मास्टर मदन - जगाला पडलेले एक अद्‌भूत स्वप्न !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 23/06/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
मास्टर मदन मास्टर मदन (जन्म २८-१२-१९२७. मृत्यू :६-६-१९४२) २८ डिसेंबरला परमेश्वराच्या हातून एक मोठी चूक घडली. त्या चुकीसाठी मला नाही वाटत तो स्वत:ला कधी माफ करु शकेल. या दिवशी त्याने त्याच्या विश्वातल्या एका गाणार्‍या स्वर्गिय गंधर्वाला चुकून या मर्त्य जगात पाठवले. ते साल होते १९२७. अवघ्या १४ वर्षाच्या आयुष्यात गायनाच्या कुठल्या पातळीवर तो पोहोचला होता ते आता आपण बघुया. हा शापीत गंधर्व पंजाबमधल्या जालंदर लिल्ह्यातल्या एका खानेखाना नावाच्या गावात एका शीख कुटूंबाच्या घरात अवतीर्ण झाला. त्याचे नाव “मास्टर मदन”.

अफजल गुरू

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 23/06/2010 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
अफजल गुरूला फाशी होणार तर. गृहखात्याने दयेचा अर्ज फेटाळण्याची राष्ट्रपतींना शिफारस केली आहे. आता अनावश्यक आणि काल्पनिक चर्चांना पूर्णविराम मिळायला हरकत नाही. योग्य निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे अभिनंदन.

आयच्या गावात कटकट !!!

लेखक टारझन यांनी बुधवार, 23/06/2010 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , आज सकाळी उठल्याउठल्या णेहमीप्रमाणे पहिलं काम, मेलबॉक्स खोलला. (२५ नव्या मेल्स). त्यातल्या स्पॅमछाप १५ मेल्स ओपन न करता डिलीट मारल्या. काही फेसबुक अपडेट्स काही जॉब मेल्स पाहुन डिलीट मारल्यावर एक मेल उरला. एका इंजिनियरींग च्या मित्राचा होता. त्यात सात आठ फॉरवर्ड्स दिसले. मेल ओपन केली आणि डोका आउट झाला. त्यात साई बाबांची २ चित्र लावली होती, आणि काही तरी बिण्डोक मजकुर लिहीला होता. समथिंग लाईक "तुमच्या १५ मित्रांना फॉरवर्ड करा , गुडलक तुम्हाला फॉलो करेल. आमक्या ढमक्यानं केलं न त्याला त्या दिवषी संध्याकाळी २ करोड ची लॉटरी लागली.

युगलगीत : अलवार गुपित उमगले प्रितीचे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 23/06/2010 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीत : अलवार गुपित उमगले प्रितीचे
ती : अलवार गुपित उमगले प्रितीचे माझ्या मनी आज मोर नाचे ||धृ|| ती : हळूच आज सांज फुलली नभानेही लाली ल्याली लकेर घेवूनी सुरांची सुस्वर ताला सुरांचे गीत मी गातसे ||१|| दोघे : अलवार गुपित उमगले प्रितीचे.... तो : दुरवर बघ त्या डोंगर रांगी खुणावीतसे तो रंगीत पक्षी बोलावी का तुला मला तो समजेल का कधी बोल त
काव्यरस

केक्युलेचे स्वप्न

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 23/06/2010 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
'ह्या' विषयातला पहीलाच लेख असल्याने,मला ही कल्पना सुचवणा-या बि.का ह्यांना समर्पित......आणि हो अर्थातच केक्युलेला. "सफरचंद खालीच का पडल?" हा प्रश्न कोणात्या संशोधकाला पडला होता?ह्य प्रश्नाच उत्तर सर्वांनाच माहीती असेल........हो,isaac newton.मग त्याने 'गुरुत्वाकर्षण' ही कल्पना पुढे आणली व त्यावरुन कीतीतरी शोध लागले,ब-याचश्या प्रश्नांना उत्तर भेटली.'न्युटन' व 'सफरचंद' हे शब्द डोळ्यासमोर आले की हे सर्व लक्षात येत. 'केक्युलेचे स्वप्न' हे असच काहीतरी आहे.ऑरगॅनीक केमीस्ट्रीमधे ह्याच कुतुहल वर्षांनुवर्षांपासुन आहे.'केक्यलेचे स्वप्न' हे दोन शब्द लिहले की दोन चित्र डोळ्यास

अर्जेंटिना एक परिपूर्ण संघ!

लेखक संजय अभ्यंकर यांनी बुधवार, 23/06/2010 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
२०१० चा फिफा विश्वचषक जर अर्जेंटिना जिंकू शकली नाही तर ते एक आश्चर्य ठरेल. शिस्त, संयम आणी कलाकारी जी अर्जेंटिना ने आता पर्यंत दाखवली त्याला तोड नाही. खेळाडूंच्या गर्दीत गोलक्षेत्राजवळ अचूक पासिंग केवळ अप्रतिम! चेंडूवर सतत ताबा ठेवणे, आपल्याला अनूकूल परिस्थीती निर्माण झाली की हल्ला करणे. उगाच ताकतीचे प्रयोग न करता, अचुकता व नजाकतीचे SILKY Passing, सारे केवळ पहात रहावे असे. लायोनेल मेस्सी स्वतः गोल न करता सतत समन्वयाचे (provider) काम करतो हे सर्व संघांच्या फॉरवर्डसनी शिकावे असे स्कील. माझ्या अर्जेंटीनाला शुभेच्छा!
विशेष

आनंदाची बातमी

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी मंगळवार, 22/06/2010 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
अभिनंदण होSSSSSSSSSSSSSSSS गोंद्या आला रे आला गुड न्युज रे ..धमाल 'बाबा'?? ऐ कोण आहे रे तिकड जा जा हत्ती वरुन साखर्‍या वाटा बारा- गुंजण मावळात , तळ कोकणात तोफांची सलामी द्या धमाल रावांच युवराज आले म्हनाव कळु दे जरा लोकांना आमचे स्नेही व मित्र श्री धमाल मुलगा ह्यांना मुलगा झाल्याची गोड बातमी कळाली ! धमाल मुलाचा धमाल बाबा झाला होSSSSSSSSSSSSSSSSSSSS