Skip to main content

हरिहरेश्वर...!!

लेखक अस्मी यांनी शुक्रवार, 23/07/2010 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
हरिहरेश्वर....कोकणातील निसर्गरम्य तीर्थस्थान एका बाजूला हिरव्यागार वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसर्या बाजूला स्वच्छ व निळा समुद्र तसेच नारळी पोफळीच्या बागा..

माझ्याबाजुला बसलेली ती.

लेखक शानबा५१२ यांनी शुक्रवार, 23/07/2010 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
दीवस कोणता होता माहीती नाही,मी दुपारी बांद्रयाला जायला निघालो होतो.ट्रेनसाठी प्लॅटफॉर्मवर गेलो.ट्रेनमधे व बाहेर फारशी गर्दी नव्हती.पाउस पडुन छान गार वातवरण तयार झाल होत व सावली पडल्यासारख झाल होत.........असो. मी अगदीच गबाळा व लोफर दीसत नव्हतो.अनेक वर्षांनंतर 'शर्ट व पँट'(फॉर्मल) अंगाला लागत होत्,म्हणुन जरा अवघडल्यासारखा वागत होतो.जरा इकडे तिकडे नजर फीरवली,नाही म्हणजे आपण कोणाच 'लक्ष' तर नाही ना हे बघायला.अर्थात त्याचा उद्देश हाच की हस होउ नये.काहीजण मला 'चैन उघडी आहे' अस का नाही सांगत हे समजत नाही. ट्रेन सुटायला आली तेव्हा रीकाम्या जागा परप्रांतिय लोक भरु लागले.मी चौथ्या सीटवर बसुन मस्त सेकंड

असा कसा रे तू मर्द गडी..

लेखक भारतीय यांनी शुक्रवार, 23/07/2010 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या रविवारी भिमाशंकरला फिरायला म्हणून जाताना एका छोट्याश्या गावात द्रुष्टीला पडलेल्या एका फलकावरील ही चारोळी... बहूदा हे गाव निर्मलग्राम योजनेत सहभागी असावं... "असा कसा रे तू मर्द गडी.. फिरायला ५० हजाराची गाडी.. बायकोला २ हजारची साडी.. राहायला २ मजली माडी.. तरी बायका-पोरांना हगणदारीत धाडी.. असा कसा रे तू मर्द गडी, शौच्यालय बांध ताबड्तोब घरी.. नाहीतर मिशि कापून ये मागल्या दारी.." =))

आईचा मुलगा हरवला.. (लोकल गोष्टी-५ )

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 23/07/2010 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
आईचा मुलगा हरवला.. =========================================== ऑर्कुटवरील 'काव्यांजली' या कवितासंबंधित फोरमचा ठाण्यात दुपारी चार वाजता काव्यवाचनाचा कार्यक्रम होता.. नाव चेहरे नसलेले लोक साक्षात एकमेकांसमोर अवतरणार होते.. यातले काही आधीच्या कार्यक्रमांमुळे जमणाऱ्यांच्या माहितीतले.. मी मात्र पहिल्यांदाच जात होते.. किंबहुधा काव्यवाचन ऐकायला आणि करायलाही पहिल्यांदाच जात होते.. त्यातून कार्यक्रम ठाण्याला जिकडे माझे सहसा जाणे होत नाही. त्यामुळे एक वेगळीच अस्वस्थता, हुरहूर कम भीती मनाला घेरून होती. वेळेवर पोहचता यावं म्हणून घरातून मी दीड-पावणेदोन तास आधीच निघाले..

पाध्यांचे मनोगत

लेखक नितिन थत्ते यांनी शुक्रवार, 23/07/2010 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
निवेदनः संपादकांच्या अधिकारांबाबत नाराजी व्यक्त करून वातावरण कलुषित केल्याचे प्रायश्चित्त म्हणून काही दिवस स्वसंयमाची रजा घ्यायचे ठरवले होते. त्यामुळे गढुळलेले वातावरण निवळेल असे वाटले होते. परंतु दुसर्‍या बाजूकडून अपेक्षित असलेला संयम दिसला नाही. आणि मुद्दाम खाजवून काढल्याप्रमाणे धागे -- धागे येत राहिले. (आणि ते उडाले नाहीत). म्हणून प्रायश्चित्त रद्द करून पुनरागमन करीत आहे.
काव्यरस

छोटे छोटे प्रश्न...!

लेखक श्रीराजे यांनी शुक्रवार, 23/07/2010 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका वृत्तपत्रातले कात्रण ई-मेल मधुन आले. त्यातील प्रश्न मलापण नेहमी पडतात. उत्तरे मात्र मिळत नाहीत.... खालील काही मजेशीर प्रश्न तुमच्यासाठी: १) मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्रजी पेपरपेक्षा कमी का? - (माझ्या पाहण्यात काही ठीकाणी सारखाच भाव आहे.) २) उडप्याच्या हॉटेलात कांदाभजी का मिळत नाहित? ३) लहान बाळाशी बोलताना मोठी माणसं बोबडं का बोलतात? ४) 'मीचं म्हणून तुमच्याशी संसार केला' असं प्रत्येक बाई आपल्या नवर्‍याला का म्हणते? :?

आभार प्रदर्शन..

लेखक भारतीय यांनी शुक्रवार, 23/07/2010 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
आणि एकदाचे आम्ही येथे दाखल झालो आहोत..!! येथे ज्या दिवशी खाते बनवले, त्याच दिवशी मी जात पडताळणीसाठी सूद्धा अर्ज केला होता.. जातपडताळणी अर्ज केन्व्हाच मिळाला , पण इथले सदस्यनाम काही सक्रीय होत नव्हते..! मी उगीचच सरकारी कर्मचार्यान्ना कामाच्या दीरन्गाईबद्दल दूषण देत असतो.. बरे, ते असो.. इथे प्रवेश दिल्यबद्दल सम्पादक मन्डळीन्चे मनापासून आभार.. आणि खासकरून शिल्पाताइन्चे विशेष आभार.. तुम्ही चान्गले सहकार्य केले येथे येण्यासाठी..

टाईम पास

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 23/07/2010 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
जॅमर (पूर्वीचा सदैव भरवाडगे (पूर्वीचा जर्क)) चित्र जालावरून साभार

हायब्रिड जमाना

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 22/07/2010 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
साऱ्‍या दुनियेचं हायब्रिडिंग झालंय. नवनव्या संकरित बियाण्यांपासून उपजलेली निसत्व पिके खाऊन शरीर पोकळ बनलेय. धान्यांच्या बिजापासून ते स्त्री-पुरुष बिजापर्यँत सर्वच ठिकाणी संकरित जग विस्तारलंय. पूर्वीची माणसं ऐटीत जगायची, हसता हसता गचकायची, कळायचंसुद्धा नाही. आता मरणाचंही हायब्रिडिंग होत असतं! आजकाल सहज, सुखनैव मृत्यु येतच नाही. किमान दोन दिवस तरी कृत्रिम श्वासावर मेलेल्या म्हाताऱ्‍यांना ताटकळत ठेवतात. (पुरेसं बिल वसूल झाले की मगच डेथ डिक्लिअर करतात!) जगणेसुद्धा संकरितच म्हणायचे. कारण गर्भ रहावा म्हणून गोळ्या, तो टिकावा म्हणून इंजेक्शने, सुखरूप प्रसूतिसाठी अनेक उपचार सुरू असतात.