Skip to main content

चांदणचुरा

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 30/11/2021 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
वाहावतो चांदणचुरा तुझ्या उंबर्‍याशी दाटतो गहिवर मंद श्वासांशी|| चालतो अनवट वाटा पैंजणांच्या लयीने ऐकतो ह्रदयभाषा नयनांच्या तीराने|| उधळतो चांदणफुले गुंफलेल्या हातांनी झेलतो चंद्रमरवा गंधाळलेल्या मिठीने|| मिटते रात्र मंदफूल गवाक्षी झुले वारा पडते प्राजक्तभूल रंगला चांदणचुरा|| -भक्ती

पद्मश्री बा. भ. बोरकर सादर अभिवादन......

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 30/11/2021 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
सेवानिवृत्ती नंतरच्या गोष्टी ज्यांनी माझे मन प्रफुल्लित ठेवलं त्यांपैकी एक म्हणजे मराठी कवीता. शाळेत असताना कवीता फक्त टक्के वाढवण्यासाठी वाचल्या. त्यातील थोड्या लक्षात राहील्या बाकी आयुष्यात टक्के टोणपे खाताना विस्मृतीत गेल्या. सेवानिवृती मुळे वेळच वेळ आणी मराठी पुस्तके, मासिके व अतंरजाला वर वाचण्यासाठी भरपूर साहित्य. जितेंद्र अभिषेकी आवडते आणी " कट्यार व हे बंध रेशमाचे ", नाटकां मुळे जवळून पाहण्याची संधी मिळाली.त्यांचा व बोरकरांचा जवळचा संबध. ते बोरकरांचा उल्लेख नेहमी करायचे. पु ल देशपांडे आणी सौ सुनीताबाईचें यू ट्यूबवर कवीता वाचन आणी मुलाखती व चर्चा पाहिल्यावर उत्सुकता वाढत गेली.

युवर बाॅस इज नॉट ऑलवेज राईट..

लेखक आजी यांनी मंगळवार, 30/11/2021 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका रेडिओ स्टेशन वर काम करत होते. तिथं माझे नियरेस्ट बाॅस-म्हणजे माझ्या पोस्टच्या फक्त एकच स्तर वरचा असलेले बाॅस होते. त्यांना आपण क्ष म्हणू. आमच्या दिल्ली ऑफिस मधून एकदा एक ७/८पानी बाड आलं. इंग्रजी भाषेत. त्यात भारताच्या प्रगतीचा आढावा घेणारा मजकूर होता. ते 'क्ष'नी मला दिलं. म्हणाले,"बाई याचं भाषांतर करा. अर्जंट आहे. एअरवर घालवायचंय." माझं एक वैशिष्ट्य आहे. माझ्या इतक्या वर्षांच्या नोकरीत ,अगदी मी तरुण आणि लहान वयाची असताना आणि अगदी रिटायर होईपर्यंत माझ्या ऑफिसातल्या एकाही पुरुष किंवा स्त्री कलीगने मला नावाने कधीही हाक मारली नाही. प्रत्येक जण "अहो बाई"च म्हणायचे.

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 30/11/2021 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना सर्वांना नमस्कार. नुकताच उत्तराखंडमध्ये कुमाऊँ परिसरामध्ये फिरण्याचा योग आला. हा योग असतो आणि तो योग असेल तरच फिरणं होतं. अन्यथा कितीही नियोजन करून फिरणं होत नाही. हिमालयामध्ये फिरण्याची ही दहावी वेळ होती. ह्यावेळी हवामान खूप सुंदर होतं, त्यामुळे दूर दूरचे बर्फ शिखर दिसत होते. अनेक ठिकाणी ट्रेकिंग करता आलं. आणि सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे दुर्गम अशा मानस सरोवर- कैलास पर्वत यात्रा मार्गावर गूंजी व काला पानी अशा अतिशय दुर्गम जागी‌ जाता आलं. गेल्या वर्षीच २०२० मध्ये इथे जीपचा रस्ता सुरू झाला आहे.

B.1.1.529

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 29/11/2021 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
मश्गूल मानवा थेट डिवचून हताश करून पुरे मास्कवून ज्ञानविज्ञानाला कुंठित करून जुन्या गृहितांना निष्प्रभ करून चाकोर्‍या आडाखे मोडून तोडून कल्पने पल्याड पायंडे पाडून वाटले गेला तो कायम निघून... गनिमी काव्याने माघार घेऊन, अस्पष्ट, दुरून, कोण हे बोलते? "पुन्हा मी येईन" "पुन्हा मी येईन"
काव्यरस

‘शेजाऱ्या’चे ओझरते दर्शन

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 29/11/2021 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या २५-३० वर्षांत आपल्यापैकी अनेक जणांच्या कुटुंबात वा नात्यात कोणी ना कोणी परदेशी गेलेले किंवा जाऊन आलेले आहे. पर्यटन, शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय अशा अनेक हेतूंनी लोक परदेशात जातात. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या गाठीशी परदेश प्रवासाचे विविध अनुभव साठलेले असतात. जेव्हा विविध कारणांमुळे होणाऱ्या कौटुंबिक मेळाव्यांना लोक एकत्र जमतात तेव्हा हटकून परदेशातील अनुभवांची देवाणघेवाण होते. असाच एक मेळावा एकदा आमच्या घरी भरला होता. त्या समूहातील ६ जण विविध देशांमध्ये जाऊन आलेले होते. अमेरिका कॅनडापासून ते ऑस्ट्रेलिया जपानपर्यंत अनेक देशांच्या अनुभवांवर गप्पा चालू होत्या.

आठवणी ५ - पुणे -१

लेखक मनस्विता यांनी रविवार, 28/11/2021 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणी १ - प्रस्तावना आठवणी २ - मु. पो. बारामती आठवणी ३ - आठवणींच्या शिंपल्यातले खेड आठवणी ४ - मु. पो. इस्लामपूर आईच्या आग्रहामुळे आम्हा भावंडांच्या शिक्षणाला स्थैर्य यावं ह्यासाठी, पुण्यात राहण्याचा निर्णय घेतला आणि आमचा बाडबिस्तरा कायमचा पुण्याला हलवला. त्यामुळे बाबा बदलीच्या गावी आणि आम्ही मुलं आईबरोबर पुण्यात अशी आमची व्यवस्था ठरली.

माझा देव

लेखक शब्दानुज यांनी शनिवार, 27/11/2021 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
हातातल्या चावीचा जुडगा सावरत त्यातली नेहमीची चावी वेगळी केली आणि समोरच्या कुलुपाला लावली. बराचवेळा चावी फिरवूनही कुलूप काही उघडेना. शेवटी कुलुपाला धरून जोरात ओढले. कुजलेल्या बिजागरीने कुलपाची साथ सोडली आणि कुलूप हातात आले. कडीही निघून खाली पडली. आत काय असणार याचा मला पुरेपुर अंदाज होता. तरीही मनाची खात्री करून घेण्यासाठी आत डोकावून बघितले. दहा रुपयाच्या दोन नोटा एका कोप-यात पडून होत्या. दुस-या कोप-यात एक कोळी आपले जाळे मांडून बसला होता. त्या दोन नोटा बाहेर काढून मी खिशात टाकल्या आणि देव्हा-याकडे निघालो.समोरची गणेशची मुर्ती माझ्याकडे रोखून बघत होती.

आठवण एका साथीदाराची...

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 27/11/2021 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
27 नोव्हेंबर 2001 ला पहिल्यांदा Voice of Russia ची हिंदी सेवा ऐकण्यासाठी संध्याकाळी साडेसहाच्या काही मिनिटं आधीच कार्यक्रमपत्रिकेवर लिहिल्याप्रमाणे त्या लघुलहरींवर नभोवाणी संचाची (रेडिओ) सुई नेऊन ठेवली होती. ठीक साडेसहा वाजता या नभोवाणी केंद्राची signature tune वाजू लागली आणि पाठोपाठ उद्घोषणाही ऐकू आली - ‘ये रेडिओ रुस है, हम मॉस्को से बोल रहें हैं।’ हे ऐकून खूपच प्रफुल्लित झालो.