निद्रेची चिरफाड
निद्रादेवीची कुंडली मांडून तिला समजून घेणं फारसं अवघड नाहिये. ती आपल्यावर का बरे रुसलीये याचीही उत्तरे मग शोधता येतात. पूर्वीची माणसं उशाला दगड घेऊनही प्रगाढ झोपत असत असे म्हणतात. याउलट आजच्या सिमेंटच्या जंगलात दगड सापडणे दुरापास्त झाल्यामुळे की काय कोण जाणे, माणसांना मऊ उशा अंगाखाली घेऊनही 'म्हणावी तशी' झोप लागत नसते. किंबहुना अशी तक्रार नेहमी कानावर येते. त्यामुळेच निद्रेची चिरफाड करण्याचे योजिले आहे.
तर ती निद्रादेवी एकटी नसून त्या दोन जुळ्या बहिणी असतात. भिन्न स्वभावाच्या, विरोधी आचरणाच्या. रात्रभर त्या फेर धरुन कधी झिम्मा, कधी लपाछपी तर कधी खोखो खेळतात.
कोलेस्टेरॉल कसे कमी करावे ?
सध्या माझे कोलेस्टेरॉल (LDL) फार वाढले आहे. simvastatin घेत आहे. एका चर्चेत वाचला कि एक मिसळपावकर फक्त diet वर कोलेस्टेरॉल कमी करतात. मला ति चर्चा सापडत नाहीये. ते मिसळपाव कर मला मदत करतील का?
कलात्म :- गोष्ट नव्या विचारांची... !!!
मध्यंतरी कलात्म हा विशेषांक वाचल्यानंतर लिहिलेले काही ...
कला हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच, कलेच्या विविध अंगावर सातत्याने चर्चा होत आलेली आहे. त्याशिवाय, वेगवेगळया perspective ने त्याचा अभ्यासही झाला आहे, होत आहे. मात्र कलेचा सामाजिक अंगाने फारसा अभ्यास झालेला दिसत नाही, निदान मोठ्या प्रमाणात झालेला नाही असे मला वाटते . म्हणूनच या विषयाला वाहिलेला "कलात्म" विशेषांक हे एक युनिक प्रॉडक्ट आहे. तसे पहायला गेले तर कलेवर सामाजिक अंगाने १० वर्षापूर्वीच काही व्हायला हवे होते , नाही का? पण, ते आत्ता होतयं!! असो , देर हे लेकिन दुरूस्त है !
छोट्या जाहिराती.
डिस्क्लेमर : हा धागा काढण्यामागचा उद्देश कुणाच्याही भावना दुखवाव्यात असा नाही. त्यातून , कुणाला तसे (अकारण) वाटल्यास त्या सर्वांची आधीच घाऊक माफी मागत आहे.
एका वृत्तपत्रात अलिकडे वाचलेल्या छोट्या जाहिराती :
१. पाहिजे : पूर्वी सारखी टिकणारी मेंदी. रंग दोन दिवसांत जाऊन विचित्र दिसायला नको. पक्का हवा.
२. पाहिजे : पडल्यापडल्या झोप लागेल असा पलंग. झोप येईल अशी खोली. खोलीत जाऊन झोपावेसे वाटेल असे घर. घरात राहावेसे वाटेल अशी जीवनशैली. शैली परवडेल असे जीवन.
३. पाहिजे : श्री. पांडुरंग पंढरपूरकर यांच्याशी एकदा तरी भेट घडवून आणून देईल असा एजंट.
हिंदीतून मराठीकडे
मराठीतून हिंदी चित्रपटांची गाणी तयार करता येतील काय?
उदा
तुला पाहिले तर जाणवले मला सजणी,
प्रेम असते हे वेडे सजणी
(तुझे देखा तो ये जाना सनम)
बघा प्रयत्न करुन......
काव्यरस
एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा
एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा
एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||धृ||
किती वारी चालू आता किती दिंडी चालू
संसारातून सोडवी आता नको वेळ घालू
आतूरले डोळे माझे वाहे चंद्रभागा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||१||
किती ग्रंथ वाचले अन म्हटल्या मी ओव्या
संतांच्या साथीने कितीक आरत्या म्हणाव्या
शिणलो रे मी आता होई पापभंगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||२||
जळावीण मासा जिव धरी कैसा
मायेविणा पोर प्रेम पाही जैसा
नको धरू राग आ
काव्यरस
मेंदीचा दरवळ
मागच्या आठवड्यात कोणाला तरी मेंदीची आठवण आली. आणि मग राखी पौर्णिमेला मेंदी काढूया असे ठरले. इथे पाकिस्तानी दुकानात मेंदीचे तयार कोन मिळतात. पण त्यात कोणतीकोणती रसायने मिसळली असतात म्हणे. मग काय कोन पण आपणच करूया असे ठरवले. कोणीतरी भारतातली मेंदी शोधून आणली. मोठ्या उत्साहात एका पातळ कपड्याने मेंदी चाळली. मग ती पाणी आणि निलगिरी तेल घालून लोण्याएवढी पातळ भिजविली. कात्री, प्लास्टिकचे पेपर, चिकटपट्ट्या यांचा एवढामोठ्ठा पसारा करत कसेबसे ४ धड कोन तयार केले. त्यात मेंदी भरली. नि वर रबर लावून ते बंद केले. सगळ्या घरभर मेंदीचा वास, निलगिरी तेलाचा वास घमघमत होता. मन भरून तो वास घेतला.
मिसळपाव