Skip to main content

कोलेस्टेरॉल कसे कमी करावे ?

लेखक तात्या विंचु यांनी मंगळवार, 24/08/2010 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या माझे कोलेस्टेरॉल (LDL) फार वाढले आहे. simvastatin घेत आहे. एका चर्चेत वाचला कि एक मिसळपावकर फक्त diet वर कोलेस्टेरॉल कमी करतात. मला ति चर्चा सापडत नाहीये. ते मिसळपाव कर मला मदत करतील का?

वाचने 35617
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

सर्वात आधी म्हणजे पांढरा भात कमी करावा (बासमती तर नकोच, ब्राऊन राईस चालेल) आणि व्यायाम करावा (चालणे , जॉगिंग किंवा इतर व्यायाम प्रकार..जसे झेपतील तसे) आणि कमीत कमी ८ तास झोप आवश्यक. बाकी डॉक्टर सांगतिलच.

In reply to by पक्या

भात खाल्ल्याने (कर्बोदकांमुळे) जाडेपणा येतो असे म्हणतात पण कोलेस्ट्रॉलचा भाताशी घनिष्ठ संबंध आहे का?

In reply to by प्रियाली

भातात कोलेस्ट्रॉल नाहिये. पण जाडेपणा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. कारण जास्तीच्या फॅटमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचा आणि ट्रायग्लिसेराईड्स चा घट्ट्पणा/ दाटपणा (concentration) वाढतो. त्यामुळे नुसता भातच नाही तर इतर तेलकट तुपकट पदार्थ पण टाळले पाहिजेत. पण सर्वसाधारणपणे आपण (भारतीय त्यातही मराठी आणि दक्षिणी लोक ) भात रोजच खातो. परदेशात असू तर बासमतीच खाल्ला जातो. कित्येक वेळा पोळ्यांचा कंटाळा आला , पटकन होतो म्हणून भात केला जातो आणि खाल्ला जातो. जर भात फारसा खाल्ला जात नसेल तर भात टाळण्याचे कारण नाही. पण जनरली डॉक्टर कडे गेल्यास आधी भात कमी करा असाच सल्ला मिळतो. LDL जास्त असलेल्या लोकांनी रोजच्या जेवणात व्हाईट ब्रेड, बटाटे , पांढरा भात , मैद्याचे पदार्थ , प्रोसेस करुन बनवलेल्या साखरेचे पदार्थ टा़ळले पाहिजेत. वॉलनट (आक्रोड) , ओटमील हे कोलेस्ट्रॉलची पातळी खाली आणण्यात मदत करतात.

In reply to by पक्या

भातात कोलेस्ट्रॉल नाहिये. पण जाडेपणा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. कारण जास्तीच्या फॅटमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचा आणि ट्रायग्लिसेराईड्स चा घट्ट्पणा/ दाटपणा (concentration) वाढतो. त्यामुळे नुसता भातच नाही तर इतर तेलकट तुपकट पदार्थ पण टाळले पाहिजेत. जास्तीच्या फॅटमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचा आणि ट्रायग्लिसेराईड्स चा घट्ट्पणा/ दाटपणा (concentration) वाढतो. (रक्तवाहिन्यांमधे ते साचून राहतात, हृदयावरचा ताण वाढतो) त्यामुळे इतर तेलकट तुपकट पदार्थ पण टाळले पाहिजेत हे मान्य. पण यात भाताच दोष नाही. भातातून फॅट्स येत नाहीत, फक्त कार्बोहायड्रेटस् ( कर्बोदके) मिळतात. एका कार्ब पासून सुमारे ४ तर स्निग्ध पदार्थांपासून ९ किलो़कॅलरी इतकी ऊर्जा/ उष्णता मिळते. भात पचायला अतिशय हलका असतो. पचनासंबंधीच्या तक्रारी असल्यास पोळ्यांऐवजी भात खा असे सांगितले जाते. कोलेस्टोरॉल कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळे जंक फूड बंद/ अगदी कमी केले पाहिजे आणि नियमित कार्डियोचा व्यायाम केला पाहिजे. (म्हणजे चालणे, पळणे, मैदानी खेळ इ.)

In reply to by पक्या

पांढरा भात कमी करावा (बासमती तर नकोच, ब्राऊन राईस चालेल) कुतुहल म्हणून दोन्हीं पिशव्यांवरील पौष्टिक विदा पाहिला पांढरा (बासमती नाही) कार्बोहाड्रेट्स १२% फायबर ३% आयर्न ८% फॅट ०% ब्राऊन कार्बोहाड्रेट्स ११% फायबर ४% आयर्न ४% फॅट २% (गोंधळलेला) सुनील

In reply to by शिल्पा ब

तुमचा प्रश्न कळला नही. Doctor ने simvastatin घ्यायला सांगीतली आहे (सध्या घेत आहे)..पण मला diet आनि lifestyle बदलुन ते कमी करायचे आहे. काही मिपा करांनी तसे केले आहे म्हणुन विचारले..

In reply to by तात्या विंचु

एक तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच वागा... lifestyle म्हणाल तर रोजच्या रोज किमान तासभर तरी भरभर चला...सवय नसेल तर हळूहळू सवय करा....म्हणजे सुरुवातीला हळूहळू झेपेल तितके चला आणि मग झेपेल त्या गतीने वेग वाढवा. तेलकट, तुपकट पदार्थ, मैद्याचे पदार्थ टाळा...रोज थोडे थोडे walnut किंवा शक्य असेल तर oatmeal घेत चला... फळ आणि भाज्या खा... खूप तेलात परतून परतून नको...पण crunchy राहतील अशा भाज्या करून खा.. जाडी कमी झाली कि कोलेस्ट्रोल कमी होईल...तरीसुद्धा डॉक्टरचा सल्ला घ्याच...उगाच आमच्या सल्ल्यावर विसंबू नका.

डॉ. अभय बंग यांचे 'माझा साक्षात्कारी ह्रुदयरोग' हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत लिहिलेले आहे. त्यात त्यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे.

या लिंकवर अतिशय उत्तम माहिती आहे. तो धागा 'आरोग्यम धनसंपदा' गृपपुरताच मर्यादित असला तर तो ग्रूप जॉइन करून वाचा. मला तो कंटेंट कॉपी पेस्ट करणे बरोबर वाटले नाही, त्यामुळे लिंक देतीय. http://www.maayboli.com/node/14106

LDL कमी करायचा आणी HDL जास्ती करणे हे आपल्या आरोग्यासाठी ऊतम आहे.व्यायामा शिवाय दुसरा उपाय नाही.प्रथम आहारातुन तेलकट तुपकट कट करणे.अवघड आहे,पण केले तर उपाय होईल,अपाय होणार नाही. Dr Hiremath, Dr Abhay Bang लि़खित ह्या वरची पुस्तके जरूर वाचावी.

marathi.aarogya.com/पोषक-पदार्थ-आणि-अन्न/लिपीड

बीअर प्या भरपुर! (कमीत कमी ५ प्रतिदिन) जेणे करुन भुक कमी लागेल आणि अन्य पदार्थ पोटात कमी जातील आपोआप! ;) -- अध्यक्ष, महाराष्ट्र बेवडेबाजी प्रचारक महामंडळ, (स. दा. डोलकर मार्ग, मु. पो. तहानलेले गाव.) इंटरनेटप्रेमी.

सोप्प आहे !! आधी स्वताला हा प्रश्न विचारा की की वाढवल कस ? नेमक त्याच्या ऊलट केल की कमी होणार ना !! अवांतर :वरील वाक्याकरता " घरच्या डॉक्टरची " मदत घेतलेली नाही ह्याची नोंद घ्यावी.