Skip to main content

इंटरनेट वेबसाईट्स

लेखक विश्नापा यांनी शनिवार, 28/08/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर या आधी कुणी इंटरनेट वेबसाईटस् बद्दल लिखाण केले आहे काय? मी मला माहीत असलेल्या चांगल्या वेबसाईटस् शेअर करु इच्छीतो.मिपाकरांना आवडेल काय?

Departed एक छान movie

लेखक utkarsh shah यांनी शनिवार, 28/08/2010 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
Departed हा मला खुप आवडलेला चित्रपट आहे. कितीजनांनी तो पाहिला आहे ते माहित नाही, पण नसेल पाहिला तर एकदा आवर्जुन पहा. ज्यांनी पाहिला असेल त्यांना ही तो नक्कीच आवडला असेल. चित्रपटात खलनायक बाजु भक्कम आहे.आणि या चित्रपटाचा शेवट पाहून मी पण गुंग झालो होतो. पोलिस डिपार्टमेंट वर याची पुर्ण कथा आहे.खलनायक हा स्मार्ट , हुशार असुन त्याची भरती पोलिसात सहज होते. नायकाला मात्र घेताना टाळाटाळ केली जाते कारण त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड. तरी पण त्याला घेण्यात येते, पण underground agent म्हणून. त्याला गुंडाच्या टोळीत सामिल होउन त्यांच्या बातम्या पुरवणे हे त्याची जबाबदारी. पुढे थोडा bollywood style ने जातो.

नविन camera घ्यायचा आहे. मला एखादा चांगला camera suggest करा.

लेखक कशेडी घाट यांनी शनिवार, 28/08/2010 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्या मिसळपावच्या सभासदांना माझा नमस्कार. या blog वरील कलादानमध्ये upload केलेले फोठो अतिक्षय सुंदर आहेत. माझ्या कडे सध्या Nikoncha camera आहे.मला नविन camera घ्यायचा आहे. तसा मी professional photographer नाही.पण छंद जोपासन्यासाठी नविन camera घ्यायचा आहे. Net वरती मी खुप शोध घेतला पण अजूनच गोंधळलो आहे. मला एखादा चांगला camera suggest करा.

रविवारची मुखशुद्धी - पोच्ड पीचेस्

लेखक विंजिनेर यांनी शनिवार, 28/08/2010 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षातले ४-५ महिने कडाक्याची थंडी तुमच्या देशात पडत असेल तर कधी एकदा जून उजाडतोय आणि सोबत उन्हाळ्याची उबदार हवा कधी घेऊन येतोय याची तुम्ही नक्की वाट पाहत असणार. उन्हाळा म्हणजे उंडारणं, पोहणं आणि मित्रमंडळींसोबत बागेत केलेले बार्बेक्यु! मित्रपरिवारासोबत हसत खिदळत झालेल्या अशा पेटभर मेजवान्यांमधे अजून रंगत भरायची असेल तर पोच्ड पीचेसची चैनदार मुखशुद्धी हवीच! मुळात पीच हे एक अति नाजूक आणि नखरेल फळ. गुलाबी-लालसर रंगाच्या नाजूक छटांच्या मखमली बाह्यरंगापासून वेडावून टाकणारा गंधासोबत, पूर्ण पिकलेलं, रसरशीत मधाळ अंतरंगापर्यंत - नजाकत कुठे म्हणून लपत नाही.

प्रणयाचा पाऊस!

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 28/08/2010 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस बरसला, सुगंध पसरला! श्वास मोहरला, सहवास बहरला! मंद तारा, धुंद वारा! प्रेमात ओला, आसमंत सारा! मन फुलले, तन उमलले! प्रणय पाहूनी, क्षण थांबले!
काव्यरस

संपादकांच्या फुलक्या

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 28/08/2010 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
संपादकांच्या फुलक्या भाजायचे ठरले तर टोपलंभरुन तरी हमखास जमतील. त्या टम्म फुगलेल्या फुलक्या मार्मिक टिचकी मारून फोडल्या की पचायला हलक्या होतील व त्या खाल्ल्यानंतर मस्त मेजवानीच्या डुलक्याही लागतील... त्यावेळी आम्ही लेखन क्षेत्रातले उमेद्वार होतो. अजूनही आहोतच, परंतु तेव्हा फारच नवखे होतो. पेपर चाळायचे, 'निवेदने' कॉलम भरारा वाचायचा, पटतील ते विषय पत्त्यांसह उतरवून घ्यायचे. अन् कागद पेन घेऊन लेखनसमाधी लावून घ्यायची. एकेका लेखासाठी चार पाच खर्डे होत. शेवटी हे लिहू की ते करता करता सगळेच उतरुन पाठवून द्यायचो. काय जे लागेल ते त्यांनीच वेचावे असा हवाला टाकून लेख प्रकाशित होण्याची वाट पहात रहायचं.

कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 28/08/2010 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड
या धाग्यातील प्रतिसादांमध्ये मंदार व प्रसाद जोशींनी म्हटले होते: ">कोथरुड थोडं सं रुड वाटटं नाई ?!! खत्रूड शी यमक जुळतं नै, कोथरूडचं >>>> ह्यावर एक मस्त कविता लिहिता येईल !!१ चला यमकं जमवुया" मंग काय? आसली भारी सिच्यूएशन दिल्यावर लगेच लिहून काढली कविता. वाचा तर मग:
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड म्या जवा भेटाया जातो काशीला.... तवा... तवा...
काव्यरस

इतिहास

लेखक अन्या दातार यांनी शुक्रवार, 27/08/2010 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
काल बातमी वाचली. आणि काही प्रश्न माझ्या मनात आले. १] हिटलरचे नक्की कोणते पूर्वज स्थलांतरित झाले?