Departed एक छान movie
Departed हा मला खुप आवडलेला चित्रपट आहे. कितीजनांनी तो पाहिला आहे ते माहित नाही, पण नसेल पाहिला तर एकदा आवर्जुन पहा. ज्यांनी पाहिला असेल त्यांना ही तो नक्कीच आवडला असेल.
चित्रपटात खलनायक बाजु भक्कम आहे.आणि या चित्रपटाचा शेवट पाहून मी पण गुंग झालो होतो. पोलिस डिपार्टमेंट वर याची पुर्ण कथा आहे.खलनायक हा स्मार्ट , हुशार असुन त्याची भरती पोलिसात सहज होते. नायकाला मात्र घेताना टाळाटाळ केली जाते कारण त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड. तरी पण त्याला घेण्यात येते, पण underground agent म्हणून.
त्याला गुंडाच्या टोळीत सामिल होउन त्यांच्या बातम्या पुरवणे हे त्याची जबाबदारी. पुढे थोडा bollywood style ने जातो.
मिसळपाव