आले आले गणपती माझ्या घरी आले
आले आले गणपती माझ्या घरी आले
आले आले गणपती माझ्या घरी आले
आगमनाने...त्यांच्या...
आगमनाने त्यांच्या हो...
घर माझे पवित्र झाले...
काव्यरस
इतिहास
आजकाल असं होत नाही; पण भालचंद्र नेमाड्यांच्या कादंबरीवरच्या धाग्यात प्रतिक्रिया देता-देता हात आवरला आणि झोपी गेलो. झोपेतल्या-झोपेत ह्या खालच्या ओळी बडबडत होतो म्हणे; कुणीतरी त्या लिहून घेतल्यात, मी त्या इथं टाकतो. आता जिथे प्रतिक्रिया द्यायची होती तो धागाच सापडत नाहीय (सवय होईपर्यंत असंच होणार).
काव्यरस
माझा बसप्रवास
तुमच्यापैकी जे मुंबईकर असतील, ते म्हणतील, “हॅः बसचा प्रवास ही काय लिहिण्यासारखी गोष्ट आहे? एकदा विरार फास्ट लोकलने जाऊन दाखवा. पुणेकर म्हणतील, “आमची पी.एम. टी. लै भारी. बसमधून सगळ्या हाडांसहित नीट चढून किंवा उतरून दाखवा.” पण माझ्या मित्रांनो, तुम्ही कधीच आमच्या गोवेकर खाजगी बसमध्ये बसले नसणार. मुंबैहून बदली होऊन आलेल्या साहेबलोकांनीसुद्धा शरणागती लिहून दिल्ये की “तुमच्या गोव्याच्या बसमधून प्रवास करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.”
तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे नाही का? कारण असं की, तुम्ही गोव्यात येता, २ दिवसांची टूर करता आणि परत जाता.
सिनेमा आस्वाद - पॅटन
सहसा मी युद्धाचे सिनेमे बघायच्या भानगडीत पडत नाही. याचं कारण जेव्हा जेव्हा नवरा युद्धाचे सिनेमे लावून बसतो,तेव्हा तेव्हा तोफांच्या, बंदूकींच्या, रणगाड्यांच्या आवाजानी माझं डोकं उठतं. परत कोकलून कोकलून नवर्याला "आवाज कमी कर" हे सांगावं लागतं ते वेगळच. ना भक्तीगीतं, भावगीतं लावता येतात ना झोप काढता येते, ना घरी कोणी कुणाशी बोलू शकतं.
पण आमच्या घरात सध्या झालीये एक फितुरी. मी ज्या पिल्लाला माझं समजत होते इतकी वर्षं , अगदी टेकन फॉर ग्रांटेड ते निघालय पप्पाचं. तिनी फादर्स डे ला माझ्या नवर्याला एक वॉर मूव्ही - "पॅटन" भेट दिली. आता तिनी दिली म्हणजे पहायलाच पाहीजे मला.
बायोटेक्नोलॉजी ऑथिरीटी ऑफ इंडिया
सध्याचे केंद्र सरकार बायोटेक्नोलॉजी ऑथिरीटी ऑफ इंडिया स्थापन करण्यासाठी नवीन विधेयक संसदेत मांडणार आहे. ग्रिनपीस या संघटनेने त्यावर पंतप्रधान/सोनिया गांधी यांना पत्र लिहिण्याचे आवाहन केले होते, ज्याद्वारे हे विधेयक योग्य व सांगोपांग चर्चा करूनच मांडले जाईल. ज्याप्रमाणे आण्विक दायित्व विधेयक जनमताच्या रेट्यामुळे थोडेतरी बदलले गेले, त्याप्रमाणेच वरील विधेयकही त्यातील काही बाबींसाठी बदलणे आवश्यक आहे. जसे की,
१. सदर बायोटेक्नोलॉजी ऑथिरीटी ऑफ इंडिया ही जेनेटिक्ली मॉडिफाईड फूड संदर्भात निर्णय घेणारी एकमात्र संस्था असेल.
२. राज्यांच्या व भारतीय नागरीकांच्या मुलभूत हक्कांवर अतिक्रमण.
३.
प्रांतांच्या गोष्टी - काही संदर्भ
डिस्क्लेमर: लोकप्रशासनावरील हा ऑथेंटिक वगैरे लेख नाही. प्रशासनाशी सहसा संबंध न येणाऱ्या मित्रांना ढोबळ कल्पना यावी एवढाच हेतू आहे. कुणी भर टाकल्यास स्वागत आणि आनंद आहे. काही चूक आढळल्यास अवश्य सांगावे.
प्रेरणा (!)-
पण मला प्रांत म्हणजे कलेक्टर/डेप्युटी कलेक्टर की अजुन कुठली पोस्ट ते अजुन कळल नाही.******* जिल्हा प्रशासनामध्ये दोन प्रमुख उतरंडी असतात. राज्या राज्यांनुसार थोडे फरक असतात. प्रस्तुत संदर्भामध्ये – विकास (डेव्हलपमेंट) उतरंड / हाएरार्की– कलेक्टर – पीडी(डीआरडीए)/ अध्यक्ष जि.प.
इंटरनेट वेबसाईट्स
मिपावर या आधी कुणी इंटरनेट वेबसाईटस् बद्दल लिखाण केले आहे काय?
मी मला माहीत असलेल्या चांगल्या वेबसाईटस् शेअर करु इच्छीतो.मिपाकरांना आवडेल काय?
मिसळपाव