Skip to main content

माझे रिकामपणाचे उद्योग--पेपर क्विलिंग!!!!

लेखक मस्त कलंदर यांनी शुक्रवार, 03/09/2010 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे आधीचे रिकामपणाचे उद्योगः १. ग्लासपेंटिग २. बुकमार्क्स सुबक ठेंगणी जपानहून आली. यायच्या आधीच तिने माझ्यासाठी विणलेला एक छानसा रूमाल घेतलाय म्हणून सांगितले होते. पण भेटली, तेव्हा तिने नुसता एकच रूमाल न देता एक आख्खी पेपर बॅगच दिली. आणि मी आतल्या भेटवस्तू पाहायचं सोडून बॅगकडेच पाहात राहिले. कागदाच्या पातळ पट्ट्या नीट्सपणे कापलेल्या. आणि त्या पट्ट्यांची सुंदरशी पिवळी-तांबडी, पिवळी-निळसर फुले, हिरवीगार पाने अशी मस्त नक्षी. प्रत्येक फूल दिमाखात...

शाहीन..!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/09/2010 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
"लौकरच तुझ्यावर मी एक लेख लिहिणार आहे. तुझ्या फोटोसकट. तुझी परवानगी आहे का?" -- मी. "माझं आयुष्य म्हणजे एक ओपन कार्ड आहे तात्या.. माझी फुल्ल परवानगी आहे" - शाहीन. दिलिपअन्ना शेट्टी. मुलुंडच्या शास्त्री मार्गावर उमापॅलेस नावाचा एक डान्स बार आहे, त्याचा चालक-मालक. त्या सा-या शेट्टी फॅमिलीचा मी आयुर्विमा दलाल. त्याची बायको, दोन मुली - सा-यांच्या आयुर्विमा पॉलिसीज उतरवण्याचे काम माझ्याकडे. माणूस मालदार आहे त्यामुळे सतत कुठल्या ना कुठल्या पॉलिसीज माझ्याकडून घेत असतो. असाच एके दिवशी मी पॉलिसीजच्याच काही कामानिमित्त त्याच्याकडे गेलो होतो. शेट्टी बिझी होता.

क्रिकेट वेळ वाया घालवून बघण्याचा खेळ आता उरला आहे का?

लेखक सुनिल पाटकर यांनी गुरुवार, 02/09/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसेंदिवस क्रिकेट खेळात होत असलेला गोंधळ ,रडीचा डाव ,मँच फिक्सिंग,भ्रष्टाचार यामुळे क्रिकेट वेळ वाया घालवून बघण्याचा खेळ आता उरला आहे का?

धिस टाईम फॉर आफ्रिका. - चित्रसफर.

लेखक अर्धवट यांनी गुरुवार, 02/09/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
थांबा... शिर्षक वाचुन घाबरू नका, अजुन एक भाग पाणी घालून वाढवत नाहिये. पण प्रवासातल्या गडबडीमुळे शेवटच्या काही भागात फोटो टाकायला जमलं नव्हतं. भरपाई म्हणुन या भागात केवळ फोटोच टाकतोय.

स्वीट कॉर्न घालुन आप्पे.

लेखक चिंतामणी यांनी गुरुवार, 02/09/2010 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
स्वीट कॉर्न घालुन आप्पे. आप्पे बनवण्यासाठी साहित्य:- १.५ कप तांदुळ, ३ कप मका दाणे, १/४ कप उडीद डाळ, १ /२ कप खवलेला नारळ,आले, मीरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. From APPE" alt="" /> कृती:- तांदु

महालक्ष्म्या

लेखक मितान यांनी गुरुवार, 02/09/2010 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या मराठवाड्यात गणपतीपेक्षा जास्त महत्त्व गौरींचं. आमच्याकडे त्यांना गौराया किंवा महालक्ष्म्या म्हणतात. माझ्या लहानपणच्या आमच्या घरातल्या लक्षुम्यांच्या या आठवणी. मी आठनऊ वर्षांची असेन तेव्हाच्या. अण्णांच्या नोकरीमुळे आम्ही लातूरला रहायचो. पण मुख्य देवघर मंजरथलाच. त्याला अण्णा हेडक्वार्टर म्हणायचे. गोदावरीच्या काठावर असलेल्या या छोट्याश्या क्षेत्रावरचे आमचे भटांचे घराणे. आजोबा म्हणजे जोशीबुवांचा गावात चांगलाच वचक. काका पण याज्ञिकी शिकलेले. पण शेती करायचे. अजूनही करतात. अण्णा आणि काका असे दोनच भाऊ. त्यामुळे आटोपशीर कुटुंब. शेती, गाईगोर्‍हे भरपूर...आजोबांचे पौरोहित्य उत्तम.

दंगल-ए-खास

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 02/09/2010 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
''ए बच्ची, अंदर जा, अंदर जा....'' माझ्या बालमूर्तीला उद्देशून लॉजचा मॅनेजर खेकसला तशी मी घाबरून त्या जुनाट लॉजच्या लाकडी दरवाज्यातून आत स्वागतकक्षात गेले आणि आईला घट्ट बिलगून बसले. बाहेर जोरजोरात कानडी भाषेतील घोषणा ऐकू येत होत्या. सकाळच्या रम्य, शांत प्रहरी त्या घोषणांचा असंतुष्ट सूर वातावरण ढवळून काढत होता. गणपतीच्या सुट्टीतले ते सुंदर, सोनेरी दिवस. शाळेच्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन माझे व धाकट्या बहिणीचे गाठोडे बांधून आई-वडील आम्हाला दक्षिण भारताच्या सफरीसाठी घेऊन गेले होते. मी होते जेमतेम दहा - अकरा वर्षांची तर बहीण आठ वर्षांची!

महाराष्ट्राला शिवसुष्टी ची खरच गरज आहे ?

लेखक टग्या टवाळ यांनी गुरुवार, 02/09/2010 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज महाराष्ट्रात किमान ३ ते ४ शिवसुष्टी उभारल्या गेल्या आहेत. आता पुण्यात सुद्दा शिवसुष्टी उभी राहत आहे.खरच शिवसुष्टी साठी कोट्यावधी रुपये खर्च करणे कितपत योग्य आहे. त्या पेक्शा तोच खर्च जर मोडकळीस आलेल्ल्या अनेक गड आहेत त्यांना करुन हे गड सुधारता येणार नाहीत का. महाराष्ट्राची शान कशात आहे.

त्सोत्सी

लेखक सुनील यांनी गुरुवार, 02/09/2010 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
एक जेमतेम तीन महिन्यांचे मूल - तेही दुसर्‍याचे - एखाद्याच्या जीवनात किती बदल घडवू शकते? एखादा क्रूर, पाषाण्हृदयी गुन्हेगार एका चिमुरड्याच्या सानिध्यात, अवघ्या तीन-चार दिवसात किती आरपार बदलतो, याचे फार सुरेख चित्रण आहे, गेविन हूड दिग्दर्शित "त्सोत्सी" ह्या इंग्रजीमिश्रित झुलू भाषिक चित्रपटात. झुलू भाषेत "त्सोत्सी" म्हणजे ठग. लहानगा डेविड. रागीट बाप मृत्युशय्येवर पडलेल्या आईलादेखिल भेटू देत नाही. शेवटी तो घर सोडून पळून जातो. जोहान्सबर्गमधील एका झोपडपट्टीत लहानाचा मोठा होतो. चार जणांचे टोळके जमवून चोर्‍या-मार्‍या करायला लागतो.