मी त्या रक्ताच्या शोधात आहे....
मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे.
ज्यांनी अटकेपार झेंडे गाढले.
मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे.
ज्यांनी मराठी मनगटांना
स्वराज्याचे बळ दिले......
आज जो मराठ्यांना पुन्हा
लढायला लावेल...
हर हर महादेव पुन्हा
गगन भेदून राहेल.....
फूंकून रणशिंग ज्याने आकाशालाही आव्हान दिले..
मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे...
पूर्वी सारखे आज ही
परकीय आक्रमण वाढत आहे....
माझ्याच मातीत आज माझी
मराठी गाढली जात आहे.....
सावरण्या तिचा हात मला बळ देणारा हवा आहे..
मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे...
-पंचम..
काव्यरस
(बाम लावला ग सखे बाम लावला)
जे गाणं ऐकल्यावर अर्धा किलो झंडूबाम खावून जीव द्यावा असं वाटलं , त्या गाण्यावर नृत्य करणार्या रबरी माकडहाडवाल्या मलैका अरोरा खान यांना सादर समर्पित :
विचित्र खाज दाटली , अभद्र ही तिथी,
मंदमती हात हे रिमोट शोधती,
दोन प्रहरी का गं उगी टिव्ही लावला ?
बाम लावला ग सखे बाम लावला.
गौरांगी वस्त्र शोधी अधीर लोचने,
बुबळातुन धूर निघे मुन्नीदर्शने,
बदनामीचा जणू इव्हेंट जाहला.
काव्यरस
मनतरंग...(पूर्वप्रकाशित उद्घोष - महाराष्ट्र मंडळ बे एरिआ - इ फ्लायर)
माणूस म्हंटलं, की अडी-अडचणी, चिंता-काळज्या, ताण-तणाव हे सगळं ओघाने आलं....पण अशाही वेळांना आपण
आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवला, तर त्या चिंता-काळज्यांची बोच जरा कमी होते.
मला माझ्या एका मित्राने मध्यंतरी सहज एक नेहमीचाच प्रश्न विचारला...म्हणाला, "कशी आहेस सांग !" मी माझ्याही
नकळत सगळे वैताग-पाढे वाचले. कविताही लिहीली...ती पण अशीच आयुष्याचे रडगाणे सांगणारी..बोचरी !!
पण मग एकदम वाटले की मला त्याला असेही उत्तर देता आले असते की! थोडेसे सकारात्मक...
शेवटी सुखं आणि दुःखं या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फक्तं नाणे उलटे करून बघायची देरी असते.
अंडा बिरयाणी,हॉटेलचा शेट व टीव्हीवरची मालिका.
नमस्कार्,नमस्कार.......
मिपाला तीन वर्षे झाली.खुप फास्ट प्रगती चाललेय.होउ दे,आपल्याला काय त्याचा फायदा होणार नाही.पण शुभेच्छा द्यायला पैसे लागत नाहीत,म्हणुन शुभेच्छा(कोरड्या) देतो.
आता सुरु करतो.
त्यादीवशी सकाळी खजुर जरा जास्त खाल्ले,म्हणुन जरा जास्त excite झालो होतो.डोळ्यांना फील्टर लावल्याप्रमाणे सगळीकडे स्त्रीयाच दीसत होत्या.एक जुन्या ओळखीची दीसली.मी "गुड मॉर्निग" म्हणालो.तिनेही काही न म्हणता फक्त नाजुक हसुन दाखवल,मी "चल लग्न करुया" हे मनात आलेले वाक्य खुप प्रयत्न करुन अडवल.नजर वेगळीकडे वळवत सटकलो.
ह्या सर्वात कुठे अपघात तर होणार नाही ना,ही भीती मनात धरत रस्त्यावर चालत होतो.
ठाण्याला जाणा
आले गणपती माझ्या अंगणी
आले गणपती माझ्या अंगणी
आले गणपती माझ्या अंगणी
वाट पाहीली गेल्या वर्षापासूनी
मुकुट शिरावरी दिसे शोभुनी
भरजरी पितांबर अंगी नेसूनी
पुष्पमाला सुगंधी गळ्यात घालूनी
शुंडेसहित एकदंत राखूनी
आले गणपती माझ्या अंगणी
कमळपुष्प हाती धरूनी
दुसर्या हाती परशू घेवूनी
एका हाती मोदक लेवूनी
शुभ हाताने आशिष देवूनी
आले गणपती माझ्या अंगणी
वक्रतुंड हेरंब लंबोदर
विकट विनायक विघ्नेश्वर
गणेश महोदर विघ्नहर
अगणीत असली नावे घेवूनी
आले गणपती माझ्या अंगणी
दहा दिवस गणपती येता दारी
रोमहर्षक सोहळा घडतो भारी
मुर्ती तुझी एक सदस्य हो
काव्यरस
गणपती बाप्पा मोरया!
आमच्याकडे बाप्पाचं आगमन फक्तं दिड दिवसांसाठीच असतं. लहान असताना बाप्पाची मुर्ती आणायला जाताना जो आनंद होत असे, तो अजूनही कायम आहे. आम्ही राहतो (म्हणजे मुळ गावी) तिथे सगळ्यांकडे बाप्पाचं आगमन आणि पुजा गणेशचतुर्थीच्या दुपारपर्यंतच होउनही जात असे. पण आमच्याकडे मात्र बाप्पाची पुजा संध्याकाळी असल्याने शेजार्यांकडची तयारी, पुजा बघून आम्हा भावंडांनाही कधी एकदा संध्याकाळ होते असे वाटायचे. आम्ही दोघे भाऊ आणि बाबा सकाळीच बाप्पांची मुर्ती घेऊन येत असू. पण त्याही आधी सकाळी उठल्यावर घरात सगळीकडे बाप्पाच्या पाऊलांच्या खूणा चुन्याने काढत असू.
वर्धापन दिनानिमित्त मिपाला शुभेच्छा!
आज गणेशचतुर्थी. मिपाचा वर्धापन दिन. मिपावर मला येऊन एक वर्ष देखील झालं नाही. मिपाचा, किंवा एकंदरीत मराठी संस्थळांचा शोध लागला तेव्हा माझी वैयक्तिक स्थिती अतिशय वाईट होती. अजूनही ती पूर्णपणे सुधारली नाही, पण मिपामधून मला जो आधार मिळाला, मनात साचून राहिलेलं खूपसं लिहायला मिळालं, वाचायला मिळालं त्यामुळे ती सुसह्य झाली. आपल्या विशाल कुटुंबात मिपाने मला मोकळ्या हातांनी सामील करून घेतलं. माझं लेखन वाचलं, बरेवाईट प्रतिसाद दिले. नवीन लिहायला स्फूर्ती दिली. समधर्मी लोकांशी, मराठी भाषिकांशी सुसंवाद (कधी कधी नुसताच वाद) साधण्याची संधी दिली. त्याही पलिकडे जाऊन अनेक नाती जोडली गेली.
'सायलेन्स प्लीज'
'सायलेन्स प्लीज'
हे दोन शब्द ऐकू आले आणी पुर्ण स्टेडीयम मधे शांतता पसरली...
टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप
१५-०
टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप
टक टक टक
३०-०
टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप
४०-०
टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप
टक टक टक टक टक टक टक टक
६०-०
परवा सहा तारखेला यु एस ओपन याची देही याची डोळा पाहण्याचा योग आला.....नशीब बलवत्तर म्हणावे की रॉजर फेडररची मॅच आमच्या लॉट ला आली...
मिसळपाव