Skip to main content

महिला राज

लेखक प्रमोद सावंत१ यांनी मंगळवार, 02/11/2010 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याप्रमाणे गुलामगिरी, धूम्रपान व स्त्रियांच्या अधिकारातील कमतरता इतिहासजमा झाल्या आहेत. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार, सरंजामी वृत्ती व भ्रष्ट अकार्यक्षम लोकशाही इतिहासात जमा करणे शक्य आहे. पूर्वी स्रियांना अधिकार कमी होते. इंग्लंड अमेरिकेसारख्या प्रगत लोकशाहीतही शंभर वर्षांपूर्वी महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. अमेरिकेत वेतन समानता तर बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर शक्य झाली. भारतात स्वातंत्र्यानंतर स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी लढावे लागले नाही. पंचायत राज आणले तेव्हा ३३% जागा स्त्रियांसाठी आरक्षित ठेवल्या. संसदेतही महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

शब्द होती मूक तेव्हा रंगते ही भैरवी..

लेखक स्वैर परी यांनी मंगळवार, 02/11/2010 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर ई पेपर वाचत असताना, ई-सकाळ वर एक अतिशय भन्नाट धागा सापडला आहे.मुलतानी ते भैरवी या शीर्षका खाली दिलेली रागमाला आवर्जुन ऐकवी अशी आहे. त्या बद्दल पुरविलेली महिती अशी: न्यू जर्सीच्या विश्र्व नाट्यसंमेलानात पुण्याच्या भरतनाट्य संशोधन मंदिराने सादर केलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाने मराठी माणसांची मने जिंकली. याच नाटकातली गाजलेली रागमाला भरतच्या सहकार्याने ई-सकाळच्या वाचकांसाठी सादर केली आहे. पुरूषोत्तम दारव्हेकरांची लेखणी आणि पं.

भ्रष्टाचार सार्वत्रिक आहे का?

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 02/11/2010 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे भारताबाहेरचे दोस्त आम्हाला लै म्हणजे लै शिव्या देतात. भारतात लै भ्रष्टाचार आहे.. असे आहे तसे आहे.. च्यायला ऐकुन घ्यावं लागतं ! एक तर आपण पडलो अडाणी... जगात काय चालतं कसं चालतं याची *ट कल्पना आपल्याला नाही! पण आपले काही दोस्त आहेत... अधुन मधुन काहीतरी सांगतात... लै चांगले आहेत मनाने.. देव त्यांना भरपुर आयुष्य देवो !! आता आमचे असे पण दोस्त आहेत.. जे शिव्या देतात.. पण मन साफ आहे त्यांचं.. एकदम साफ ! भारत मोठ्ठा व्हावा असंच त्यांना नेहमी वाटतं... आणि असा मोठा व्हायला त्यांची अडचण येऊ नये म्हणुन ते लायकी असुनही दुसर्‍या देशात जातात..

काजु कतली.. मदत पाहीजे..

लेखक पंख यांनी मंगळवार, 02/11/2010 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांपासून मित्रांकडून काजु कतली या पदार्थाचे नाव ऐकत आहे.. मी तरी कधीही हा पदार्थ पाहिला नाही, खाण्याचे तर दूरच .. पण माझ्या मित्रांना हे समजल्यावर त्यांनी मला वेड्यात काढले. ते विश्वास ठेवायलाच तयार नाहीत कि मी काजु कतलीपासून ईतका अनभिज्ञ असेल. मलाही एकवेळ वाटले कि मला हा पदार्थ माहितीही असेल पण कदाचित वेगळ्या नावाने.. म्हणून मी मित्राला फोन करून काजु कतलीचे एक 'सुरेख' चित्र पाठवायला सांगितले..

वाट हरवलेल्या काही कविता

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 02/11/2010 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वहीवरल्या अर्ध्यातच वाट हरवलेल्या काही कविता, कधी कधी भांडण उकरून काढतात माझ्याशी ... तुझ्यामुळेच आम्ही हरवलो, आता कळत नाहीये... जायचे कुठे ? अन थांबायचे कुठे ? त्यांची समजूत घालण्याकरता मग मी शोधतो अजून एखादी ओळ .. अन त्यांना मुक्कामाला पोहोचावायाच्या नादात मात्र .. मी स्वतःच हरवतो ...

हे सुरांनो चंद्र व्हा

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 02/11/2010 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
हे गाणे मी पहिल्यांदा कॉपी पेस्ट्च्या वयांत ऎकलं, म्हणजे १७-१८चा असताना. दुरदर्शन वर बहुधा आरती पाटिल अश्या नावाची कोणी गायिका होती. आता नाव नक्की आठवत नाही, पण त्या काळांत गाणं जास्त लक्षात राहिलं ते त्या गायिकेच्या दिसण्यामुळं, तिचा चेहरा आणि तिची तवला वाजवणा-या कडं पाहतानाची नजर, त्या नजरेत एक प्रकारचा धाक होता किंवा अधिकार होता. हे गाणं चारच ऒळींचं, अगदि टिपीकल नाट्यसंगीत, थोडेसेच शब्द आणि त्या बरोबरच्या सुर, आलाप, तानांच्या नाना हरकती.

काही अतरंगी संभाषणे.

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 01/11/2010 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी तशा खुप प्रकारच्या लोकांना भेटलो आहे,त्यांच्याबद्दल जास्त काही लिहु ईच्छीत नाही,पण त्यात उच्च पातळीच्या वैज्ञानिकांपासुन ते 'भाई' ह्या श्रेणीत येणारे सर्व येतात.मग मी प्रत्येकाशी बोलताना वापरले जाणारे शब्द,चेह-यावरचे भाव इतकेच काय अंगात घातलेले कपडे ह्यांचाही विचार करतो,हे सर्व 'जैसा देस वैसा भेस' ह्या नियमाचे कटेकोर पालन व्हावं ह्या उद्देशाने केलेले असते. पण संभाषणावेळी कधी कधी काय होतं,पुढची व्यक्ती मी गृहीत धरलेल्या तिच्या प्रतिभेला तडा जाईल असे काही शब्द बोलते,मी चाट पडतो,"अरे हेच बोलले का?". मला जे सांगायचय ते मी काही उदारणांसहीत स्पष्ट करतो. १) मी.नेने,ह्या माणसात तशे खुप गुण,त्यातल

बैल

लेखक जयदेव यांनी सोमवार, 01/11/2010 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
दोन जिवाची घालमेल निस्तेज सन्साराची तीन दगडी चुल मान्डण्यासाठी १० बाय १० चे खुराडे जगण्या मरण्याच्या आणाभाका खान्यासाठी पालिकेच्या नळाची थेम्ब थेम्ब धार सारा सन्सार धूवून जिवाची तहान भागविण्यासाठी सरकारचे अधीक्रुत दुकान उच्चत्तम निक्रुष्ट दर्जाच्या धान्यासाठी जिवाच्या करमणुकीची प्रसारमाध्यमे ऐकुन किटतात कान अन धिजतात डोळे कारण त्यात जाहिराती असतात बैलान्च्या अन बातम्या असतात महाबैलान्च्या महाबैल रवन्थ न करता पचवतो कोटीकोटी अन त्याच सत्यकथ्येची रवन्थ करत आपण जळतो घडोघडी महाबैलान्नी गिळ्लेल्या पेन्डीचा एक दिवस जनता करेल हिशोब कारण सामान्य जनता ही गाय आहे ह्या सार्‍या बैला-महाबैला