Skip to main content

WWIEF केप टाऊन नवीन

लेखक अनिल सोनुने यांनी गुरुवार, 04/11/2010 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आज मिपावर लिहितो आहे. माझ्या एका प्रकल्पावर काम सुरु असल्याने लेखन करता आले नाही तरीही एखादी तरी चक्कर मिपावर असतेच. असो, वर्ल्डवाईड इनोव्हेटीव एज्युकेशन फोरम 2010 साठी माझी निवड केप टाऊन येथे झाली होती. दिनांक 26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीत हा कार्यक्रम पार पडला. संबंधित फोरमसाठी देशातून ९ प्रकल्प निवडले होते. त्यात महाराष्ट्रातून माझा एकट्याचा प्रकल्प सादर करण्याची संधी मला मिळाली. सदरील स्पर्धा ही वर्ग अध्यापनात संगणकाचा, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विषयी असते. सदर स्पर्धा देशपातळीवर मायक्रोसॉफ्ट ही कंपनी आयोजीत करीत असते.

सिमरन...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 03/11/2010 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
दोनचार दिवसांपूर्वीच हा लेख टाकण्याविषयी आणि तिचा फोटू टाकण्याविषयी सिमरनची पूर्ण परवनगी घेतली आहे.

सूर तेच छेडिता

लेखक यकु यांनी बुधवार, 03/11/2010 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ गीत: सूर तेच छेडिता मूळ गीत एका प्रियकरानं प्रेयसीसाठी म्हटलेलं आहे. गमंत अशी असते की बहुतांशी लोकांची प्रेयसी जेव्हा सुटते, तेव्हा त्यांना सिगारेट ही नवी प्रेयसी हमखास मिळत असते. या कल्पनेवर या गाण्याचे शब्द सहज इकडे तिकडे ठेऊन पाहिले आणि तयार झालं धूर तोच काढीता...
काव्यरस

आली दिवाळी....

लेखक धमाल मुलगा यांनी बुधवार, 03/11/2010 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी! काय मग? कसं काय चाललंय? काय म्हणतंय औंदाचं पीक-पाणी? :) आज धनत्रयोदशी! वर्षभर आपण ज्या सणाची आवडीनं आणि आतूरतेनं वाट पहात असतो तो दिवाळसण (हं.हं...नवविवाहित मित्रांनो, तोच तो..तोच तो, आणि जूनविवाहित मित्रांनो, 'तो' नव्हे पण आपला साधाच दिवाळीचा सण ;) ) आजपासून सुरु होतोय. मी विचार केला, रोज आपण सतराशे साठ खरडी मित्रमैत्रिणींना धाडत असतोच, पण असेही कित्येक मायबाप मिपाकर आहेत, ज्यांच्याशी नेहमीच संवाद होतो असे नाही. तर मग आपण ह्या धाग्याद्वारेच दिपावलीचं अभिष्टचिंतन करुया.

सूड

लेखक आदिजोशी यांनी बुधवार, 03/11/2010 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा आपले म्हणवणारेच आपला घात करतात, जिवाभावाचे मित्र पाठीत खंजीर खुपसतात आणि स्वतःची सावली उलटून वार करते, तेव्हा सुरू होते कथा एका सुडाची.
ह्या कथेचा नायक एक सरळमार्गी, मध्यमवर्गीय तरूण आहे. त्याचं आयुष्य मुंबईत गेलं. नोकरी निमित्त २ वर्ष घरापासून तो लांब राहिला. हा तरूण नुकताच लग्नाच्या गोड बंधनात अडकला आहे. आणि सगळ्या नवर्‍यांप्रमाणे न वागता त्याने स्वतःला गॄहस्थाश्रमात झोकून दिलं आहे. लग्नानंतर काही महिने नोकरीच्या गावी राहिल्यावर तो आपल्या घरी परत आला. आणि ह्या कथेला सुरूवात झाली.

देहाची तिजोरी

लेखक नीधप यांनी बुधवार, 03/11/2010 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
"काल तुझी निलू दिसली होती मार्केटात. मला बघितलं पण ओळख नाही दिली तिनी. तुला भेटते का गं अजून ती?" आवराआवर संपवून खोलीत येत ताई म्हणाली. "नाही गं आता काही संपर्कच नाही राह्यला तिच्या लग्नानंतर. पंकजशीच लग्न झालंय तिचं. दोन मुली आहेत एवढं माहितीये." "केवढ्या थापा मारायचीस तू तिच्यासाठी आठवतंय का? अगदी आईला तिचा सगळा घोळ कळल्यावरही तिच्यासाठी खोटं बोलणं संपलं नव्हतं तुझं. नशीब तुझं की मला खरं काय ते कळलेलं होतं. नाहीतर आईनी तर तुला कैदेतच ठेवलं असतं शिक्षण संपेपर्यंत." "हा हा ताई! मी काय कैदेत बियदेत टिकले नसते.

दोन हिंदुस्तान.................................

लेखक गांधीवादी यांनी बुधवार, 03/11/2010 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
'गरीब व श्रीमंतांना कॉंग्रेसच एकत्र आणू शकते' माननीय युवराज राहुल गांधी यांनी नुकतेच 'फक्त गरिबचं देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात.' असे विधान केले, तसेच 'सध्या देशात दोन हिंदूस्थान निर्माण झाले आहेत. एक अतिशय वेगाने प्रगती करतो आहे आणि दुसरा गरिबीमुळे अडचणीत आला आहे.' हेही मान्य केले.

गोवा

लेखक ५० फक्त यांनी बुधवार, 03/11/2010 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
दि. ८ व ९ ला गोव्याला जाणार आहे. त्यासाठी माहिती हवी आहे. मि व मित्र असे दोघे जण सहकुटुंब (बायको आणि मुलं) जात आहोत. आमच्या पॅकी कोणीही दारु पित नाही,मांसाहार करीत नाही ( मग कशाला जाता आहांत ?) त्यामुलं) गोब्यात काय काय करता येइल किंवा व्हेज जेवणाची काय सोय या बद्दल माहिति हव आहे ? मार्गदर्शनाची अपेक्षक हर्षद going in minty who is preparing to invade NH17.

शास्त्रीय संगीताबद्द्ल माहीती देनारा दुवा.

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 03/11/2010 05:55 या दिवशी प्रकाशित केले.
संगिताविशयीचं मला काहीच माहित नाही. शास्त्रिय संगीताविशयी मी जानुन घेन्यासाठी मायाजाळावर शोध घेताना, हा धागा सापड्ला. रसीकांना आवडेल. ह्यात प्रत्येक रागाबद्द्ल सविस्तर माहीती दिलेली आहे. http://www.swarganga.org

पुस्तकविश्व दिवाळी अंक २०१०

लेखक आनंदयात्री यांनी बुधवार, 03/11/2010 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज धनत्रयोदशी, अश्विन कृष्ण १२ शके १९३२. आजच्या या शुभदिनी 'पुस्तकविश्व'चा पहिलावहिला दिवाळी अंक आपल्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे. हा अंक ऑनलाईन तसेच पीडीएफ स्वरुपात एकाच वेळी प्रसिद्ध होत आहे. अनुभव, पुस्तकपरिचय, लेखकांचे परिचय, मुलाखत आणि कवितासंग्रहाचे परिचय असे विविधरंगी लेखन आपणास या अंकात वाचायला मिळेल. पुस्तकविश्वचा अंक म्हणजे पुस्तक/लेखकांबद्दल असे जरी असले तरी लेखांच्या विषयात वैविध्य राखायचा प्रयत्न केला आहे. या दिवाळी अंकाचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांची दिलखुलास मुलाखत.