मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आली दिवाळी....

धमाल मुलगा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
राम राम मंडळी! काय मग? कसं काय चाललंय? काय म्हणतंय औंदाचं पीक-पाणी? :) आज धनत्रयोदशी! वर्षभर आपण ज्या सणाची आवडीनं आणि आतूरतेनं वाट पहात असतो तो दिवाळसण (हं.हं...नवविवाहित मित्रांनो, तोच तो..तोच तो, आणि जूनविवाहित मित्रांनो, 'तो' नव्हे पण आपला साधाच दिवाळीचा सण ;) ) आजपासून सुरु होतोय. मी विचार केला, रोज आपण सतराशे साठ खरडी मित्रमैत्रिणींना धाडत असतोच, पण असेही कित्येक मायबाप मिपाकर आहेत, ज्यांच्याशी नेहमीच संवाद होतो असे नाही. तर मग आपण ह्या धाग्याद्वारेच दिपावलीचं अभिष्टचिंतन करुया. :) आज संध्याकाळी घरोघरीचे बापयलोक घरच्या धनाची पूजा करतील, घरच्या लक्ष्मी गाय-वासरांना ओवाळून, त्यांना गोडाचा घास खाऊ घालून वसुबारस साजरा करतील.. घरोघरीचे आकाशकंदील आज चमचमायला सुरु करतील, मिणमिणत्या पणत्या लखलखून येतील, पोरंसोरं फटाक्यांच्या खोक्यात लुडबुडून दंगा करतील...स्वयंपाकघरांतून तळणीचे, बेसनाचे खमंग वास जीव खुळावतील.. कामकाजासाठी दूर असलेले एकेक चाकरमानी आजपासून जमेल तसं आपापल्या घराकडं ओढीनं धावत निघतील..३-४ पिढ्या सोबत बसुन आनंदाच्या चार गुजगोष्टी करतील... चला, आजपासून आपणही ह्या आनंदात आकंठ बुडून जाऊया. दिवाळीचा हा आनंद चढत्या भाजणीत वाटूया. 'दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा' म्हणतात ते काय उग्गाच? :) मायबाप मिपाकरहो, ही दिवाळी तुम्हा सर्वांना, तुमच्या आप्तस्वकियांना सुखाची, समृध्दीची, भरभराटीची जावो हीच श्रीशंभोचरणि प्रार्थना! दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!

वाचने 7006 वाचनखूण प्रतिक्रिया 54

ब्रिटिश टिंग्या 03/11/2010 - 16:46
शुभ दिपावली! :)

बिपिन कार्यकर्ते 03/11/2010 - 16:51
शुभ दिपावली!!! छान लिहिलं आहे. लेखक या रकान्यात बर्‍याच दिवसांनी धमाल मुलगा हे नाव वाचून डोळे पाणावले. असो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती 03/11/2010 - 16:54
दिवाळी म्हणून यावर्षी रूमालच द्यावेत, कसें! धमालराव, बोर्डावर आले हे उत्तम; "हाचि दिवाळी दसरा" असं म्हणावं का काय? शुभ दिपावली.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विनायक पाचलग 03/11/2010 - 17:46
आमच्याही शुभेच्छा !!

In reply to by विनायक पाचलग

आंबोळी 04/11/2010 - 15:23
आरे वा ! धमालपंतांबरोबर तुम्हाही कलीकाळाला भेदून असे बोर्डावर आलेले बघुन खरच आनंद वाटला. दिवाळीच्या शुभेछा!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तिमा 03/11/2010 - 17:04
+१. हेच म्हणतो. धमालराव इतके उत्तम लिहितात तर नेहेमी का लिहित नाहीत ? एक शंका धमालरावांना, अवलियांचा 'टारझन' होऊ घातला आहे का ?

परिकथेतील राजकुमार 03/11/2010 - 16:51
चला, आजपासून आपणही ह्या आनंदात आकंठ बुडून जाऊया. दिवाळीचा हा आनंद चढत्या भाजणीत वाटूया.
हेच बोल्तो :) सर्व मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

सुहास.. 03/11/2010 - 16:53
पाच हजार तीनशे एक्कोण्णचाळीस वर्षांनी आलेल्या धाग्याला प्रतिसाद नाय द्यायचा तर कोणाला द्यायचा ? ही दिवाळी तुम्हा सर्वांना, तुमच्या आप्तस्वकियांना सुखाची, समृध्दीची, भरभराटीची जावो हीच भवानीमातेच्या चरणी प्रार्थना!
अरे वा, आली का दिवाळी ! सकाळपासुन खरेतर मी दिवाळीलाच शोधत होतो पण काही केल्या सापडत नव्हती, कुठेही साधी पाऊलखुणही नव्हती, ४ जणांना विचारुन पाहिले तर त्यांनाही पत्त्या नव्हता. असो असो, दिवाळी म्हणजे आनंदाचा वर्षाव ! दीपावलीत उजळलेल्या दिव्यांच्या प्रकाशात तमाम मिपाकरांच्या जीवनातला जो काही असेल तो सर्व अंधार निघुन जाऊन त्यांचे जीवन दिव्यासारखे उजळुन निघो हीच सदिच्छा !!! सर्वांना दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार 03/11/2010 - 16:59
च्यायला... कंपुतल्या माणसाचा धागा आल्याबरोबर धावले सगळे लगेच प्रतिक्रीयांचा पाऊस पाडायला ! इडा-पिडा टळो आणि ह्या दिपांच्या उत्सवात मिपाला लागलेले कंपुबाजांचे ग्रहण सुटो !!

In reply to by सूड

स्पा 03/11/2010 - 17:07
हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ बाकी.. दीपावलीच्या सर्व मिपाकरांना हार्दिक शुभेछा... खा प्या मजा करा................ :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन 03/11/2010 - 17:04
>>... कंपुतल्या माणसाचा धागा आल्याबरोबर धावले सगळे लगेच प्रतिक्रीयांचा पाऊस पाडायला ! :) हॅप्पी दिवाली रॉबर्ट ! - डॉन्या भल्ला

आप्पा 03/11/2010 - 17:13
दिपावलीच्या सर्व मिपाकरांना हार्दीक शुभेच्छा.

वारकरि रशियात 03/11/2010 - 17:19
दीपावली अभिष्टचिंतन ! सर्व मिपाकरांना हार्दीक शुभेच्छा.

मुक्तसुनीत 03/11/2010 - 18:03
समस्त मिपाकराना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

पैसा 03/11/2010 - 18:56
सर्व मिसळपावकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

निलेश कवळे 03/11/2010 - 19:12
सर्व मिपाकराना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा

ईन्टरफेल 03/11/2010 - 19:40
सर्व मिपाकराना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा !

सूर्य 03/11/2010 - 19:51
ही दिवाळी तुम्हा सर्वांना, तुमच्या आप्तस्वकियांना सुखाची, समृध्दीची, भरभराटीची जावो हीच श्रीशंभोचरणि प्रार्थना! आमचीसुद्धा.. सर्व मिपाकरांना शुभ दिपावली. - सूर्य.

चिगो 03/11/2010 - 20:17
तुमि लिवलं नी दिवाळसण गोड झाला !! लिहीते रहा... (आता कसं भारदस्त, पिकल्यावानी वाटतयं. ;-)) सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...

योगप्रभू 03/11/2010 - 20:37
सर्व मिपाकर मित्र, चालक आणि संपादक मंडळ, दीपावली हा प्रकाशाचा आणि त्याहूनही खर्‍या अर्थाने लक्ष्मीचा सण. माता लक्ष्मी तुमच्या जीवनाला आणि विचारांना समृद्धी देवो. खूप शुभेच्छा. :)

स्पंदना 03/11/2010 - 21:26
काय काय बघते काय मी ? धमु? मस्त मस्त ! अगदी सुहास सारख म्हणाव अस वाटतय . या धाग्याला प्रतिसाद द्यायचा नाही तर आणी कुठ? खरा फटाका हा धागा अन त्यातिल वर्णन. समस्त मिसळपाव परिवाराला ही दिपावली सुख समृद्धीची , अन भरभराटीची जावो !!

बेसनलाडू 04/11/2010 - 05:58
मी विचार केला, रोज आपण सतराशे साठ खरडी मित्रमैत्रिणींना धाडत असतोच, पण असेही कित्येक मायबाप मिपाकर आहेत, ज्यांच्याशी नेहमीच संवाद होतो असे नाही. तर मग आपण ह्या धाग्याद्वारेच दिपावलीचं अभिष्टचिंतन करुया. पटले! म्हणूनच - सर्वांना दिवाळीनिमित्त विविधरंगी, तेजस्वी शुभेच्छा!!! ही दिवाळी सुखसमृद्धी, आनंद, उत्साह आणि भरभराटीची जावो, ही शुभकामना!! (शुभेच्छुक)बेसनलाडू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 04/11/2010 - 10:34
मी विचार केला, रोज आपण सतराशे साठ खरडी मित्रमैत्रिणींना धाडत असतोच, पण असेही कित्येक मायबाप मिपाकर आहेत, ज्यांच्याशी नेहमीच संवाद होतो असे नाही. तर मग आपण ह्या धाग्याद्वारेच दिपावलीचं अभिष्टचिंतन करुया. मलाही पटले. सर्व मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.....!!! -दिलीप बिरुटे

दिपक 04/11/2010 - 15:15
सर्व मिपाकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
असेच म्हणतो. :-) :-)

प्रमोद्_पुणे 04/11/2010 - 15:21
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!

अविनाशकुलकर्णी 04/11/2010 - 17:20
हॅ.दि....हॅ.दि.. हॅ.दि....हॅ.दि.. चाल..इलु इलु...इलु इलु ..................................... हॅ.दि....हॅ.दि.. हॅ.दि....हॅ.दि. ये... हॅ.दि...हॅ.दि...क्या है? ये... हॅ.दि...हॅ.दि हॅ.दि....का मतलब हॅप्प्पी दिवाली..हॅप्प्पी दिवाली जब जोरसे फटाके फुटते है.. जब शेव..चकली को‌ई तलता है.. जब मॉल मे कोई जाता है जब नया लिबास को‌ई पेहेनता है.. दिल कहेता है हॅ.दि....हॅ.दि....हॅ.दि.... हॅ.दि....का मतलब हॅप्प्पी दिवाली..हॅप्प्पी दिवाली सुबह अभ्यंग स्नान होता है तेल उटणे बदन को लगाता है.. मोति साबनसे नहाता है.. पत्नी उसे निरंजनसे ओवाळति है तो..दिल कहेता है हॅ.दि....हॅ.दि. हॅ.दि....हॅ.दि. हॅ.दि....का मतलब हॅप्प्पी दिवाली..हॅप्प्पी दिवाली दोस्त..रिश्तेदार जब मिलते है.. प्रेझेंट कि देवाण घेवाण होति है लडाके गप्पे, फराळ फस्त होता है हसी मजाक से घर खिलखिलाता है दिल कहेता है हॅ.दि....हॅ.दि.. हॅ.दि....हॅ.दि. हॅ.दि....का मतलब हॅप्प्पी दिवाली..हॅप्प्पी दिवाली अविनाश