Skip to main content

आपण कोण आहोत?

लेखक बद्दु यांनी बुधवार, 10/11/2010 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
आपण कोण आहोत?.... गरीब भारताचे गरीब रहिवासी? दुर्बळ भारताचे अतिदुर्बळ नागरिक ? धर्मनिरपेक्ष भारताचे धर्माभिमानी हिंदू? प्रगत भारताचे अती ( IT) प्रगत मजदूर? कोण आहोत आपण? एका बलाढ्य राष्ट्राचा राष्ट्र्पती इथे येतो काय ? मुलांसोबत नाचतो काय? दिवाळी साजरी करतो काय? "जय हिंद" म्हणतो काय ! सारेच अजब ! तीन दिवस एकाच देशात ? इथे आहे काय असे तीन दिवस घालवायला? अहो, आम्ही तर इथल्या सगळ्या "सिस्टिमच्या" नावावर बोंबा ठोकत फिरतो मग असे एकदम काय घडले की जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणार्‍या आणि तसे प्रत्यक्षात आणणार्‍या त्या राष्ट्रपतीला इथल्या मातीत रमावेसे वाटले?

बाहुल्यांच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार यांच्याशी संवाद

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 10/11/2010 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या कठपुतळी कलेविषयी व हातमोजांच्या कठपुतळ्यांचे खेळ करण्याविषयी केलेला हा खास संवाद! वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर मास् कम्युनिकेशन्, पत्रकारिता व कम्युनिकेशन् मिडिया फॉर चिल्ड्रन् या विषयात उच्चशिक्षण घेणाऱ्या सुषमा दातार यांचा बायोडेटा वाचतानाच त्या किती विविध क्षेत्रांमध्ये लीलया संचार करतात याची कल्पना येऊ लागते.

साखरगोळ्या..

लेखक गवि यांनी बुधवार, 10/11/2010 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणापासून इंजेक्शन हे सर्वात भयात्कारी औषध. आणि सर्वात टेन्शन फ्री औषध म्हणजे होमिओपथी. गोड गोड छोट्ट्याश्शा साखरगोळ्या. होमिओपथी "Laws of similars" वर बनवलेली आहे. जशास तसे, किंवा काट्यानं काटा काढणं या तत्वावर. सगळ्यांना सहज समजेल अशा भाषेत सांगायचं तर (म्हणजे मला समजलंय त्या भाषेत..!!) रोगाची लक्षणं नीट पहायची आणि तीच लक्षणं शरीरात निर्माण करणारा पदार्थ अत्यंत डायल्य़ूट करून औषध म्हणून द्यायचा.

ग्राहका, फसवणुकीच्या "आयडीयांपासून" सावधान...!!!

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 10/11/2010 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
खाली दिलेला प्रसंग नीट वाचा म्हणजे कदाचीत हे पुन्हा दुसर्‍या कुणासोबर घडणार नाही: "माझा आयडियाचा प्रीपेड मोबाईल तीन वर्षांपासून आहे आणि तेही व्यवस्थित कागदपत्रके देवून घेतलेला आहे. अचानक मला सप्टेंबर २०१० ला एस एम एस आला की कागदपत्रके जमा करा. ४ ऑक्टोबरला कागदपत्रके पूर्ण पणे भरून, तसेच फोटो देवूनही दसर्‍याला १७ ऑक्टॉबरला मोबाईल चे कॉल बंद झाले.

तीन वेगळेच अनुभव!!

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 10/11/2010 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा मी घराबाहेर पडले, तेव्हा मला घराचा अर्थ समजला. जेव्हा मी मित्रांबाहेर पडले तेव्हा मला, मैत्रीचा अर्थ समजला. जेव्हा मी शहराबाहेर पडले तेव्हा मला, ओळखीच्या रस्त्यांचा अर्थ समजला. जेव्हा मी राज्याबाहेर पडले तेव्हा मला, भाषेचा अर्थ समजला. जेव्हा मी देशाबाहेर पडले तेव्हा मला, देशप्रेमाचा अर्थ समजला. जेव्हा मी मृत्युबाहेर पडले तेव्हा मला, जीवनाचा अर्थ समजला. पण मी जेव्हा स्वतःच्या बाहेर पडले तेव्हा सुद्धा मला जातीचा अर्थ समजला नाही.

मला आलेले एक पत्र

लेखक मुक्तसुनीत यांनी बुधवार, 10/11/2010 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, अनेक दिवसांनी माझ्या एका मित्राने मला पत्र लिहिलेले आहे. त्यात काही विचार आहेत. आणि काही महत्त्वाचे प्रश्न. त्या पत्रामधला वैयक्तिक मजकूराचा भाग वगळता , तेच पत्र आपल्या मिपाकर मित्रमैत्रिणीना दाखवावे असे वाटले. कदाचित उत्तमोत्तम संकल्पना, उत्साह ऊर्जा असलेल्या आपल्या या सुहृदांकडूनच माझ्या या मित्राला काही उत्तरे सापडतील अशी आशा वाटली. (मित्राला मिसळपाव वर हा धागा टाकल्याचे कळवणार आहे. तो अर्थात वाचनमात्र असेल. ) ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------- पत्र लिहायला काहीही कारण नाही.

पार्टी गेम्स

लेखक पारुबाई यांनी बुधवार, 10/11/2010 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही पार्टी गेम्स ....तुम्हा सर्वांसाठी. हे खेळ प्रामुख्याने जोडप्यांसाठी आहेत. १.खेळ पहिला=बायकोला दागिने घालणे. पार्टीला यायच्या आधीच यजमानांनी बायकांना जास्तीत जास्त दागिने घालून यायला सांगावे. खेळ सुरु करण्यापूर्वी बायकांनी हे सगळे दागिने एखाद्या ताटलीत घेवून खुर्चीवर बसावे. आणि मग नवर्यानी हे सर्वं दागिने बायकोच्या अंगावर परत घालावेत. जो सगळ्यात आधी सर्वं दागिने बायकोला घालेल तो जिंकला.यात बायकांनी कोणत्याही प्रकारे मदत करायची नाही. बोलून किंवा एक एक दागिना हातात देवून वगैरे.गुपचूप बसून राहायचे. (अवघड आहे नाही ? आणि नवर्याला सूचना नाही द्यायच्या तर कोणाला द्यायच्या ? ) २.

गोलमाल ३ :

लेखक मी-सौरभ यांनी बुधवार, 10/11/2010 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
पिक्चर सुरु. एक भंकस गाणं हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा मिथुन आणि रत्ना पाठक यांच्यतर्फे 'ईमोशनल अत्यचार' हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा मध्यांतर हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा मिथुन आणि रत्ना पाठक यांच्यतर्फे 'ईमोशनल अत्यचार' हा हा हा हाहा लूटूपुटूची लढाई :) परत थोडं हा हा हा हा (अधिक काय लिहिणे???) कथा, अभिनय, संगीत हे पण शंकरपाळी मध्ये असणार्‍या शंकरा इतकेच आहेत :)