Skip to main content

येत्या काही दिवसांत इस्त्रायल इराणच्या अणुउर्जाकेंद्रांवर हल्ला करेल काय?

लेखक अवलिया
Published on बुधवार, 10/11/2010

याद्या 1417
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

बेंजामिन असा घातकी निर्णय घेईल असे वाटत नाही.

In reply to by चिरोटा

माझ्या "न्यूक्लियर डिसेप्शन"च्या १९व्या प्रकरणातील शेवटचा भाग वाचल्यास अल कायदाला अगदी हेच हवे आहे. आणि त्यांनी गळाला लावलाय इराणला! कांहींही करून पाश्चात्यांना मध्यपूर्वेत खेचून त्यांचा खातमा करायचा हीच अल कायदाची भावी योजना आहे. अर्थात् त्यांना अमेरिका त्या ठिकाणी हवी आहे, इस्रायल हा फारच लहान मासा आहे. पण इस्रायल इतके मोठे साहस कांहीं एकटा करणार नाहीं! पण अल कायदाची काय योजना आहे, vision आहे, हे आधी वाचले नसेल तर आतासुद्धा ते प्रकरण जरूर वाचा. अंगावर काटा उभा राहील!

इस्त्रायल आणि इराणच्या राजकारणाची काय आयड्या नै राव. त्यामुळे 'सांगता येत नाही'ला मतदान केलं. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठले, गाव,सासर. मुलेबाळे, राजकारणाची सुरुवात त्याचबरोबर छगन भुजबळ यांची गच्छंती, गच्छंतीचे कारणे वगैरे बातम्यात बीझी आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन, त्रिवार अभिनंदन. आंतरराष्ट्रीय विषय हाताळल्याबद्दल, सर्वप्रथम नानाचे अभिनंदन! आमचे मत अर्थातच शेवटच्या पर्यायाला.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इस्त्रायल आणि इराणच्या राजकारणाची काय आयड्या नै राव. काय सांगता. इस्राईल आणि इराणचे राजकारण हे आयडी आहेत? म्हैत न्हवते रॉ. एक स्वतन्त्र राष्ट्र म्हणून इराणला अण्वस्त्रे विकसीत करण्याचा हक्क आहे. तसाच तो भूतान , मालदीव पाकिस्तान बांग्लादेश नेपाळला॑देखील आहे. जगातल्या प्रत्येक राष्ट्राला स्वतःचे संरक्षण करण्याचा हक्क आहे. जर २६/११ आणि ९/११ हे सारखेच असतील तर अमेरीकेप्रमाणेच भारतालादेखील शत्रु राष्ट्रावर हल्ला करण्याचा हक्क आहे.

In reply to by विजुभाऊ

>>>एक स्वतन्त्र राष्ट्र म्हणून इराणला अण्वस्त्रे विकसीत करण्याचा हक्क आहे. बरं मान्य...! >>>तसाच तो भूतान , मालदीव पाकिस्तान बांग्लादेश नेपाळला॑देखील आहे. बरं मान्य....! >>>जगातल्या प्रत्येक राष्ट्राला स्वतःचे संरक्षण करण्याचा हक्क आहे. हेही मान्य......! पण, काही दिवसांत इस्त्रायलने इराणच्या अणुउर्जाकेंद्रांवर हल्ला केला तर सदरील कौलाच्या बहुमतावरुन कौलारुकर कोणत्या निर्णयाला जाणार आहेत त्याची काही आयड्या आहे का ? :) -दिलीप बिरुटे

In reply to by चिरोटा

>>>>हा कौलाची लिंक इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतांयुहु ह्यांना पाठवली तर ? इस्त्रायलचे पंतप्रधानांना धागा पाठविण्यापूर्वी आपल्याला या धाग्यात कुठेतरी आम्हा महाराष्ट्रातल्या मराठी माण॑साच्या तसेच जगभरातल्या मराठी वाचणार्‍या लिहिणा-या मंडळींच्या भावना अशा आहेत की, आपल्या राष्ट्राला 'ज्यू राष्ट्र' म्हणून आम्ही तत्त्वतः (शासकीय शब्द ) मान्यता देत आहोत. मग त्यांना त्यांच्या भावनेची नोंद घेतली म्हणून आनंद वाटेल. काय म्हणता ? :) बाद वे, ज्यू राष्ट्र म्हणून मान्यता देण्यात पॅलेष्टीनला काय प्रॉब्लेम आहे ? -दिलीप बिरुटे

ईस्त्राईला आपल वर्चस्व कायम अबाधित ठेवायच असेल तर इराण अणुशक्ती केंद्र उधवस्त करण गरजेच आहे. जर भावना बाजूला ठेवून राजकारणाचा विचार केला तर ईराण ने अजून ही अण्वस्त्रे पूर्णतः विकसित केलेली नाहीत. त्यांमुळे त्यांची अणुशक्ती केंद्रे उधवस्त करून त्यांना पूर्णपणे आळा घालता येईल. एकदा का ही संधी गमावली आणि ईराणने अण्वस्त्रे विकसित केली की, भारताची पाकिस्तान्च्या बाबतीत जशी गोची होते तस ईस्त्राईलच होईल. पारंपारीक युध्द क्षमता वरचढ असूनही अणुयुध्द होईल ह्या भितीने मूग गिळून बसवा लागेल मग!

हो, नक्की करेल आणि त्यातूनच पुढे तिसरे महायुध्द सुरु होईल असे आंतरराष्ट्रीय भाकित आहे. ते २०१४ सालापर्यंत चालणार आहे म्हणे. नेटवर नक्की कुठे वाचलं ते आठवत नाही अन्यथा लिंक दिली असती.

सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वासाठी पांठींबा जाहीर करताना ओबामा यांनी भारताला अंतर्राष्ट्रीय विषयांवर ठोस भुमिका घेण्यास सांगितले आहे.. त्याचाच तर हा परिणाम नसावा ना ? बाकी कौल छान आहे, पण मिपाकरांना ईस्रायल-ईराण पेक्षा कल्याण - डोंबिवलीत जास्त ईंटरेस्ट आहे !

In reply to by अवलिया

http://www.youtube.com/watch?v=ov-Ukq2h4tk विकीलिक ची एक मोठी गंमत वाटते त्यांनी अश्या गोष्टी आतापर्यत प्रसिध्द केल्या आहेत .ज्याचा दूरगामी अमेरिकेला फायदा होणार आहे .पूर्वीपासून एक प्रभावी शस्त्रे जिचा वापर अमेरिका पाकिस्तान व जगातील तमाम राष्ट्रे करतात .ते म्हणजे वॉर ऑफ मिस इन्फोमेशन ह्यात ध चा मा करणे व मुद्दाहून चुकीची व परस्परविरोधी विधाने करणे व गोंधळ व संभ्रमाचे वातावरण निर्माण करणे व शत्रूपक्षावर आपला अजेंडा लादणे .होय . इराण शिया बहुल म्हणून इतर अरब राष्ट्रे त्याला पाण्यात पाहतात .पण ज्या प्रकारे इराकशी अमेरिकेने वाताहत केली अशी इराणशी होऊ नये अशी माझ्या मते तमाम अरब राष्ट्राची मनीषा आहे .कारण गाझा मधील फिलीस्तिनी जनतेला मदत करणाऱ्या लेबेनॉन मधील हिजबुल्ला ला सगळ्यात जास्त मदत इराण करते .त्यामुळे इजारेल हे सौदी पेक्षा इराणवर खार खाऊन आहे . सौदीची अण्वस्त्र सज्ज होण्याची मनीषा कादिर खान पूर्ण करणार होते ती झाली नाही .त्यामुळे इराण (जो जवळ जवळ अण्वस्त्र सज्ज झाला आहे )त्याने अधिकृतपणे घोषणा केली तर सौदीचे अरब प्रमुख राष्ट्रे म्हणून स्थान धोक्यात येईल. (सौदी मधील कट्टर पंथीय कदाचित इराणच्या उघडपणे समर्थन करतील हेच कट्टर पंथीय दहशतवाद्याचे ए टी एम असल्याचे विकीलिक मध्ये उघडकीस आले आहेत .)म्हणून राजाने अशी इच्छा अमेरिके कडे व्यक्त करणे साहजिकच आहे .इराण ने मात्र ह्या वृत्तच सौदी अरेबियाशी असलेल्या संबंधावर काहीही परिणाम होणार नाही .असे स्पष्ट सांगितले .कारण ह्या गोष्टीमुळे इराण हा अण्वस्त्र सज्ज जवळ जवळ झाल्याचे त्या भागात सिद्ध झाले आहे .व कुठलीही इराणी आगळीक अमेरिकेला हल्याचे निमंत्रण आहे .बाकी इजारेल हा भारताशी उत्तम संबंध ठेवून आहे .व भारत इराणशी त्यामुळे अमेरिकेला हवे तर इराण व अमेरिकेमध्ये मांडवली भारत करून देऊ शकतो (इफ अमेरिका वांट) काय पाचर मारली त्याने पुढे अमेरिकन एलिट क्रौड हैराण .(अमेरिकेला जगातील कुठलेही वादग्रस्त प्रश्न सोडवायची मनापासून इच्छा नाही मग तो कश्मीर असो व इतर .) त्यांना ह्यातून फक्त स्वताची शस्त्रे विकायला बाजारपेठ हवी असते .त्यामुळे थरूर सारखा कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला राजकरणी ह्यांना कसा चालले (म्हणून त्याचा कट काढला ) मग निमित्त कुठलेही असो .

इराणकडे उत्तर कोरियाची दिलेली शेपानास्त्रे आहेत .जिचा मारा मिडिल इस्ट च्या कानाकोपर्यात होऊ शकतो .त्यांची जनता त्यांच्या राष्ट्रपतीच्या मागे खंभीर उभी आहे .चीन /भारत रशिया हे तिन्ही देशांचे इराणशी राजकीय संबध विविध कारणास्तव आहेत .(प्रत्येकाची कारणे वेगळी आहेत .) पण ह्या तिन्ही देशांनी इराण वरील सैन्य कारवाई ला नेहमीच विरोध केला आहे . सगळ्यात महत्वाचे इराण चे भय आहे .म्हणून सौदी अरेबिया ने आज पर्यतची त्यांच्या इतिहासातील सर्वात जास्त सैन्य सामुग्री अमेरिकेकडून विकत घेतली आहे ( मंदीच्या काळात जेव्हा अमेरिकेने डिफेन्स बजेट मध्ये प्रचंड कपात केली असताना हा सौदा अमेरिकाला नक्कीच फायद्याचा आहे .इराण व ज्यू राष्ट्रांचे जर भय श्रीमंत अरब राष्ट्रांना नसेल तर तें कशाला अमेरिकेला विचारतील ? त्यांची शस्त्रे विकत घेतील . युरोपात मॉनेको देश प्रचंड श्रीमंत आहे .पण परकीय आक्रमणाचे भय नसल्याने डिफेन्स वर खर्च करत नाहीं .ना अमेरिकेवर अवलंबून .त्यामुळेच सत्या भिखू म्हात्रेला म्हणतो .हमे उनके डर से मतलब हे