Skip to main content

क्रांतीकारी कुटुंब !!!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 16/11/2010 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात एक क्रांतीकारी कुटुंब आहे. त्या कुटुंबाची, त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याची थोडक्यात सर्वांना माहिती व्हावी म्हणुन या लेखाचा प्रपंच. त्या कुटुंबाचे प्रमुख म्हणजे वडील यांनी अनेक कुटुंबांना पोलीओ चे महत्त्व समजावून सांगितले आहे. अनेक जाहिरातीत सुद्धा ते अधून मधून विविध वस्तूंचे महत्त्व लोकांना समजावतात. तसेच सध्या एका कार्यक्रमाद्वारे ते अनेकांना करोडो रुपये वाटत आहेत. खुप साधे सोपे सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारुन विचारुन ते अनेकांना श्रीमंत बनवत आहेत. तिथे जायचा कंटाळा असेल तर घरीच बसून तुम्ही लखपती सुद्धा होवू शकता बरे का, लोकांनो! याहून पैसे मिळवणे सोपे ते कसे असू शकेल बरे? म

मठ्ठपणाचा भाव असणारी दुपार !!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 16/11/2010 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
सुस्त अशी दुपार उगवली आहे सगळे शरीर सुस्तीने भेंडाळुन यावे अशी दुपार ...! सर्वत्र सुन्न असे वातावरण माणसाच्या जमावाला पण ओहोटी लागलीय सगळीच पेंगत डुलकीच्या नशेत ... कान नि मन सुन्न व्हावे असे वातावरण वटवाघळ!

दि. १७ नोव्हेंबर, सिंह राशीतला उल्कावर्षाव!

लेखक असुर यांनी मंगळवार, 16/11/2010 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, उल्कावर्षावावर लिहून बरेच दिवस झाले. अदितीतै, चतुरंगकाका आणि घासकडवी गुर्जींनी सुचवल्याप्रमाणे त्यात अजून थोडी भर घालायचा हा एक प्रयत्न! उल्कावर्षाव पहायचे अनेक मौके वर्षभर आपणास मिळतच राहतात. पण काही उल्कावर्षाव असे असतात की ते टाळून किंवा चुकवून चालतच नाही मुळी! अशाच प्रसिद्ध वर्षावांपैकी एक म्हणजे सिंह राशीतून होणारा उल्कावर्षाव! १७ नोव्हेंबर ही त्या उल्कावर्षावाची मुख्य तारीख मानली जाते.

पुस्तक - रिमेंबर मी व्हेन आय ऍम गॉन

लेखक शुचि यांनी सोमवार, 15/11/2010 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
लेख सुरू करण्यापूर्वी - या लेखामध्ये जेथे भाषांतर मारक ठरले असते तेथे ईंग्रजी वाक्य तशीच ठेवली आहेत. रेडिओ आणि टेलिव्हिजन या माध्यमांमधून लॅरी किंग हे प्रसिद्ध झालेले आहेत. या मुलाखतकाराने नामवंत, गुणवंत, सौंदर्यसंपन्न, श्रीमंत, बुद्धीमान अशा ३०० कलाकारांना, खेळाडूंना, बिझनेसमधील व्यक्तींना १ प्रश्न केला तो हा की - "त्यांच्या पश्चात, लोकांनी त्यांच्याबद्दल काय बोलावं, आठवावं असं या लोकांना वाटतं? " या प्रश्नाला या ३०० लोकांनी जी उत्तरे दिली त्यातून " रिमेंबर मी व्हेन आय ऍम गॉन" हे पुस्तक जन्मास आलं.

एक प्रश्न

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 15/11/2010 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज नथुराम गोडसे यांची पुण्यतिथी. गांधीवधाबद्दल नथुराम यांना फाशी दिले गेले. गांधी हे अहिंसेचे पूजक, समर्थक व प्रसारक. 'डोळ्याला डोळा' या न्यायाने सगळे जग आंधळे होईल असा युक्तिवाद गांधीवादी 'हिंसेला हिंसा हे उत्तर नाही' याचे समर्थनार्थ करतात. फाशी म्हणजे हत्या हे समजत असतानाही नथुराम गोडसे यांना फाशी का दिली गेली? तो न्यायालयाचा निर्णय होता असा युक्तिवाद कदाचित गांधीवादी करतीलही, पण एकाही गांधीवाद्याने या फाशीला अक्षेप घेतला नाही, त्याविरुद्ध आंदोलन केले नाहीवा कुणी आमरण उपोषणासही बसला नाही हे सत्य आहे. आपल्याच तत्त्वाच्या विपरीत वर्तन अहिंसावाद्यांना कसे काय आवडले?

पाउस असा बघावा .....!!!

लेखक प्रकाश१११ यांनी रविवार, 14/11/2010 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
शिळधार पाऊस पडत असतो कुणाची पर्वा न करता तो तर आपल्याच मस्तीत मस्त गात असतो ! तो नाही बघत हे शेत आहे ? तो नाही बघत हे शहर आहे समुद्र सुद्धा ह्याला नाही दिसत ईतका तो मग्न असतो अरे नकोरे पडू तेथे बरबाद होशील ! पण तो कुणाचेच ऐकत नसतो तो आपल्याच मस्तीत गात असतो.!! पाऊस खिडकीतून बघावा पाऊस फ्रेंचविंडो मधून बघावा पाऊस गावाच्या कौलावरचा बघावा झाडापानातून टीप टीप गळणारा बघावा पाऊस समुद्रावर कोसळताना बघावा पाऊस पडत असतो धुवाधार नि समुद्र फुसांडत फणा काढताना बघावा !! __ गच्च काळ्याभोर ढगांना आभाळात ओथंबून आलेला बघावा सपकन पाठीवर बसणाऱ्या चाबकासारख्या विजेच्या कडकडाटात

टायफ़ाईड मध्ये काय खावे आणि काय खाऊ नये

लेखक मीरसिका यांनी रविवार, 14/11/2010 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार आपल्या सर्वांना (उशिरा का होईना) दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!, उशिरा शुभेच्छा देण्या़चे एक कारण म्हणजे माझा आजार टायफ़ाईड. की ज्यामुळे नेटवर बसण्याची संधीच मिळाली नाही. आज वाटलं जरा बसावं नेटवर. ह्या लिखाणाचा उद्देश पण तोच आहे. मला आपल्या सर्वांकडून माहिती हवीय. टायफ़ाईड मध्ये काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल कृपया मला सांगा.

अनंतमुखी मुशर्रफ

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 14/11/2010 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
अनंतमुखी मुशर्रफ आपण ब्रह्मदेवाला चार तोंडे आहेत असे आपण मानतो व म्हणून त्याला ‘चतुरानन’ म्हणतो. तसेच लंकापती रावणाला दहा तोंडे होती म्हणून त्याचा उल्लेख ‘दशानन’ असा केला जातो. पण मुशर्रफ इतक्यांदा आपली निवेदने बदलतात कीं त्यांना किती तोंडे आहेत हा एकाद्या संशोधनाचाच विषय व्हावा! "या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचे" त्यांचे चातुर्य पहाता त्यांना एका वेगळ्याच अर्थाने "चतुरानन ("चतुर+आनन)" म्हटले पाहिजे. एका पाठोपाठ परस्परविरोधी निवेदने करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाहीं. कसलाही विधिनिषेध न ठेवता ते असे करतात. खरं तर हे गृहस्थ इतके वारंवार रंग बदलतात कीं त्यांना मी तर‘सरडा (Chameleon )’च म्हणतो!

न-निशाण

लेखक तिमा यांनी रविवार, 14/11/2010 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
जय नांवाच्या इतिहासावर रणांचा पण इतिहास आहे नाना-नानी बागेमध्ये चघळण्याचा विषय आहे वर्तमानाच्या मोजफितीवर इतिहासाला मापत आहेत डोळ्यांवरती पट्टी बांधून तराजुवर डोलत आहेत महाकाय या बोधकथेवर लघुमतींचे प्रवचन आहे युगंधराच्या न्यायबुध्दीला केविलवाणे दूषण आहे
काव्यरस