Skip to main content

ज्योतीने तेजाची आरती..

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 16/11/2010 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, माझ्याकडे काही दुर्मिळ चित्रसंग्रह आहे, त्यातला हा फोटू. कुणी कुणी दिलेली, कधी कुणाकडे मी मागितलेली. मग कधी ललीमावशी, तर कधी वत्सलाकाकू, तर कधी गजाननबुवांच्या घरातून, तर कधी कुणी जुनाजाणता रसिक.. अश्या अनेकांकडून काही जुनी चित्र हाती आली, पाहायला मिळाली. आजचं हे चित्र म्हणजे 'ज्योतीने तेजाची आरती..' म्हणावं असं... बाबूजी गजाननबुवा जोश्यांच्या पाया पडत आहेत तो हा क्षण...! आमच्या गजाननबुवांबद्दल लिहिण्यासारखं खूप काही.

भवचक्र आणि मारीया

लेखक शुचि यांनी मंगळवार, 16/11/2010 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
पैसा हा साधारणतः जिव्हाळ्याचा विषय असतो. या विषयावरचे "माईंडफुलनेस अँड मनी - अ बुद्धीस्ट पाथ टू ऍबंडन्स" हे पुस्तक मला आवडलं होतं. त्यातील काही उतार्‍यांचे स्वैर भाषांतर म्हणा त्यातील उतार्‍यांवर आधारीत म्हणा हा लेख आहे.

[चौकशी] सिग्मा कंपनीच्या लेन्सेस

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 16/11/2010 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
सिग्मा कंपनीच्या झूम लेन्सेस इथे कुणी वापरल्या आहेत का? पुण्यात त्या कुठे मिळतात याची माहीती हवी आहे.

आई.. मिटलेला श्वास - ७

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 16/11/2010 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ६ :- http://www.misalpav.com/node/15395 पार्श्वभुमी : शेतवस्ती वरती राहणारा कवितेचा नायक. शेतातील फ़ुले , बांधावरील माळवादाचे घर, वाहणारा पाट , चंद्र यांची अवस्था ही आता त्यास त्याच्या मोडलेल्या मना प्रमाणे वाटते.. सुर हरवलेले जग त्याच्या मनाच्या बांधावरुन.. बांधावर पडलेल घर रानफ़ुलांचा एकेरी सूर भळभळणारा आठवांचा पाट डोळ्यामध्ये भयसंध्या दाट चंद्राची ढगात हूल सुनसान विचारांची भूल निशब्द एक काहूर मन व्याकुळ सैरभैर श्वास हवेत निस्तब्ध कळेना माझे प्रारब्ध स्मरणात तुझीया सुकलेले दोन नेत्र ------- शब्दमेघ
काव्यरस

मी, बाटली आणि देशद्रोही

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 16/11/2010 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोही ह्या अशक्यप्राय चित्रपटावर चार ओळी लिहून मी मिपावर लेखक म्हणून पदार्पण केले. त्यावर बऱ्याच गंमती गमतीच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. बिहारी-मराठी वाद पेटलेला असतानाच खास बिहारींचे महत्त्व आणि त्यांचे औदार्य वगैरे पटवून देणारा चित्रपट अशी हवा करत हा चित्रपट तेव्हा आपल्यावर येऊन आदळला होता. स्वत:ला 'के आर के' म्हणवून घेणाऱ्या कमाल रशीद खान ह्या महामानवाचे हे पाप! पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तो 'कॅम कॉपी' होता.

फाशीपेक्षा काही अजून?

लेखक गवि यांनी मंगळवार, 16/11/2010 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
आधी नुसतीच माहिती..गायीची माहिती असते तशी.. अफगाणिस्तान,बांगलादेश, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, भारत, इराण, इराक, जपान, कुवेत, उत्तर कोरिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सिंगापूर, अमेरिका, विएतनाम, येमेन हे सर्व देश मृत्युदंड देतात. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान या सर्व देशांनी मृत्युदंडाची शिक्षा कायद्यातून काढून टाकली आहे. सर्व प्रकारच्या गुन्ह्यांसाठी फाशी रद्द केली आहे असे एकूण देश : ब्याण्णव. फक्त स्पेशल गुन्ह्यांसाठी फाशी राखून ठेवली आहे असे देश: दहा..

नाग !!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 16/11/2010 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नाग जेव्हा सरपटत जातो तेव्हा खरेच नाही कळत मला की तो नाग आहे की साप आहे ? तुम्हाला कळतो का तो काय आहे ते ? साप की नाग ? कधी बघितलाय का त्याला सरपटताना ..? नि अचानक फणा काढताना ? ***** सळसळ सळकताना विजेच्या वेगाने नि फणा काढून जाभाड पसरताना ? अगदी वीतभर फणा नि पसरलेला आक्राळविक्राळ जबडा एखादे पाखरू ,उंदीर कसा भयभीत नि मत्रमुग्ध होऊन जातो त्याच्या नजरेच्या टप्प्यात नि जागच्या जागी कसे खिळून जातो त्याच्या जबड्यात कसा शिरतो अलगद आपले प्राण त्याच्या हवाली करत ? ****** मी पाहिलेय भर दुपारी बारा वाजता एका सरड्याला हताशपणे ...!! आपले प्राण त्याच्या हवाली करताना ….!!! *