Skip to main content

जाम्भूलाख्यान ची द्रौपदी हरपली....

लेखक स्पा यांनी शनिवार, 27/11/2010 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
'माझी मैना गावाकडं राहिली'पासून तर "मी बाबूराव बोलतोय'पर्यंत लोकप्रिय लोकगीतांची रचना करीत आपल्या खड्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आज दीक्षाभूमीवर शेकडो लोकांच्या साक्षीने "जय भीम' आणि "जय बुद्धा' अशी गगनभेदी गर्जना करीत अखेरचा श्‍वास घेतला. पोवाडे, भारुडं, लोकगीते, भीमगीते तसेच 500 हून अधिक नाटकांच्या जोरावर लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी मराठमोळ्या रसिकांवर मोहिनी घातली होती. "चला हो नमू गौतमा' हे त्यांचे भीमगीत बौद्धबांधवांच्या सदैव ओठावर असते.

एक विचार

लेखक अवलिया यांनी शनिवार, 27/11/2010 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी कधी कधी एखादा लेख, कथा वाचतांना आपल्याला एखादे वाक्य खुप आवडते किंवा त्यावर आपण अनेकदा विचार करत बसतो. वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या परिस्थितीत जेव्हा तेच वाक्य समोर येते तेव्हा आधी न केलेला विचार मनात येतो. त्या वाक्याचे वेगळे पैलु नजरेस पडतात. मागे कधी तरी वेगळ्या संकेतस्थळावर मी एक लेखमाला लिहिली होती. तिच्यात मीच एक वाक्य सहज लिहिले होते. आज परत काही कारणाने तो लेख परत वाचला, अन माझेच वाक्य मला परत परत नजरेसमोर तरळु लागले. अनेक विचार मनात आले. तुमच्या मनात असे काही विचार येतात का हे पहावे यासाठी हा प्रपंच.

गोष्ट-२ लिंगबदल

लेखक शरद यांनी शनिवार, 27/11/2010 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
लिंगबदल भीष्मांनी आपला सावत्रभाऊ विचित्रवीर्य याचा विवाह करण्याचे ठरवले. त्याचवेळी काशीराजाने आपल्या तीन मुली अंबा,अंबिका व अंबालिका यांचे स्वयंवर योजिले होते. भीष्म त्या ठिकाणी गेले व त्या तीन मुलींना उचलून आपल्या रथात ठेवले व जमलेल्या सर्व राजांना युद्धाचे आव्हान दिले. सर्वांचा पराभव करून त्यांनी त्या मुलींना घरी आणून आपल्या आईच्या ताब्यात दिले व सांगितले की विचित्रवीर्याच्या लग्नाकरिता यांना आणले आहे. त्या वेळी अंबा त्यांना म्हणाली की " माझे शाल्व राजावर प्रेम आहे व आम्ही लग्न करावयाचे ठरविले होते". भीष्मांनी तिला शाल्वाकडे पाठविले पण शाल्वाने तिचा स्विकार करावयाचे नाकारले.

कशी बदलून जाते ही सुंदर सकाळ !!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 26/11/2010 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
कशी मस्त सकाळ उगवत असते हलक्याफुलक्या पिसासारखी .....!! अंगावर कसा गोड काटा फुलवीत बसते ही थंडीची सकाळ बिस्स्मिल्लाखांच्या सनई सारखी कशी वेलांटत येतेय ही सकाळ ....
काव्यरस

२६/११ पासून धडा घेउन आपण करण्यासारखं काय आहे?

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 26/11/2010 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
(ह्या विषयी पूर्वी काही उहापोह झाल्या असल्यास क्षमस्व) २६/११ आला की मेणबत्या लावणे, श्रद्धांजली वाहणे हे नैमित्तिक झालं की सगळे आपापल्या संस्कारांप्रमाणे 'झालं-गेलं गंगेला मिळालं' ह्या वृत्तीने आपापल्या कामाला लागतो. फार तर वाचकांच्या पत्रात किंवा आंतरजालावरून (चार भिंतीआड बसून) राग व्यक्त करतो व नेत्यांना शिव्या घालतो. ही परीस्थिती पुन्हा निर्माण होउ नये म्हणून आपण कोणते "ठोस" उपाय उचलू शकतो? १. सार्वजनिक ठिकाणी दक्ष राहणे. संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तूंची माहिती त्वरीत पोलिसांना देणे. २.

किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 26/11/2010 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका कृष्णावाणी राहुल आणि, म्हणे सोनिया भारतमाय किती चाटणे आणखी रे, भारतपुत्रा असेच पाय? ...!! जन्म गेला पूर्वजांचा, करता करता खुशामतगिरी गुलाम तेही मिरवत होते, चप्पल घेऊन डोक्यावरी दास्यत्वाची जनुकं अजुनी, काही केल्या मरत नाही अनुवंशिकतेची देण अशी की, लाळघोटणे सरत नाही चापलुशीम्होरं आता, कसले संस्कार, कसलं काय ...!! राजेशाहीची भलावण, रक्तामासात भिनलेली भाटगिरीच करता करता, बुद्धी सारी झिंगलेली कणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला लोकशाहीचे गुणधर्म रक्तात काही मिसळत नाय ...!!

स्वाभिमानाचे अग्निकुंड पेटलेच पाहिजे...

लेखक अप्पा जोगळेकर यांनी शुक्रवार, 26/11/2010 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख मी लिहिलेला नाही. खूप महिन्यांपूर्वी तो मला एका ढकलपत्रातून आला होता. आज श्री. सुधीर काळे यांचा धागा पाहिल्यावर त्या लेखाची आठवण झाली. तो लेख जसाच्या तसा इथे देत आहे. संपादक मंडळाला हे आक्षेपार्ह वाटत असेल तर हा धागा उडवावा. - अप्पा जोगळेकर आई तुळजाभवानीच्या मूर्तीवर घण बसले, तेव्हा भाल्याच्या टोकावर अफझलचं मुंडकं नाचेपर्यंत या महाराष्ट्रात कोणी स्वस्थ बसले नव्हते. संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे झाले, तेव्हा घराघरातून तलवार उठली. औरंग्याला इथेच गाडेपर्यंत शांतता नव्हती.

माणसा, माणसा कधी होशील माणूस...

लेखक Pearl यांनी शुक्रवार, 26/11/2010 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल वर्तमानपत्र उघडले की दर १/२ दिवसाआड बातमी वाचायला मिळते की, अमुक अमुक अनाथालयात १/२ दिवसाचे अमुक रस्त्यावर सापडललेले/ कचराकुंडीत मिळालेले / मंदिरात सापडलेले बालक/बालिका दाखल. अशा बातम्या वाचल्या की काळजाला घरे पडतात. त्याहून अधिक त्रास या गोष्टीचा होतो की याबाबतीत आपण हेल्पलेस आहोत. याबद्दल काहीतरी करावे असे खूप वाटते पण नक्की काय करावे हे सुचत नाही. कसे थांबवावे हे सगळे. किंवा आपल्याकडून या बाबतीत काय मदत होउ शकते. कोणी काही सजेस्ट करु शकेल का.

रेस कोर्स..........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 26/11/2010 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
या ठिकाणी लाखो रुपये किमतीचे घोडे पळतात. रेसच्या दिवशी फाडलेल्या पुस्तकांचा आणि तिकीटांचा खच पडलेला असतो. चकचकीत गाड्याचाही खच असतो रस्त्यावर. दुसर्‍या बाजूला दाढीचे खुंट उगवलेले भकास नजरेची माणसेही फिरत असतात. त्या बिचार्‍या घोड्यांना काय माहिती अशी अनेक माणसे त्यांच्या टापांच्या खाली नकळत तुडविली जातात ते ! जयंत कुलकर्णी. www.jayantsphotography.wordpress.com